वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ८/८ पृ. ३
  • तुमची जीवनशैली—तिचे धोके?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची जीवनशैली—तिचे धोके?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उत्तम जीवनशैली?
  • प्रकृती कशी सांभाळावी
    सावध राहा!—१९९९
  • जगाची आरोग्य स्थिती—वाढती तफावत
    सावध राहा!—१९९५
  • कोणती गोष्ट तुमचे आरोग्य ठरवते—तुम्ही करू शकता त्या गोष्टी
    सावध राहा!—१९९५
  • आपल्या विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य राखून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ८/८ पृ. ३

तुमची जीवनशैली—तिचे धोके?

अनेक प्रकारे, जागतिक आरोग्य स्थिती पूर्वी कधीच इतकी आशादायक वाटली नव्हती. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) १९९८ च्या अहवालात असे म्हटले आहे: “पूर्वीपेक्षा आता, अधिक लोकांना आरोग्य निगा, शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि सांडपाण्याची सोय प्राप्त होऊ लागली आहे.” जगातले अधिकांश लोक अजूनही दारिद्र्‌यात राहत असले, तरी ब्रिटिश प्रसार संस्थेने अहवाल दिल्यानुसार, “आधीच्या ५०० वर्षांपेक्षा गेल्या ५० वर्षांमध्ये जगभरातल्या गरिबीत घट झाली आहे.”

जगातल्या आरोग्य निगा सुविधांमध्ये प्रगती झाल्यामुळे जगभरात जन्माच्या वेळेची सरासरी अपेक्षित आयुर्मर्यादा आणखी काही वर्षांनी वाढली आहे. सन १९५५ मध्ये ती ४८ वर्षे होती. सन १९९५ पर्यंत ती ६५ वर्षांपर्यंत वाढली. ही वाढ होण्यामागचे एक कारण आहे बाल्यावस्थेतील रोगांवर मात करण्यामध्ये झालेली प्रगती.

सुमारे ४० वर्षांआधीचीच गोष्ट, एकूण मृत्यूंपैकी ४० टक्के मृत्यू पाच वर्षांखालील मुलांचे होत. परंतु १९९८ सालापर्यंत, जगातल्या पुष्कळ लहान मुलांना प्रमुख बालरोगांसाठी लशी देण्यात आल्या होत्या. यास्तव, एकूण मृत्यूंमध्ये, पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण २१ टक्के इतके कमी झाले. डब्ल्यूएचओनुसार, “निश्‍चितच लोकांचे जीवन निरोगी आणि दीर्घ” होत चालले आहे.

अर्थात, जीवनपद्धतीत सुधार न होता आयुष्यमान वाढणे म्हणजे निरर्थक विजय ठरेल. उत्तम राहणीमानाच्या शोधात, अनेक लोक भौतिक सुखविलासावर जास्त भर देतात. परंतु, अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आरोग्य धोके वेगळे असू शकतात.

उत्तम जीवनशैली?

अलीकडील सामाजिक-आर्थिक विकासांमुळे लोकांच्या जीवनशैलींमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. विकसित देशांतील अनेकजण आता अशा वस्तू खरेदी करू शकतात किंवा अशा सुखसोयींचा आनंद घेऊ शकतात ज्या आधी फक्‍त जास्त श्रीमंत लोकांनाच परवडणाऱ्‍या होत्या. या काही प्रगतींमुळे प्रदीर्घ आयुष्याची शक्यता वाढली असली, तरी अनेक लोक आत्मघातक जीवनशैलीत गुरफटले जात आहेत.

उदाहरणार्थ, कोट्यवधी लोकांनी आपल्याजवळचा भरमसाट पैसा मादक औषधे, मद्य आणि तंबाखू अशा अनावश्‍यक गोष्टी खरेदी करण्यात घालवला आहे. त्याचे दुष्परिणाम अगदी ठरलेले आहेत. “जगामध्ये झपाट्याने वाढणारा आरोग्य धोका कोणताही रोग नाही, तर एक उत्पादन आहे,” असे वर्ल्ड वॉच ही पत्रिका म्हणते. ती पत्रिका पुढे म्हणते: “२५ वर्षांच्या आत तंबाखूमुळे होणारे रोग, सबंध जगभरात मानवी आरोग्याला सर्वात मोठा धोका बनून संसर्गजन्य रोगांची जागा घेणार असे अपेक्षित आहे.” शिवाय सायंटिफिक अमेरिकन म्हणते: “चक्क ३० टक्के घातक कर्करोग मुख्यतः धूम्रपानामुळे होतात आणि तितकेच जीवनशैलीमुळे विशेषतः आहारामुळे आणि व्यायाम न करण्यामुळे होतात असे म्हटले जाऊ शकते.”

यास्तव, आपण ज्या पद्धतीची जीवनशैली निवडतो तिचा आपल्या आरोग्यावर फार मोठा प्रभाव पडतो. तर मग, आपण आपली प्रकृती कशी सांभाळू शकतो किंवा कशी सुधारू शकतो? योग्य आहार आणि व्यायाम पुरेसा आहे का? शिवाय, हितकर जीवनशैलीसाठी मानसिक आणि आध्यात्मिक गोष्टी कोणती भूमिका पार पाडतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा