वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ७/८ पृ. ५-७
  • देवाच्या अथवा पशूच्या प्रतिरूपात?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या अथवा पशूच्या प्रतिरूपात?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जनावरांपासून आपण कोणत्या बाबतीत वेगळे आहोत
  • मिटवता न येण्याजोगा दरा
  • बिन बुडाचा सिद्धान्त
  • विनाशकारी परिणाम
  • निर्मितीची उपासना की निर्माणकर्त्याची?
  • उत्क्रांतीची न्यायचौकशी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • आपण मानव कोण आहोत?
    सावध राहा!—१९९८
  • प्राणी मेल्यानंतर स्वर्गात जातात का?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • तुमचे जीवन—त्याचा काय उद्देश आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
सावध राहा!—१९९८
g98 ७/८ पृ. ५-७

देवाच्या अथवा पशूच्या प्रतिरूपात?

पहिला मानव, आदाम याला “देवाचा पुत्र” असे संबोधण्यात आले होते. (लूक ३:३८) कोणत्याही जनावराला ही प्रतिष्ठा मिळालेली नाही. तरीसुद्धा, बायबल हे दाखवून देते, की मानवांमध्ये आणि जनावरांमध्ये बरेच साम्य आहे. उदाहरणार्थ, मानव आणि जनावरे हे दोघेही प्राणी आहेत. देवाने आदामाला बनवले तेव्हा, “मनुष्य जीवधारी प्राणी झाला” असे उत्पत्ति २:७ म्हणते. (तिरपे वळण आमचे.) पहिले करिंथकर १५:४५ येथेही असाच विचार सांगितला आहे की: “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला.” (तिरपे वळण आमचे.)

जनावरांविषयी उत्पत्ति १:२४ येथे बायबल म्हणते: “प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो.” (तिरपे वळण आमचे.) तर एका बाजूला, देवाच्या प्रतिरूपात आपली निर्मिती केली आहे हे प्रकट करून बायबल मानवांना प्रतिष्ठा देते; परंतु त्याचवेळी जनावरांसारखे आपणही पृथ्वीवरील प्राणी आहोत या कनिष्ठ स्थानाची आठवण देखील बायबल आपल्याला करून देते. तरीही, मानव आणि पशू यांच्यात आणखी एक समानता आहे.

बायबल स्पष्टीकरण देते: “मनुष्यसंतानांस घडते ते पशूंस घडते, त्यांना तर एकच गोष्ट घडते; जसा हा मरतो तसाच तोहि मरतो, . . . तर पशूंपेक्षा मनुष्याला काही श्रेष्ठता नाही, . . . सर्व एकाच स्थानाकडे जातात; सर्व धुळीतून उत्पन्‍न झालेले आहेत, आणि सर्व फिरून धुळीस मिळतात.” होय, मेल्यावर मानव आणि जनावरे यांची एकच गत होते. दोघेही, ‘मातीला,’ “धुळीस” जाऊन मिळतात जेथून ते आले.—उपदेशक ३:१९, २०; प्रारंभ [उत्पत्ती] ३:१९, पं.र.भा.

पण मरणाविषयी मानव इतके त्रस्त का आहेत? अनंतकाळ जगण्याची आपल्याला उत्कट इच्छा का असते? शिवाय आपल्या जीवनात काही उद्देश असावा असे आपल्याला का वाटते? निश्‍चितच, जनावरांमध्ये आणि आपल्यात जमीन अस्मानाचा फरक आहे!

जनावरांपासून आपण कोणत्या बाबतीत वेगळे आहोत

खाणे, झोपणे आणि संतती उत्पन्‍न करणे इतकाच जीवनाचा उद्देश असता तर तुम्ही आनंदी असला असता का? क्रमविकासवादाच्या कट्टर समर्थकांना देखील हा विचार नकोसा वाटतो. क्रमविकासवादी टी. डबझान्स्की लिहितात, “हा सुसंकृत नास्तिकवादी आणि अज्ञेयवादी, आधुनिक माणूस देखील जुन्यापुराण्या प्रश्‍नांचा निदान मनातल्या मनात तरी विचार केल्याशिवाय राहत नाही: जिवंत राहण्याव्यतिरिक्‍त आणि जीवनाचे हे चक्र चालू ठेवण्याव्यतिरिक्‍त माझ्या जीवनाला काही अर्थ आणि उद्देश आहे का? मी ज्या विश्‍वात राहतो त्याला काही अर्थ आहे का?”

खरे तर, निर्माणकर्त्याचे अस्तित्व नाकारल्यावरही जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी मानवाच्या प्रयत्नांचे समाधान होत नाही. रिचर्ड लिकी, इतिहासकार आरनॉल्ड टाईन्बी यांचे शब्द उद्धृत करून लिहितात: “[मानवाच्या] या आध्यात्मिक क्षमतेमुळे, तो ज्या विश्‍वात जन्मला त्या विश्‍वासोबत स्वतःचा मेळ बसवण्याचा आयुष्यभर संघर्ष करत राहतो.”

तरीही, मानवी स्वभाव, आपली उत्पत्ती आणि आपली आध्यात्मिकता यांविषयीचे मूलभूत प्रश्‍न तसेच्या तसेच राहतात. मानव आणि जनावरे यांमध्ये एक मोठा दरा असल्याचे उघडच आहे. हा दरा केवढा आहे?

मिटवता न येण्याजोगा दरा

क्रमविकासवादाच्या सिद्धान्ताची एक मूलभूत समस्या म्हणजे, मानव आणि जनावरांमधील भलामोठा दरा. खरेच हा दरा केवढा रुंद आहे? खुद्द क्रमविकासवाद्यांनी त्याविषयी काय उद्‌गार काढले त्याचे जरा परीक्षण करा.

क्रमविकासवादाच्या सिद्धान्ताचे १९ व्या शतकातले एक प्रसिद्ध समर्थक थॉमस एच. हक्सली यांनी लिहिले: “मानव आणि पशू . . . यांच्यातील दरा केवढा रुंद आहे याची जितकी पक्की खात्री मला झाली आहे तितकी कोणालाही पटलेली नसेल . . . , कारण केवळ त्यालाच [मानवालाच] स्पष्ट आणि तर्कशुद्ध भाषा बोलण्याची अद्‌भुत क्षमता आहे [आणि] . . . या कारणामुळे त्याच्या कनिष्ठ साथीदारांपेक्षा तो जणू पर्वताच्या शिखरावर उभा असल्याप्रमाणे श्रेष्ठ ठरतो.”

क्रमविकासवादी मायकल सी. कॉरबलस यांचे निरीक्षण असे आहे की, “मानव आणि इतर नर-वानरांमध्ये स्पष्ट दिसून येणारा एक खंड आहे . . . ‘आपल्या आकाराच्या नर-वानराचा मेंदू जितका असण्याची अपेक्षा केली जाते त्यापेक्षा तीन पटीने आपला मेंदू मोठा आहे.’” शिवाय न्युरोलॉजिस्ट रिचर्ड एम. रेस्टक म्हणतात: “अख्ख्या ज्ञात विश्‍वात [मानवी] मेंदू हा एकमेव अवयव आहे जो स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.”

लिकी कबूल करतात: “जागरूकतेमुळे शास्त्रज्ञ पेचात पडले आहेत, आणि काहींना वाटते की याचे उत्तर मिळणे अशक्य आहे. आपल्या प्रत्येकाला असलेली आत्म-जाणीव इतकी उल्लेखनीय आहे की आपल्या विचारांचे आणि कार्याचे ती स्पष्टीकरण देते.” ते असेही म्हणतात: “भाषेमुळे तर होमो सेपीयन [मानव] आणि बाकीच्या निसर्ग सृष्टीत दरा निर्माण होतो यात शंकाच नाही.”

मानवी बुद्धीच्या दुसऱ्‍या एका किमयेकडे लक्ष वेधून पीटर रस्सल लिहितात: “स्मरणशक्‍ती ही मानवी क्षमतांपैकी सर्वात महत्त्वाची आहे यात काही प्रश्‍न नाही. त्याच्याविना शिकणे नसते, . . . बौद्धिक क्रिया नसती, भाषेचाच काय तर . . . मानवांशी सर्वसाधारणपणे संबंधित असलेल्या . . . कोणत्याही इतर गुणांचा विकास झाला नसता.”

शिवाय, कोणतेही जनावर उपासना करत नाही. म्हणून, एडवर्ड ओ. विल्सन असे म्हणतात: “धार्मिक विश्‍वासाकडे कल असणे ही मानवी मनाची सर्वात क्लिष्ट आणि प्रबळ शक्‍ती आहे आणि मानवी स्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे.”

क्रमविकासवादी रॉबर्ट राईट कबूल करतात: “मानवी वर्तणुकीमुळे डार्विनच्या सिद्धान्तात अनेक इतर रहस्ये निर्माण होतात. विनोदबुद्धी आणि हसणे यांचे कार्य काय? लोक मरतेवेळी काही गोष्टींची कबूली का देतात? . . . दुःखाचे नेमके कार्य काय? एकदा माणूस मेला की, दुःख केल्याने जनुकांना कोणता फायदा होतो?”

क्रमविकासवादी इलेन मॉर्गन मान्यता दर्शवतात: “मानवांविषयी सर्वात उल्लेखनीय अशी चार रहस्ये म्हणजे: (१) मानव दोन पायांवर का चालतात? (२) त्यांच्या अंगावरचे केस का गायब झाले? (३) त्यांच्या मेंदूचा आकार इतका मोठा का? (४) ते बोलायला का शिकले?”

क्रमविकासवाद्यांकडे या प्रश्‍नांची काय उत्तरे आहेत? मॉर्गन म्हणतात: “यांची ठरलेली उत्तरे म्हणजे: (१) ‘आम्हाला अद्याप ठाऊक नाही’; (२) ‘आम्हाला अद्याप ठाऊक नाही’; (३) ‘आम्हाला अद्याप ठाऊक नाही’; आणि (४) ‘आम्हाला अद्याप ठाऊक नाही.’”

बिन बुडाचा सिद्धान्त

द लॉपसाईडेड एप या पुस्तकामागे “मानवी क्रमविकास कसा होत गेला याचे एक मोघम चित्र उभे करणे” हा हेतू होता, असे त्याचे लेखक लिहितात. “बहुतेक निष्कर्ष अंदाजांवर आधारित, प्रामुख्याने हातावर मोजण्या इतक्या पुराण दातांवर, हाडांवर आणि दगडांवर आधारलेले आहेत.” खरे पाहता, डार्विनच्याच मूलभूत सिद्धान्तावर अनेकांचे एकमत नाही. रिचर्ड लिकी म्हणतात: “काही वर्षांपूर्वी, आपला क्रमविकास कसा झाला याचे डार्विनने दिलेले स्पष्टीकरण मानवशास्त्रात सर्वात अचूक समजले जायचे पण ते चुकीचे ठरले.”

इलेन मॉर्गन यांच्या मते, अनेक क्रमविकासवाद्यांना “तीस वर्षांआधी जी उत्तरे ठाऊक होती असे वाटत होते त्या उत्तरांवर त्यांचा आता भरवसा राहिलेला नाही.” म्हणूनच तर, क्रमविकासवाद्यांनी समर्थन केलेली काही सिद्धान्ते खोटी ठरली आहेत.

विनाशकारी परिणाम

काही अभ्यासांद्वारे असे आढळले की, नर किती माद्यांबरोबर समागम करतो याचा संबंध दोन लिंगांमधील शरीराच्या आकारमानातील भिन्‍नतेशी आहे. यावरून, काहींनी असा निष्कर्ष काढला की, मानवांच्या लैंगिक संबंध ठेवण्याच्या सवयी चिम्पान्झींसारख्याच असायला हव्यात, कारण आपल्या मानवी भाईबंदांप्रमाणे नर चिम्पान्झी माद्यांपेक्षा जरा मोठे असतात. म्हणून काहीजण अशी कारणमीमांसा करतात की, चिम्पान्झींप्रमाणे मानवांनाही अनेक सोबत्यांसोबत शरीरसंबंध ठेवण्याची अनुमती दिली जावी. एवढेच कशाला तर, काहीजण असे करतातही.

पण, चिम्पान्झींच्या बाबतीत जे फायद्याचे आहे ते मानवांसाठी आपत्तीच ठरली आहे. पुराव्यांनुसार, लैंगिक स्वैराचार हा विपत्तीकडे जाणारा मार्ग आहे; दुभंगलेली कुटुंबे, गर्भपात, रोग, मानसिक आणि भावनिक आघात, ईर्ष्या, घरातील हिंसा आणि टाकून दिलेली मुले ज्यांचे योग्य पालनपोषण होत नाही आणि पुढे तेही तसेच बनतात या सर्वांची त्यात भर असते. मानवांचा स्वभाव जनावरांसारखाच आहे तर मानवांना त्याचे दुःखद परिणाम का?

क्रमविकासवादी विचारसरणीमुळे मानवी जीवन पवित्र आहे की नाही हा देखील प्रश्‍न उद्‌भवतो. देव नाही आणि आपण केवळ श्रेष्ठ प्रतीचे प्राणीच आहोत असा विचार केल्यास मानवी जीवन पवित्र आहे असे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो? आपल्या बुद्धीमुळे? तसे असल्यास, द ह्‍यूमन डिफरेन्स या पुस्तकात उभा केलेला प्रश्‍न खूप उचित ठरेल: “[क्रमविकासाच्या बाबतीत] आपण सुदैवी आहोत, केवळ यामुळे कुत्र्या-मांजरांपेक्षा मानवांना अधिक मोलवान समजले जावे हे उचित आहे का?”

ही नवीन क्रमविकासवादी विचारसरणी पसरेल तशी, “नैतिक विचारपद्धतींवर याचा निश्‍चितच खोलवर परिणाम पडेल” असे द मॉरल ॲनिमल हे पुस्तक म्हणते. परंतु, ‘नैसर्गिक निवडीप्रमाणे’ आपण निर्माण झालो या पूर्वकल्पनेवर आधारलेली नैतिकता ही निष्ठुर आहे; या ‘नैसर्गिक निवडीद्वारे’ एच. जी. वेल्स म्हणतात त्यानुसार, “दुर्बल आणि इतरांवर भरवसा करणाऱ्‍या लोकांचा सशक्‍त आणि कावेबाज लोक फायदा घेतात.”

उल्लेखनीय गोष्ट अशी की, इतक्या वर्षांदरम्यान नैतिकतेचा हळूहळू ऱ्‍हास घडवून आणलेले क्रमविकासवाद्यांचे अनेक सिद्धान्त दुसऱ्‍या विचारसरणीच्या लोटापुढे पराजित झाले आहेत. पण दुःखाची गोष्ट ही आहे की, या सिद्धान्तांमुळे जे नुकसान होते ते भरून काढले जात नाही.

निर्मितीची उपासना की निर्माणकर्त्याची?

उत्तर शोधण्याकरता क्रमविकास लोकांचे लक्ष खाली निर्मितीकडे वेधतो, वर निर्माणकर्त्याकडे वेधत नाही. दुसऱ्‍या बाजूला, आपली नीतीमूल्ये आणि जीवनातील उद्देशाकरता बायबल आपले लक्ष वरती अर्थात खऱ्‍या देवाकडे वेधते. पाप टाळण्यासाठी आपल्याला इतके का झटावे लागते आणि मृत्यूमुळे केवळ मानवच अस्वस्थ का होतात याचेही ते स्पष्टीकरण देते. याशिवाय, वाईट करण्याची आपली प्रवृत्ती का आहे याचा बायबलमधील स्पष्टीकरणाचा नाद मानवाच्या मनात आणि हृदयात घुमत राहतो. त्या समाधानकारक स्पष्टीकरणावर विचार करण्यास आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो.

[७ पानांवरील चित्रं]

मानव आणि पशू यांच्यातील दरा किती रुंद आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा