आपल्या मुलांचे संरक्षण कोण करील?
लहान मुलांवरील अत्याचार आता निदान जगव्याप्त समस्या मानली जाते हे प्रोत्साहन देणारे आहे. १३० देशांमधल्या प्रतिनिधींनी उपस्थित राहिलेल्या मुलांच्या व्यापारी लैंगिक शोषणाविरुद्ध स्टॉकहोम आयोगासारखी पावले उचलल्यामुळे या समस्येकडे लक्ष देण्यात आले आहे.
शिवाय, काही देशांमध्ये आता सेक्स पर्यटन आणि बाल अश्लीलता बेकायदेशीर करण्यासाठी कायदे बनवले जात आहेत. काही देशांमध्ये तर, माहीत असलेल्या बालसंभोगींचे एक रजिस्टर ठेवल्यामुळे त्यांना सहजासहजी मुले मिळण्याला प्रतिबंध केला जात आहे.
त्यानंतर, असे काही देश आहेत जे मुलांच्या संरक्षणार्थ कायदे बनवून त्यांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय, काही देश आणि व्यक्ती बाल मजुरांनी तयार केलेली उत्पादने घेत नाहीत.
समाजातून लहान मुलांवरील अत्याचाराचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नांची आपण प्रसंशा करत असलो, तरी वास्तविक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे आणि मानवी समाजात लहान मुलांवरील अत्याचाराची समस्या खोलवर मुळावलेली आहे हे मान्य करणे आवश्यक आहे. कायदे बनवण्याचा एक साधासोपा उपाय केल्यावर आपल्या मुलांना संपूर्ण संरक्षण मिळेल असा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल. असे अनेक कायदे बनवण्यात आले आहेत; पण समस्या अजूनही तशीच्या तशीच आहे. बालपणाच्या नैसर्गिक हक्काचे विविध कायद्यांद्वारे संरक्षण करावे लागते हा खरे म्हणजे जगातल्या अपराधी प्रौढांचा दोष आहे.
कायदे मुलांना संपूर्ण सुरक्षा देऊ शकत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुलाच्या हक्कांचे युएन करार यासारखे कडक कायदे, ज्यावर अनेक सरकारांनी सह्या केल्या आहेत, पण त्यातून काय निष्पन्न झाले? यातील पुष्कळशी सरकारे देखील आर्थिक मर्यादांमुळे आपल्या देशांतल्या मुलांचे शोषण थांबवण्यासाठी फारसे काही करत नाहीत याला चांगलाच पुरावा आहे. लहान मुलांवरील अत्याचार ही अद्यापही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे.
पालक पुष्कळ काही करू शकतात
यशस्वीपणे पालकत्वाची जबाबदारी निभावणे अत्यंत कठीण काम आहे. त्यासाठी बरेच त्याग करावे लागतात. पण, काळजी वाहणाऱ्या पालकांनी याची खात्री केली पाहिजे की त्यांना आपली मुले गमवावी लागणार नाहीत. मॅक्लीन्स पत्रिकेत असे म्हटले होते की, बहुधा “पालकत्वाला एक छंद समजला जातो.” एखादे खेळणे फेकता येते किंवा छंद थांबवता येतो परंतु पालकत्व ही देवाने दिलेली एक जबाबदारी आहे.
चांगले पालक असणे ही तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकणारी सर्वात मौल्यवान देणगी आहे; त्यामुळे तुम्ही त्याला एक आनंदी, सुरक्षित बालपण द्यायला मदत करू शकता. अशी सुरक्षितता जीवनातील सामाजिक किंवा आर्थिक स्थानावर अवलंबून नसते. तुमच्या मुलाला तुमची गरज असते—तुमच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची गरज असते, त्याला किंवा तिला धोका जाणवतो तेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची गरज असते आणि तुमच्या वेळेची गरज असते. त्यांना गोष्टी ऐकवणारा तुमचा आवाज हवा असतो, तुमचा आदर्श हवा असतो, तुमची प्रेमळ शिस्त हवी असते.
लैंगिक नैतिकतेविषयी सांगायचे झाल्यास—पालकहो, आपल्या कुटुंबामधले संबंध सभ्यपणाचे असू द्या आणि आपल्या मुलांच्या मनांचा आणि त्यांच्या शरीरांचा आदर करा. पालकांनी मुलांना सांगितलेल्या नैतिक मर्यादा कोणत्या कार्यांमुळे ओलांडले जातात हे मुलांना फार लवकर समजते. घरामध्ये तसेच घराबाहेरही त्यांनी कसे वागावे हे त्यांना शिकवण्याची गरज आहे. तुम्ही असे शिकवले नाही, तर दुसरे कोणी हे काम करील आणि तुम्हाला त्याचे परिणाम कदाचित आवडणार नाहीत. मुलांना कधी नैतिक धोका जाणवलाच तर त्यावेळी काय करावे हे त्यांना शिकवा. गुप्तांगांचा काय उद्देश आहे हे त्यांना सांगा आणि त्यांचा गैरवापर केला जाऊ नये हे त्यांना शिकवा. लोकांनी त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांनी काय करावे हे त्यांना सांगून ठेवा.
तुमची मुले कोठे आहेत आणि त्यांच्यासोबत कोण आहे याची नेहमी माहिती ठेवा. तुमच्या मुलाच्या जवळचे मित्र कोण आहेत? तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या मुलाची काळजी कोण घेते? त्यांच्यावर भरवसा ठेवता येऊ शकतो का? पण याचा अर्थ, पालकांनी सर्वांवरच संशय घ्यावा असे नाही. तुमच्या मुलाच्या जीवनात असलेले प्रौढ कसे आहेत हे योग्यपणे ठरवा; त्यांच्या बाह्य स्वरूपापलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा.
आपल्या मुलांवर भरवशातल्या पाळकांनी, शिक्षकांनी किंवा जवळच्या कौटुंबिक सदस्यांनी अत्याचार केल्याचे ज्या पालकांना फार उशिरा कळाले त्या बिचाऱ्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा. पालक या नात्याने स्वतःला हा प्रश्न विचारणे बरे राहील, ‘माझ्या चर्चमध्ये लहान मुलांवर अत्याचार करण्याची प्रकरणे चालतात का किंवा असली प्रकरणे दाबून टाकली जातात का? माझा धर्म उच्च नैतिक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करत आहे का?’ अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासंबंधी सुज्ञ निर्णय घ्यायला मदत करील.
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना निर्माणकर्त्याची तत्त्वे जाणून घ्यायला व ती प्रिय मानायला मदत करा ज्यामुळे हानीकारक परिणामांपासून त्यांना संरक्षण प्राप्त होईल. आपले पालक उच्च नैतिक तत्त्वांचा आदर करत असताना मुले पाहतात तेव्हा या उत्तम उदाहरणाचे ते अधिक स्वेच्छेने पालन करतील.
एकमेव खरा उपाय
अर्थात, फक्त नियम करून किंवा कडक शिक्षा देऊन मुलांचे संरक्षण होणार नाही. स्वतः निर्माणकर्ता, आपले प्रेरित वचन बायबल याद्वारे पाशवी प्रवृत्तीच्या लोकांची विचारसरणी समाजाच्या प्रेमळ आणि नैतिक लोकांसारखी बदलून सभ्य वर्तणूक आणण्यात यशस्वी ठरू शकतो.
हे शक्य असल्याचे आधीच सिद्ध झाले आहे. असे पुष्कळ आहेत ज्यांनी आपली आधीची लैंगिक स्वैराचारी जीवनशैली सोडून दिली आहे. ते आता देवाच्या वचनाच्या शक्तीचा जिवंत पुरावा देत आहेत. पण हे पाऊल उचलणे योग्य असले, तरीही बहुतांश नीतिभ्रष्ट झालेले अपराधी बदलणार नाहीत. म्हणूनच, यहोवा देवाने असे वचन दिले आहे की, आपल्या मुलांवर अत्याचार करणाऱ्या सर्वांचा लवकरात लवकर या पृथ्वीवरून नाश केला जाईल—त्यांची तत्त्वे, त्यांच्या वासना आणि त्यांचा लोभही त्यांच्यासोबत नष्ट केला जाईल.—१ योहान २:१५-१७.
मग, देवाच्या नवीन जगात, दारिद्र्य नसेल तेव्हा सर्व मुलांना निवांत आणि छळमुक्त बालपण लाभेल जो त्यांना देवाकडून मिळालेला हक्क आहे. याचा अर्थ, फक्त लहान मुलांवरील अत्याचाराचा अंत नव्हे, तर लोकांच्या जीवनासोबत ज्या वेदनामय आठवणी आहेत त्यांचाही अंत होईल: “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.”—यशया ६५:१७.
यास्तव, देवाच्या नवीन जगात एका मोठ्या प्रमाणात येशू ख्रिस्ताच्या या शब्दांना नवीन अर्थ लाभेल: “बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य [पृथ्वीवर अर्थात मानवजातीच्या परादीसमय घरावर सत्ता गाजवणारे] त्यांच्यासारख्यांचेच आहे.”—मत्तय १९:१४.
[९ पानांवरील चित्र]
लैंगिक धोका निर्माण झाल्यास काय करावे हे आपल्या मुलांना हुशारीने शिकवा
[९ पानांवरील चित्र]
उत्तम पालक असणे ही तुमच्या मुलांकरता एक मौल्यवान देणगी आहे
[९ पानांवरील चित्र]
आपल्या मुलांना निर्माणकर्त्याच्या उद्देशांविषयी आणि तत्त्वांविषयी शिकवायला मदत करा
[१० पानांवरील चित्र]
देवाच्या नवीन जगात, सर्व मुले संपूर्ण अर्थाने आपल्या बालपणाचा आनंद लुटतील