धूम्रपान निषेध स्पर्धेत सावध राहा! पुरस्कार मिळवून देते
इटलीतील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
अलीकडेच, उत्तर इटलीच्या मोर्टारा शहरात इटालियन ॲन्टीकॅन्सर लीग व एका स्थानिक वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी धूम्रपान निषेधार्थ पोस्टर तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यहोवाच्या साक्षीदारांपैकी असणाऱ्या सिमोना, या चौदा वर्षीय मुलीने तंबाखूच्या घातक परिणामांसंबंधी काही वेगळ्या कल्पना मिळवण्यासाठी सावध राहा! नियतकालिकाचे बरेच अंक चाळले; खासकरून जुलै ८, १९८९ आणि मे २२ १९९५ चे (इंग्रजी) अंक. सीमोनाने आम्हाला पत्राद्वारे कळवले: “सदर विषयावर माहिती गोळा करत असताना या अंकांची मुखपृष्ठं पाहून मी विलक्षण प्रभावित झाले. सावध राहा! नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर दाखवल्याप्रमाणे, तोंडात सिगारेट असलेल्या एका कवटीचं चित्र मी काढलं; शिवाय, त्या अंकाच्या शीर्षकावरूनच मला एक घोषवाक्यही सुचलं.” तिचे घोषवाक्य होते, “धूम्रपान—लाखोंच्या जीवावर लाखांची कमाई.” या स्पर्धेत २५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या इतर अनेक विद्यार्थ्यांपेक्षा वयाने लहान असूनही सिमोनाने पहिले पारितोषिक पटकावले आणि त्यासोबतच ३०० डॉलरची शिष्यवृत्तीही तिला मिळाली. सावध राहा! नियतकालिकाच्या दिलखेचक मुखपृष्ठांसाठी सीमोनाने वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तराला पत्र लिहून आपले आभार व्यक्त केले. सीमोना हे नियतकालिक मोठ्या आवडीने वाचते, केवळ यातील लक्षवेधक मुखपृष्ठांमुळेच नव्हे, तर आरोग्य, चालू घडामोडी आणि तरुणांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर यात प्रकाशित होणारे समयोचित, लाभदायक लेखही तिला आवडतात; पत्राच्या शेवटी तिने म्हटले: “असेच दर्जेदार लेख आपण यापुढेही प्रकाशित करत राहाल अशी आशा आहे!”
ख्रिश्चनांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या इतर काही विषयांची तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास कृपया यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाशी संपर्क साधा अथवा पुढील कूपन कापून ते टपालाने आम्हाला पाठवून द्यावे.
□ देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक मला पाठवा.
□ मला एक मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे; तरी यासंबंधी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.