वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ११/८ पृ. १८
  • सापांविषयी सहसा असलेले गैरसमज

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सापांविषयी सहसा असलेले गैरसमज
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • नागाला भेटावयास तुम्हाला आवडेल का?
    सावध राहा!—१९९६
  • श्रीलंकेतील आवाज ऐकणारे नाग
    सावध राहा! माहितीपत्रक १३-३ (gbr13-3)
  • पितळेचा साप
    बायबल कथांचं माझं पुस्तक
सावध राहा!—१९९८
g98 ११/८ पृ. १८

सापांविषयी सहसा असलेले गैरसमज

भारतामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

त्या मुलीने जाईच्या फुलांचा गजरा घातला होता; फुलांच्या सुगंधाने नाग तिच्याजवळ सरसावत गेला. त्याचे अंग ओलसर चिकट वाटत होते. समुद्राच्या लाटांसारखा तो पुढे सरकत गेला. त्याच्या डोक्यावरती तिला एक चकाकणारा मणी दिसला; तिच्या डोळ्यात पाहून त्याने तिला मंत्रमुग्ध करून टाकले. आणि तिच्या अंगावर झेप टाकून हातावर दंश केला.

ही वस्तुस्थिती आहे की कथा? वरती दिलेले वर्णन हे साफ खोटे आहे; हे लोकांचे गैरसमज आहेत. यातील काही गैरसमज पाहा.

१. जाईची फुले, चंदन आणि इतर सुगंधांमुळे साप आकर्षित होतात. खोटे. या वासांमुळे किडे आकर्षित होतात, किड्यांमुळे बेडके आणि बेडकांमुळे साप आकर्षित होतात कारण साप बेडकांना खात असतात.

२. समुद्राच्या लाटांसारखे वर खाली होऊन साप पुढे सरकतात. खोटे. साप मोठमोठाल्या खडकांवरून सरपटतात तेव्हा असे भासते. नाग किंवा जमिनीवरचे इतर साप सहसा नागमोडी पद्धतीने सरळ पुढे सरपटत जातात. एकतर, ते शरीराचा समोरचा भाग पुढे नेऊन मग मागचे शरीर खेचतात किंवा खरबुड्या जमिनीवर वळसे घेत पुढे सरकतात, इंग्रजीतल्या एस अक्षराप्रमाणे.

३. काही सापांच्या डोक्यावर एक मौल्यवान मणी असतो. खोटे. ही एक दंतकथा असून लोकांचा असाही गैरसमज आहे की, प्राचीन भारतात साप महापुरुषांचे संरक्षण करायचे.

४. नाग आपल्या सावजाला मंत्रमुग्ध करतात. खोटे. सहसा, साप घाबरतो तेव्हा तो एकटक पाहत राहतो म्हणून लोकांसमोर साप आला तर त्यांना वाटते की, तो एकटक पाहून मंत्रमुग्ध करतो. शिकार करताना साप सावजाकडे असा एकटक पाहत नाही.

५. नाग सावजावर झेप घेतात. खोटे. हल्ला करताना नाग शरीराचा समोरचा भाग पुढे फेकतो, पण तोल ठेवण्यासाठी त्याच्या शरीराचा अर्धाअधिक भाग जमिनीवरच असतो. जास्तीत जास्त, एक तृतीयांश शरीर मागे घेतले जाते आणि हल्ला केला जातो.

६. नागाची आणि इतर सापांची कातडी नेहमी चिकट आणि थंड असते. खोटे. खवल्या असलेल्या सापांची कातडी कोरडी असते आणि हात लावल्यावर मऊ चामड्यासारखी वाटते. सापांचे शरीर अनियततापी असते; बाहेरील तापमानानुसार त्यांच्या शरीराचे तापमान बदलत असते.

७. नागांना ऐकू येत नाही. खोटे. अनेकांचा हा गैरसमज आहे. त्यांना वाटते की जमिनीत होणारी कंपनेच त्याला जाणवतात. स्तोत्र ५८:४, ५ येथे बायबल अगदी अचूकपणे म्हणते की, नाग हे बहिरे नाहीत. अलीकडील संशोधनानुसार, नागांना हवेतून वाहणारे ध्वनी देखील ऐकू येतात आणि गारुड्याच्या संगीतावर ते डोलतात.—जुलै २२, १९९३ चे सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठ ३१ देखील पाहा.

[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]

Top snake: Animals/Jim Harter/Dover Publications, Inc.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा