वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १०/८ पृ. ८-१०
  • जीवनात आशेला आणि प्रेमाला पालवी फुटते तेव्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवनात आशेला आणि प्रेमाला पालवी फुटते तेव्हा
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मित्र आणि इतर प्रौढ मदत करू शकतात
  • आत्महत्या करण्यापासून बचावलेले
  • अकाली मृत्यू—पुन्हा कधीच नाही!
  • आत्महत्या—तरुणांवर शाप
    सावध राहा!—१९९८
  • जीवन जगण्याची उर्मी मिळते
    सावध राहा!—२०००
  • आत्महत्या हे उत्तर आहे का?
    सावध राहा!—१९९४
  • जीवनात आशा आणि प्रेम उरत नाही तेव्हा
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १०/८ पृ. ८-१०

जीवनात आशेला आणि प्रेमाला पालवी फुटते तेव्हा

किशोरवयीनांशी व्यवहार करणाऱ्‍या पालकांना, शिक्षकांना आणि इतरांना हे लक्षात येते की, ते स्वतः किंवा युवक किंवा इतर कोणतीही व्यक्‍ती जगामध्ये बदल घडवून आणू शकत नाही. उधाणेच्या लाटेसारखे कोणालाही रोखता न येणारे प्रभाव आज क्रियाशील आहेत. तरीही, तरुणांनी आनंदी, स्वस्थ जीवन जगावे आणि परिस्थितीशी जुळवून घ्यावे म्हणून आपण आपल्या परीने त्यांची पुष्कळ मदत करू शकतो.

इलाजापेक्षा प्रतिबंध बरा असे म्हणतात. म्हणून, आपल्या जीवनशैलीचा आणि प्राधान्यांचा आपल्या मुलांच्या मनोवृत्तीवर आणि वर्तणुकीवर कसा परिणाम घडेल याचा पालकांनी काळजीपूर्वक विचार करावा. मुलांच्या आत्मनाशक प्रवृत्तीवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे घरात प्रेमाचे, आपुलकीचे वातावरण ठेवणे. कोणी आपले नीट लक्ष देऊन ऐकेल अशा व्यक्‍तीची युवकांना अत्यंत गरज असते. पालकांनी त्यांचे ऐकले नाही, तर कोणा भलत्यासलत्यांकडे हे युवक आपले मन मोकळे करतील अशी शक्यता आहे.

पालकांसाठी त्याचा आज काय अर्थ होतो? तुमच्या मुलांना वेळ हवा असतो तेव्हा अर्थात ते लहान आहेत तेव्हा त्यांना वेळ द्या. अनेक कुटुंबांना हे जमत नाही. घरखर्च भागवता भागवता त्यांच्या नाकी नऊ येण्याची पाळी येते; दोघांनाही नोकरी करण्याशिवाय पर्याय नसतो. आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवण्याची ज्यांना इच्छा आहे आणि ज्यांनी त्यासाठी त्याग केला आहे त्यांना पुढे जाऊन आपल्या लेकरांच्या जीवनाचे सार्थक झालेले पाहायची धन्यता लाभली आहे. परंतु आधी सांगितल्याप्रमाणे, पालकांनी आपल्या परीने काहीही उणे पडू दिले नाही, तरी मुलांसोबत गंभीर समस्या उद्‌भवू शकतात.

मित्र आणि इतर प्रौढ मदत करू शकतात

ज्या युवकांनी युद्ध, बलात्कार व अत्याचार अनुभवला आहे अशांना या धक्क्यातून सावरण्याकरता त्यांची मनापासून काळजी घेणाऱ्‍या प्रौढांना नेहमीपेक्षा जास्त प्रयत्न करावा लागतो. असल्या भयंकर अनुभवांतून गुजरलेले युवक कदाचित दिल्या जाणाऱ्‍या मदतीची कदरही करणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला बराच वेळ द्यावा लागेल आणि परिश्रम घ्यावा लागेल. अशांना टाकून बोलणे किंवा त्यांना झिडकारणे सुज्ञतेचे किंवा प्रेमळपणाचे ठरणार नाही. अशा या तरुणांची प्रेमाने आणि दयाळूपणाने काळजी घेण्याइतके आपले मन आपल्याला मोठे करता येणार नाही का?

पालकांनीच नव्हे तर मित्रांनी आणि भावंडांनी सुद्धा या लहानग्यांची हळवी आणि असंतुलित मनोवस्था होत आहे का हे ओळखण्यात सतर्क असावे. (“प्रशिक्षित लोकांकडून मदत आवश्‍यक,” पृष्ठ ८ वरील पेटी पाहा.) असली काही लक्षणे दिसून आलीत, तर त्यांना मन मोकळे करावेसे वाटते तेव्हा त्यांचे ऐकून घ्या. शक्य असल्यास, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा; तुम्हाला त्यांच्याविषयी खरीच आपुलकी वाटते याची खात्री पटावी म्हणून त्यांच्या भावना दुखावणार नाहीत असेच प्रश्‍न त्यांना विचारा. भरवशातले मित्र आणि नातेवाईक पालकांना परिस्थिती हाताळायला मदत करू शकतील; परंतु, त्यांनी स्वतः पालक होऊन बसू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. बहुतेकदा, युवकांना कोणा इतरांचे नव्हे, तर पालकांचे लक्ष हवे असते म्हणून त्यांची ही आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असते.

आनंदी भविष्याबद्दल कधीही न ढळणारी आशा, जगण्याची एक प्रेरणा ही या युवकांना सर्वात मोठी देणगी असू शकते. अनेक युवकांनी, लवकरच येणाऱ्‍या उत्तम जगाच्या बायबलमधील अभिवचनांची सत्यता ओळखून घेतली आहे.

आत्महत्या करण्यापासून बचावलेले

नेहमी आत्महत्या करण्याचा विचार करत असलेल्या जपानमधील एका स्त्रीने असे म्हटले: “कितीतरी वेळा मला आत्महत्या करावंसं वाटलं. मी फार लहान असताना, एका भरवशाच्या व्यक्‍तीनेच माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. . . . ‘मला मरायचंय’ अशा चिठ्ठ्या मी इतक्यांदा लिहिल्या आहेत की किती चिठ्ठ्या लिहिल्या असतील हे मलाच नेमकं आठवत नाही. मग, मी यहोवाची साक्षीदार झाले, मी आता पूर्ण वेळेची सुवार्तिक म्हणून काम करते पण अजूनही अधूनमधून मला स्वतःचा जीव घ्यावासा वाटतो. . . . यहोवाने मात्र मला आतापर्यंत जिवंत ठेवलंय आणि तो मला प्रेमाने ‘तू मरू नकोस’ असं सांगत असल्यासारखं वाटतं.”

रशिया येथील एका १५ वर्षांच्या मुलीने म्हटले: “मी आठ वर्षांची होते तेव्हा, मी कोणालाच नकोय असं मला वाटू लागलं. माझ्या आईवडिलांना माझ्यासोबत बोलायला सुद्धा सवड नव्हती, मग मीच माझ्या समस्या सोडवायचा प्रयत्न करायचे. लोकांच्यात मिळणं-मिसळणं सोडून दिलं; एकटी-एकटीच राहू लागले. माझ्या नातेवाईकांशी नेहमी भांडणं करत राहायचे. मग आत्महत्येचा विचार माझ्या डोक्यात घोळू लागला. पण मी यहोवाच्या साक्षीदारांना भेटले याचा मला किती आनंद होतोय म्हणून सांगू!”

ऑस्ट्रेलियातील ३०-३५ वर्षांच्या कॅथीचे हे उत्तेजनात्मक बोल आहेत, आणि त्यावरून दिसून येते की निराशेचा बदल आशेत होऊ शकतो: “मी आत्महत्येच्या अनेक प्रकारांचा विचार करायचे आणि शेवटी मी प्रयत्न केलाच. दुःख, राग आणि पोकळपणा भरलेल्या या जगातून मला सुटका हवी होती. मला एका ‘कोळ्याच्या जाळ्यात’ अडकल्यागत वाटायचं आणि खिन्‍नतेमुळे या जाळ्यातून बाहेर पडणं अधिकच कठीण होऊन बसलं होतं. म्हणून, आत्महत्या हाच एक मार्ग दिसत होता.

“पृथ्वी एक सुंदर बगिचा बनेल आणि त्यात सर्वजण शांतीने, आनंदाने नांदतील हे जेव्हा मी प्रथमच ऐकलं तेव्हा मला ती हवीहवीशी वाटू लागली. हे एक स्वप्न आहे आणि ते कधीच पूर्ण होणार नाही असं वाटायचं. पण, जीवनाबद्दल यहोवाला काय वाटते, त्याच्या नजरेत आपण प्रत्येकजण किती मोलवान आहोत हे मला हळूहळू कळू लागलं. मग मला भविष्यात आशेचा किरण दिसू लागला. शेवटी, त्या ‘कोळ्याच्या जाळ्यातून’ बाहेर पडण्याचा मार्ग मला सापडला. पण, त्यातून बाहेर निघणं सोपं नव्हतं. कधीकधी खिन्‍नतेने मी इतकी भारावून जायचे आणि मग मला काय करावं ते कळायचं नाही. तरीही, माझ्या जीवनात यहोवाला सर्वात महत्त्वाचे स्थान दिल्यामुळे, मी त्याच्या समीप जाऊ शकले आणि मला सुरक्षित वाटू लागलं. यहोवाने माझ्यासाठी जे जे केलंय त्यासाठी मी त्याचे आभार मानते.”

अकाली मृत्यू—पुन्हा कधीच नाही!

भविष्यात काहीतरी उत्तम—ख्रिस्ती प्रेषित पौलाने ज्यास “खरे जीवन” म्हटले ते वाढून ठेवलेले आहे हे बायबलच्या अभ्यासाद्वारे एका तरुण व्यक्‍तीला कळेल. पौलाने तरुण तीमथ्याला असा सल्ला दिला: “धनवानांस निक्षून सांग की, . . . चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी; चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; . . . जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.”—१ तीमथ्य ६:१७-१९.

खरे तर पौलाच्या सल्ल्याचा अर्थ हा आहे की, आपण इतर लोकांकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांना भविष्याविषयी कधीही न ढळणारी आशा बाळगण्यास मदत केली पाहिजे. “नवे आकाश व नवी पृथ्वी” असलेल्या आपल्या नवीन जगात यहोवाने “खरे जीवन” देण्याचे वचन दिले आहे.—२ पेत्र ३:१३.

सुरवातीला संकटात सापडलेल्या अनेक युवकांना आता हे कळून चुकले आहे की, मादक औषधांचा दुरुपयोग आणि अनैतिक जीवनशैली, मरणाकडे वळसे घेत जाणारा लांबलचक रस्ता आहे आणि आत्महत्या ही मात्र शॉर्टकट आहे. हे जग आणि त्यातील युद्धे, द्वेष, अत्याचारी वागणूक, प्रेमहीन व्यवहार सगळे नाहीसे केले जातील हे त्यांना समजले आहे. या जगाच्या व्यवस्थेचा अंत निश्‍चित आहे हे त्यांना कळाले आहे. देवाचे राज्य ही एकमेव आशा आहे आणि तेच राज्य एका नवीन जगाची स्थापना करील जेथे केवळ तरुणांनाच नव्हे तर सर्व आज्ञाधारक मानवांना कधीच मरावे लागणार नाही—इतकेच काय तर, मरावेसे वाटणारही नाही.—प्रकटीकरण २१:१-४.

[८ पानांवरील चौकट]

प्रशिक्षित लोकांकडून मदत आवश्‍यक

दि अमेरिकन मेडिकल असोसिएशन एन्सायक्लोपिडिया ऑफ मेडिसिन म्हणते की, “९० टक्के आत्महत्या मनोरोगांमुळे संभावतात.” तीव्र विषाद (सुमारे १५ टक्के), सीझोफ्रेनिया (सुमारे १० टक्के), मद्यासक्‍ती (सुमारे ७ टक्के), समाजविरोधी व्यक्‍तिमत्त्वाची विकृती (सुमारे ५ टक्के) आणि न्यूरोसिसचा एक प्रकार (५ टक्क्यांहून कमी) या आजारांची नावे देण्यात आली. ते सल्ला देते: “आत्महत्या करण्याच्या सर्व प्रयत्नांना गंभीर लेखावे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेले २० ते ३० टक्के लोक एका वर्षाच्या आत पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.” डॉ. जान फॉसेट लिहितात: “[संयुक्‍त संस्थानांत] ५० हून अधिक टक्के आत्महत्या करणाऱ्‍या व्यक्‍ती अशा असतात ज्यांनी मनोदोषचिकित्सकाची मदत घेतलेली नसते.” आणखी एका माहितीपत्रकात म्हटले आहे: “सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित व्यक्‍तीने कारणीभूत असलेल्या खिन्‍नतेवर उपचार करण्यासाठी होता होईल तितक्या लवकर मानसशास्त्रज्ञाची भेट घ्यावी.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा