वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 २/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • तणाव, चांगला आणि वाईट
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनो गत
    सावध राहा!—१९९९
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 २/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

जातीसंस्था मी १२ वर्षांची आहे आणि जातीसंस्था या विषयावर मला कालच शाळेत गृहपाठ करण्यासाठी दिला होता; आणि आज नेमकं त्याच विषयावरचा “ख्रिस्ती लोक आणि जातीयता” हा तुमचा लेख मला मिळाला. (एप्रिल ८, १९९८) माझे पूर्वज भारतीय असल्यामुळे याविषयी मला जास्त माहिती नाही; शिवाय, माझ्या शाळेच्या पुस्तकांत देखील यावर फारशी माहिती दिलेली नाही. तुम्ही मात्र यावर अगदी सविस्तर माहिती दिली आहे.

एस. एस. एन., अमेरिका

तणावावर नियंत्रण करणे थकवा, शिणवटा आणि तणावपूर्ण थकवा यांचा सामना कसा करावा यावर लोकप्रिय मासिकांतले अनेक लेख मी वाचले आहेत. हे लेख वाचल्यावर मला असं वाटू लागतं आपण अगदीच कामातून गेलो की काय! पण, तणावाचा सामना करण्यासाठी तुम्ही दिलेल्या १५ उपयुक्‍त सल्ल्यांपैकी एकही हार मानण्यास किंवा निवृत्ती घेण्यास प्रवृत्त करणारा नव्हता. (“तणावावर नियंत्रण करणे अशक्य नाही!,” एप्रिल ८, १९९८) उलट, दैनंदिन जगण्याच्या झगड्यातही तणाव कसा कमी करता येईल हेच त्यात दाखवून दिले होते.

जे. बी., बोलिव्हिया

गेल्या अनेक दिवसांपासून मी अतिशय चिंताग्रस्त आहे; त्यामुळे तुमचे हे लेख अगदी योग्य वेळी आले. मी एक पूर्ण-वेळेची सुवार्तिक असल्यामुळे अशा समस्या मला येऊ नयेत असंच मला वाटत होतं. पण मी हे लेख वाचताना मला अश्रू आवरले नाही. यहोवा आपल्या सेवकांची काळजी घेतो आणि आपण काय सोसत आहोत हे त्याला समजतं याची मला जाणीव झाली.

डी. एम., इटली

मला नेमकी याचीच गरज होती; मला तणावाशी संबंधित असणारा सोरिॲसिस नावाचा रोग आहे. कधीकधी मला असं वाटतं, की यहोवाला माझी काळजी नाही. पण तुमच्या लेखानं मला दाखवून दिलं की हे खरं नाही. उलट, त्याला माझी खरंच काळजी आहे; म्हणून तर त्यानं तणावाविषयी हवी असलेली सर्व माहिती मला पुरवली.

एस. एस. ब्राझील

“पीटीएसडी—असामान्य अनुभवाला सामान्य प्रतिक्रिया” या शीर्षकाखाली बॉक्समध्ये दिलेल्या माहितीबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानू इच्छिते. मला लहानपणी अतिशय वाईट अनुभव आले; बालपणाच्या त्या दुखद आठवणी मी कधीच विसरू शकत नसले तरी तुमचे लेख वाचून मला खूप सांत्वन मिळालं.

आर. एन., अमेरिका

तुमचे हे लेख मला अतिशय माहितीपूर्ण वाटले. आज सैतानाकडून येणारे दबाव वाढत असल्यामुळे सत्यात टिकून राहण्याकरता आपल्याला अशाच माहितीची गरज आहे. यावरून तुम्ही आमच्या समस्यांची दखल घेता आणि त्यांचा सामना करण्यासाठी आवश्‍यक मदत पुरवता याची जाणीव मला झाली.

व्ही. टी., फिजी

अभ्यासात प्रगती सध्या मी शाळेत शिकत आहे आणि “तरुण लोक विचारतात . . . मला अभ्यासात प्रगती करता येईल का?” (एप्रिल ८, १९९८) या लेखासाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते. मला सहसा बऱ्‍यापैकी गुण मिळतात. पण आपण याहीपेक्षा जास्त प्रगती करू शकतो असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण हा लक्षवेधक आणि प्रेरणादायक लेख वाचून माझी पूर्ण खात्री पटली आहे, की गाठता येण्याजोगी ध्येय डोळ्यापुढे ठेवली तर मी अभ्यासात आणखीन प्रगती करू शकते.

बी. आर., अमेरिका

मी १४ वर्षांची आहे. अभ्यास कसा करावा हे मला खरंच कधीच समजलं नव्हतं. काही विषयांचा भविष्यात अजिबातच उपयोग होणार नसल्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यात अर्थ नाही असा माझा ग्रह होता. पण हा लेख वाचून मी माझा विचार बदलला आहे. आणि अभ्यास कसा करावा याविषयावर अगदी व्यावहारिक मार्गदर्शन दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते!

के. एफ., जपान

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा