वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-3 पृ. १६
  • श्रीलंकेतील आवाज ऐकणारे नाग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • श्रीलंकेतील आवाज ऐकणारे नाग
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-३ (gbr13-3)
  • मिळती जुळती माहिती
  • नागाला भेटावयास तुम्हाला आवडेल का?
    सावध राहा!—१९९६
  • सापांविषयी सहसा असलेले गैरसमज
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९७
सावध राहा! माहितीपत्रक १३-३ (gbr13-3)
gbr13-3 पृ. १६

श्रीलंकेतील आवाज ऐकणारे नाग

“बहिऱ्‍या नागासारखे आपले कान झाकून घेतात. मांत्रिकाचा आवाज म्हणजे हुशारीने मंत्र घालणाऱ्‍याचे शब्द हे साप ऐकत नाहीत.”—स्तोत्रसंहिता ५८:४, ५.

न्यू यॉर्क टाईम्स्‌ मध्ये, जानेवारी १०, १९५४ रोजी, “संगीताने साप ‘मोहित’ होतात का?” ह्‍या शीर्षकाखाली स्तोत्रसंहिता ५८:४, ५ वर पुढील अहवाल सापडतो: “डॉक्टर डेवीड आय. मॉक्ट बाल्टिमोर, [अमेरिका] मधील माउन्ट सायनाय हॉस्पिटलमध्ये संशोधन करून औषधे बनविणारे नागसर्पाच्या विषावर जगातील प्रमुख अधिकारी आहेत. (काही प्रसंगी, नागसर्पाचे विष रक्‍ताच्या अव्यवस्थेवर औषध म्हणून स्वीकारले जाते.) डॉ. मॉक्ट यांनी असे कळवले की नाग आणि त्यांच्या विषाबद्दल सतत परीक्षण केल्याने, भारताच्या विविध भागातील आणि उच्च शिक्षित, अशा अनेक हिंदू वैद्यांबरोबर त्यांचा परिचय झाला. सर्वांनी मान्य केले की नाग, पुंगी किंवा बासरी यांच्या संगीताला प्रतिसाद देतात. इतर कोणत्याही प्रकारच्या संगीतापेक्षा विशिष्ट प्रकारचे संगीत प्राण्यांना चेतवते असे त्या वैद्यांनी सांगितले. ते म्हणतात की खेड्यापाड्यांमध्ये सूर्यास्तानंतर बाहेर खेळणाऱ्‍या भारतीय मुलांना गाणे गाण्यास मना करण्यात येते कारण त्यामुळे नाग आकर्षित होतात. डॉ. मॉक्ट यांनी असे विवेचन मांडले की शेकस्पीयर, यांनी वारंवार सर्प बहिरे आहेत असा उल्लेख केला . . . वारंवार त्यांचा केवळ हा सर्वसामान्य गैरसमज होता. उलटपक्षी, डॉ मॉक्ट म्हणाले की, स्तोत्रकर्त्याने, स्तोत्रसंहिता ५८ अध्याय आणि ५व्या वचनात, विरूद्ध अर्थाने काढलेले उद्‌गार बरोबर आहे की सर्पांना ऐकू येते.”

याचप्रमाणे, जिमेक्स टिर सिलमेन्ज टिरवेल्ट जुलै १९८१, पृ. ३४, ३५ या जर्मन प्राणीशास्त्र मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात (जिमेक्स ॲनिमल, सिलमेन्ज ॲनिमल वर्ल्ड) तो लेखक एका नागाविषयी सांगतो जो श्रीलंका येथील त्याच्या मालकीच्या जागेत वाळवींच्या वारुळात राहात होता. त्याने एका गारुड्याला तो जंगली साप पडकण्यास व त्याला नाचवण्यास सांगितले. तो लेखक असे कळवतो: “मी माझ्या पाहुण्याला खात्रीपूर्वकतेने सांगितले की तेथे नाग राहात आहे, तेव्हा तो त्या वारुळाच्या समोर बसला आणि त्याची पुंगी वाजवू लागला. फार वेळानंतर—काही होईल असा माझा विश्‍वासच नव्हता—त्या नागाने बिळातून अनेक सेंटीमीटर वर आपले डोके काढले. तो साप त्याचे तोंड उघडण्याच्या आतच गारुड्याने त्यावर झडप घातली व त्याच्या दोन बोट व अंगठ्यामध्ये त्याने त्याचे डोके पकडले.” त्यानंतर त्या भारतीय व्यक्‍तीने त्या सापाला नाचावयास लावले.

यास्तव, नागाला “मंत्र घालणाऱ्‍याचे शब्द” ऐकू येतात याचा पुरावा मिळतो.—न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफरेंसेस, अप्पेंडीक्स ७ए, पृष्ठ १५८३. (g93 7/22)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा