वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ५/८ पृ. २७
  • खड्याचे रूपांतर रत्नात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खड्याचे रूपांतर रत्नात
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खड्याचे रूपांतर रत्नात
  • हिरे इतके महाग का असतात?
    सावध राहा!—१९९७
  • आपण आध्यात्मिक प्रगती करू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
सावध राहा!—१९९९
g99 ५/८ पृ. २७

खड्याचे रूपांतर रत्नात

बेल्जियममधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

अनादिकाळापासूनच त्याच्या अप्रतिम सौंदर्यामुळे लोकांना त्याचे आकर्षण वाटले आहे. मानवाला ज्ञात असलेला हा सगळ्यात कठीण नैसर्गिक पदार्थ असल्यामुळे हत्यारे आणि यंत्रे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मनाला भुरळ घालणारा हा खडा म्हणजे हिरा.

काही विश्‍वविख्यात हिऱ्‍यांबद्दल अनेक चवीचवीच्या, रसाळ कहाण्या सांगितल्या जातात. “प्रकाशपर्वत” अशा अर्थबोधाचा कोहिनूर हिरा सात शतकांपूर्वी भारतात गवसला होता. सुरवातीला, खडकाचा हा ओबडधोबड तुकडा १९१ कॅरेट्‌सचा होता पण पैलू पाडल्यानंतर तो १०९ कॅरेट्‌सचाa झाला. याशिवाय, कलनन्‌ नावाचा हिरा जगात आजवर सापडलेला आणि पैलू पाडलेला सर्वात मोठा हिरा असून सध्या तो ब्रिटिश राजमुकुटात आहे.

खड्याचे रूपांतर रत्नात

हिरे काही सुरवातीपासून सुंदर रत्न नसतात. त्यांपैकी पुष्कळांना भूगर्भातून खणून काढावे लागते. एक कॅरेट शुद्ध हिऱ्‍यासाठी सरासरी २५० टन धूळमाती काढून ती चाळण्यांतून चाळावी लागते. दर वर्षी खणून काढलेल्या चार ते पाच कोटी कॅरेट्‌सपैकी केवळ एक लहानसा हिस्सा अलंकारांत वापरण्यालायक असतो.

याकरता, कच्च्या स्वरूपातल्या हिऱ्‍यांचे त्यांच्या परिमाणानुसार, निष्कलंकतेनुसार, रंगानुसार आणि आकारानुसार वर्गवारी करावी लागते. कच्च्या स्वरूपातील जवळजवळ सर्वच हिऱ्‍यांमध्ये अशुद्धता असते. पण, काही वेळा हिऱ्‍याचा एखादा भाग सर्वस्वी किंवा बराचसा निष्कलंक असण्याची शक्यता असते. अशा वेळी, जो भाग अगदी निष्कलंक असतो तो फोडून अथवा कापून अलग केला जातो. मोठमोठ्या, किंमती खड्यांना पैलू पाडायला सुरवात करण्याआधी कारागीर अनेक महिने विचार करतात हे आपण ऐकलेच असेल. पण, हे समजण्याजोगे आहे; कारण खडक फोडताना एक लहानशी जरी चूक झाली तर हिऱ्‍याची किंमत कमालीची घसरू शकते किंवा मग तो संपूर्ण खडाच खराब होऊ शकतो.

शेवटी, पॉलिशींग करून हिऱ्‍याच्या आकारमानाला साजेसे असे पैलू पाडले जातात. पैलू पाडल्यामुळे रत्नातून प्रकाश प्रतिबिंबित होतो, आणि त्यास ती तेजस्विता प्राप्त होते ज्यासाठी हिरा इतका प्रसिद्ध आहे.

पुढच्या वेळी एखाद्या तेजस्वी, सौंदर्यवान हिऱ्‍याने तुमच्या मनाला भुरळ घातल्यास, खाणीत रक्‍ताचे पाणी करणाऱ्‍या कामगारांची तसेच कारागिरांचा चोखपणा, त्यांची प्रविणता यांची आवर्जून आठवण करा. त्यांच्याशिवाय, काचेसारख्या अनाकर्षक तुकड्याचे रूपांतर एका सौंदर्यपूर्ण रत्नामध्ये झालेच नसते.

[तळटीपा]

a कॅरेट हे वजनाचे एक प्रमाण असून ग्रॅमचा पंचमांश म्हणजे एक कॅरेट.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा