वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ३/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वाहन अपघातांत वाढ
  • खरेदीचे व्यसन
  • अस्वच्छ पृष्ठभाग
  • मूतखड्यांचा धोका कमी करणे
  • हिमनद्यांचे वितळणे अधिकाधिक अचंबे
  • धूम्रपानाच्या मूर्खपणाविषयी आणखी माहिती
  • उलगडण्याचे आव्हान
  • यहोवाचे साक्षीदार ईस्टर साजरा का करत नाहीत?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • ईस्टर की स्मारक विधी तुम्ही कोणता साजरा करावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मूतखडे—प्राचीन रोगावर उपचार करणे
    सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
  • जगव्याप्त संकटप्रसंग
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 ३/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

वाहन अपघातांत वाढ

दरवर्षी ५,००,००० लोकांपेक्षा अधिक लोक महामार्गांवर ठार मारले जातात आणि जगभरात वाहन अपघातांमध्ये वाढ होऊ लागली आहे, असे वृत्त फ्लीट मेंटेनन्स ॲण्ड सेफ्टी रिपोर्ट देते. एखाद्या भीषण वाहन अपघातात तुम्ही गोवले जाण्याची केवढी शक्यता आहे? त्या वृत्तानुसार, “‘मोटारी असलेल्या’ देशांमध्ये दरवर्षी २० पैकी निदान १ व्यक्‍ती महामार्गावरील अपघातात ठार मारली जाते अथवा जखमी होते आणि २ पैकी १ व्यक्‍ती आयुष्यात एकदा तरी वाहन अपघातामुळे इस्पितळात असते.“

खरेदीचे व्यसन

“जर्मनीत अधिकाधिक लोकांना मनोविकृत खरेदीचा विकार झाला आहे,” असे वृत्त ग्राफशाफटर नाखरीक्टन हे वृत्तपत्रक देते. आल्फ्रेड गेबेर्ट या व्यापार मनोरुग्ण तज्ज्ञाच्या मते, मनोविकृत खरेदी करणाऱ्‍यांना खेरदी करतेवेळी फार अत्यानंद होत असतो जो खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे देताच नाहीसा होतो. गेबेर्ट यांच्या मते, त्यांच्यात शारीरिक व्यसननिवृत्ती परिणामही दिसून येतात. “ते थरथरतात, त्यांना घाम फुटतो आणि पोटात दुखते.” या कारणास्तव, गरिबांपेक्षा जास्त पगार असलेल्या आणि चांगली आर्थिक सुरक्षा असलेल्या लोकांना याचा अधिक धोका आहे. या व्यसनाच्या संभाव्य कारणांमध्ये ‘एकाकीपणा, कमीपणाची भावना, तणाव आणि कामाच्या ठिकाणासंबंधीच्या समस्या’ देखील समाविष्ट असल्याचे म्हटले जाते. मनोविकारावर मात करण्यासाठी एखादा छंद जोपासावा असा सल्ला गेबेर्ट देतात. गेबेर्ट यांच्या मते, सामाजिक संपर्क विशेषतः महत्त्वाचे आहेत. “बाहेरून मदत घेतली नाही, तर कर्जात बुडाल्यावर आणि बाकी रक्कम काहीच उरत नाही तेव्हाच हे व्यसन लक्षात येते,” असे ते म्हणतात.

अस्वच्छ पृष्ठभाग

असे वाटत नाही पण तुमच्या घरातल्या पाश्‍चात्त्य पद्धतीच्या कमोडची सीट तुमच्या स्वयंपाकघरातल्या कटिंगबोर्डापेक्षा स्वच्छ असेल. अरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी ३० आठवडे १५ घरांमधील सूक्ष्मजंतूंचे निरीक्षण केल्यावर सरतेशेवटी हा निष्कर्ष काढला. या गटाने प्रत्येक घरातल्या १४ ठिकाणांहून नमुने गोळा केले; नळाचे हॅन्डल, सिंकचा पृष्ठभाग, कटिंगबोर्ड, भांडी पुसण्याची फडकी आणि कमोडची सीट अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून. त्यांचे निष्कर्ष? “भांडी पुसण्याच्या फडक्यांतून पिळून काढलेल्या पाण्यात कमोडच्या सीटपेक्षा दहा लाख पटीने अधिक सूक्ष्मजंतू संशोधकांना सापडले,” असे न्यू सायंटिस्ट पत्रिका म्हणते. “भाजी चिरण्याच्या बोर्डावरही तीन पट अधिक सूक्ष्मजंतू होते.” “कमोडच्या सीटवर सूक्ष्मजंतू इतक्या प्रमाणात आढळत नाहीत कारण सीट्‌स कोरड्या असतात आणि सूक्ष्मजंतूंना ओलावा जास्त आवडतो,” हे कारण या अभ्यासाच्या प्रतिनिधी, पॅट रसन यांनी दिल्याचे वृत्त ती पत्रिका देते. स्वच्छता सुधारण्यासाठी रसन असा सल्ला देतात की, भांडी पुसण्याची फडकी आठवड्याच्या आठवड्याला धुतली जावीत. “सिंकमध्ये पाणी भरून त्यात एक कप ब्लीच घालावे, फडके त्यात टाकून १० मिनिटे पाण्यात राहू द्यावे,” असे त्या म्हणतात.

मूतखड्यांचा धोका कमी करणे

सायन्स न्यूझ असे वृत्त देते की, संयुक्‍त संस्थानांमध्ये १९८६ आणि १९९४ दरम्यान ८०,००० परिचारिकांच्या आहारावर निगराणी ठेवलेल्या संशोधकांना आढळले की, मूतखडे न होण्यासाठी काही इतर द्रव्यांपेक्षा फायदेकारक असू शकतात. अभ्यास केलेल्या १७ पेयांपैकी, चहाने मूतखडे होण्याचा धोका ८ टक्क्यांनी कमी झाला, तर नेहमीच्या अथवा कॅफेनचा अंश काढून टाकलेल्या कॉफीमुळे हा धोका ९ टक्क्यांनी कमी झाला. माफक प्रमाणात वाईन घेतल्याने एका व्यक्‍तीला मूतखडे होण्याचा धोका २० किंवा त्याहून अधिक टक्क्यांनी कमी झाला. “गंमत म्हणजे, दररोज चकोतऱ्‍याचा ८ आऊन्स रस घेतल्याने मूतखडे होण्याचा धोका ४४ टक्क्यांनी एकदम वाढला,” असे अभ्यासात दिसून आले. “इतर कोणत्याच पेयाचा इतका प्रतिकूल परिणाम झाला नाही.” बॉस्टन येथील वृक्करोग तज्ज्ञ आणि रोगपरिस्थितीविज्ञान तज्ज्ञ डॉ. गॅरे कर्हन यांचे हे शब्द उद्धृत करण्यात आले: “पेय घेण्यामध्ये थोडाफार फेरबदल केल्याने फरक पडू शकतो,” पण सर्वसाधारण उपचाराचा भाग म्हणूनच.

हिमनद्यांचे वितळणे अधिकाधिक अचंबे

आल्प्स येथील हिमनद्या उष्ण तापमानाने वितळत असल्यामुळे तेथे नवलाईच्या गोष्टी सापडू लागल्या आहेत. सन १९९१ मध्ये, ऑस्ट्रो-इटालियन सीमेवर बर्फ वितळल्याने एका पूर्व ऐतिहासिक शिकाऱ्‍याचे प्रेत सापडले. ऑगस्ट १९९८ मध्ये, इतर शोधलेल्या गोष्टी—सैनिकांचे अवशेष, स्फोट न झालेले हातगोळे आणि बॉम्ब—बाहेर काढण्यासाठी उत्तर इटलीतल्या अधिकाऱ्‍यांना डोंगराच्या काही भागांमध्ये प्रवेश निषेध करावा लागला. या सर्व वस्तू पहिल्या महायुद्धाच्या काळातल्या आहेत; त्यावेळी तो भाग इटालियन आणि ऑस्ट्रियन सैनिकांमधील कडाक्याच्या लढाईची रंगभूमी बनला होता. तो भाग साफ करत असताना, “सर्व रहिवाशांना आणि विशेषतः पर्यटक व गिर्यारोहकांना इशारा देण्यात आला होता की त्यांनी जास्त काळजी घ्यावी” आणि मार्गांविषयी अधिकाऱ्‍यांशी विचारपूस करावी, असे कोरियर डेला सेरा या ईटालियन वृत्तपत्रात म्हटले होते कारण “केव्हाही स्फोट होण्याचा धोका असतो.” बहुतेक वस्तू फार धोकेदायक असून ज्यांना त्या सापडतात ते एकतर ठार मारले जात आहेत किंवा जखमी होत आहेत.

धूम्रपानाच्या मूर्खपणाविषयी आणखी माहिती

नेदरलँड्‌स येथे अलीकडेच झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले होते की, “धूम्रपान करण्यामुळे छिन्‍नमानस आणि आल्झायमर्झ रोग होण्याचा धोका दुप्पटीहून अधिक वाढतो,” असा अहवाल इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून देते. ५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या ६,८७० लोकांवर केलेल्या अभ्यासातून हे प्रकट झाले की, कधीही धूम्रपान न करणाऱ्‍या लोकांपेक्षा धूम्रपान करणाऱ्‍या लोकांना आल्झायमर्स रोग होण्याची २.३ पटीने अधिक शक्यता असते. धूम्रपान सोडून दिलेल्या लोकांना, धूम्रपान कधीही न करणाऱ्‍या लोकांपेक्षा जरा अधिक धोका होता. मेंदूच्या पेशींचा ज्यामध्ये हळूहळू नाश होतो तो आल्झायमर्स रोग “छिन्‍नमानस हा सर्वात सर्रास आढळणारा प्रकार आहे.”

उलगडण्याचे आव्हान

“हिंद लोकांनी जे लिहिले त्याचा उलगडा करणाऱ्‍या व्यक्‍तीला कदाचित नोबेल पुरस्कार मिळण्याची संभावना आहे,” असे इंडिया टुडे ही पत्रिका म्हणते. “ब्राँझ युगातील इटलीतल्या इट्रुस्कनसोबत ही शेवटली लिपी आहे जिचा उलगडा अजूनही व्हायचा आहे.” त्याचे एक कारण असे आहे की, सांकेतिक अक्षराचा उलगडा करणारी एकही द्वीभाषीय हस्तनिर्मिती अजून सापडलेली नाही. नेपोलियनच्या लोकांना चित्रलिपीत, डेमोटिक ईजिप्शियन आणि ग्रीकमध्ये कोरलेला रोझेट्टा दगड मिळाल्यानंतर, ईजिप्शियन चित्रलिपीचा उलगडा झाला. हेन्री रॉलिन्सनला बेहिस्टुन शिलालेख सापडला तेव्हा त्याने सुमरच्या कीलाकार लिपीचा उलगडा केला कारण त्यावर आवश्‍यक ते धागेदोरे त्याला सापडले. आतापर्यंत हिंद लोकांच्या लिखाण पद्धतीबद्दल फारसा पुरावा मिळालेला नाही, इतकीच माहिती उपलब्ध आहे की ते—लिखाणातील रेषांनी स्पष्ट झाल्याप्रमाणे—उजवीकडून डावीकडे लिहायचे शिवाय त्यांची लेखनपद्धत शब्दावयवांवर आधारलेली होती. विशेषतः खोबणांच्या बनलेल्या या लिपीत सुमारे ४१९ खुणा आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा