वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 १/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनो गत
    सावध राहा!—१९९९
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 १/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

त्रूबदूर “त्रूबदूर—प्रेमगीतांच्या गायकांपेक्षा अधिक काही” (मार्च ८, १९९८) हा लेख, मध्य युगातील समाजात गायक तसेच कवी असलेल्या या त्रूबदूरांनी नेमकी कोणती भूमिका बजावली याचा अगदी सखोल अभ्यास करून कुशलपणे लिहिला होता. मी स्वतः साहित्याच्या क्षेत्रात एक शिक्षक असल्यामुळे पोर्तुगीज त्रूबदूरांचा मी अभ्यास केलेला आहे; पण, या कलाकारांच्या पार्श्‍वभूमीची पूर्ण समज मला तुमच्या लेखातून मिळाली. खरंच, अशा प्रकारच्या लेखांमुळे तुमचे नियतकालिक अधिकच विश्‍वासार्ह बनते.

आर. एन. ए., ब्राझील

मला कबूल करावे लागेल, की हा लेख सुरवातीला मला लगेच वाचावासा वाटला नव्हता. पण मी सुरवात केली आणि पुढे वाचतच गेले. विशेष म्हणजे, “लेडिज फर्स्ट” प्रथेची संभाव्यतः कुठे सुरवात झाली हे मला समजलं. जपानमध्ये ‘लेडिज फर्स्टची’ प्रथा पाळली जात नाही; पण आमची मागणी झाली अगदी त्या दिवसापासून माझे पती ही प्रथा पाळत आले आहेत. (आमच्या लग्नाला आज पाच वर्षं होत आली आहेत.) याचं कारण, अगदी लहान वयापासूनच त्यांच्यावर यहोवाच्या साक्षीदारांचे संस्कार झाले होते. याबद्दल मला फार आनंद होतो.

व्हाय. एन., जपान

मायलेकाचे पुनर्मिलन “एक अनोखे पुनर्मिलन” (मार्च ८, १९९८) हा लेख वाचून मी अतिशय हेलावून गेले. माझे बाबा कोण होते हे मला समजलं तेव्हा मला फार बरं वाटलं. आईबाबांनी लग्न केलेलं नव्हतं. बाबांविषयी मला अनेक प्रश्‍न पडायचे पण माझ्या प्रश्‍नांची मला नेहमीच अगदी तुटक उत्तरं मिळायची. काही दिवसांपूर्वीच मी आईला बाबांचं पूर्ण नाव विचारलं. मग टेलिफोन डिरेक्ट्रीतून मला वडिलांच्या बहिणीचा पत्ता मिळाला आणि आश्‍चर्य म्हणजे ती एक यहोवाची साक्षीदार असल्याचं मला कळलं! तिनं मला सांगितलं की १९८० साली बाबा हे जग सोडून गेले; शेवटपर्यंत त्यांनी लग्न केलं नव्हतं. माझ्या आईनं आणि आत्यानं माझं खूप सांत्वन केलं. शिवाय, तुमच्या लेखांमुळे देखील मला भावनिक आधार मिळाला.

एल. डी., अमेरिका

वांशिक अभिमान “तरुण लोक विचारतात . . . वांशिक अभिमानाबद्दल काय?” (मार्च ८, १९९८) हा लेख वाचून मला खूप आनंद झाला. “तू कोणत्या जातीची?” असा एक प्रश्‍न लोक नेहमीच मला विचारतात. पण, माझी मूळ जात कोणती हे माझं मलाच माहीत नसल्यामुळे मी गंमतीच उत्तर द्यायचे, “आपण तर मिक्स-ब्रीड बुवा!” मग, प्रवासी कार्य करणाऱ्‍या एका बांधवानं मला सांगितलं, “पुन्हा जर कुणी तुला असा प्रश्‍न केला तर सरळ म्हण, ‘मी एक यहोवाची साक्षीदार आहे.’” खरंच, सर्व जातीधर्मांना समान लेखणाऱ्‍या संघटनेत असल्याचा मला अभिमान वाटतो.

डी. एच., अमेरिका

मी १४ वर्षांची आहे आणि तुमच्या या लेखाबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते. माझ्या वंशाबद्दल मला जो अभिमान होता त्यामुळे खरं तर मी वंशवादी बनले होते. पण तुमच्या लेखाने मला हे समजण्यास मदत केली, की यहोवाच्या नजरेत सगळे लोक सारखेच आहेत.

आय. पी., इटली

मला आठवतं मी लहान असताना माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या वंशाचा, त्यांच्या रंगाचा फार अभिमान वाटायचा; ते स्पॅनिश रक्‍ताचे आहेत आणि मी मात्र खालच्या जातीची आहे असं ते म्हणायचे. त्यामुळे मला स्वतःची किळस यायची. आपल्याला काहीच किंमत नाही असं वाटायचं. कधीकधी तर मी अगदी चिडून म्हणायचे: ‘मीच का अशी?’ पण लेखात तुम्ही जो सल्ला दिला त्यामुळे आपल्यालाही काही किंमत आहे हे समजण्यास तसेच यहोवानं आपल्याला जे काही दिलं आहे त्यात संतुष्टी मानण्यास मला मदत मिळाली.

ए. जी., फिलिपाईन्स

पूर्वी माझा असा एक चुकीचा ग्रह होता, की श्रीमंत देशांत राहणारे लोकच सगळ्यात श्रेष्ठ असतात. पण तुमच्या लेखानं मला हे समजण्यास मदत केली, की खरं तर केवळ एकच जात आहे आणि ती म्हणजे मानवजात.

एल. जी., ब्राझील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा