वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ७/८ पृ. ३-४
  • आपण मानव कोण आहोत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण मानव कोण आहोत?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जीवनाचा काय उद्देश?
  • आपल्या विश्‍वासामुळे फरक पडतो
  • देवाच्या अथवा पशूच्या प्रतिरूपात?
    सावध राहा!—१९९८
  • उत्क्रांतीची न्यायचौकशी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • सर्व सजीव सृष्टी एकाच पूर्वजापासून आली का?
    जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्‍न
  • कोण दोषी आहे आपण की आपली जनुके?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
सावध राहा!—१९९८
g98 ७/८ पृ. ३-४

आपण मानव कोण आहोत?

असे दिसते की, मानवांना आपण कोण आहोत हे ओळखणे कठीण झाले आहे. क्रमविकासवादी रिचर्ड लिकी असे निरीक्षण करतात: “शतकानुशतके तत्त्ववेत्त्यांनी मानवपणाचे, मानवतेचे पैलू हाताळले आहेत. पण, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, अजूनपर्यंत मानवता कशी असते याविषयी कोणत्याही एका व्याख्येवर एकमत झालेले नाही.”

परंतु, कोपनहेगन प्राणीसंग्रहालयातील नर-वानर गणातील प्राण्यांच्या विभागात, या प्राणीसंग्रहालयाने मात्र एका प्रदर्शनाद्वारे आपले मत उघडपणे मांडले. १९९७ ब्रिटानिका बुक ऑफ द इयर म्हणते: “एक डॅनिश दांपत्य, तात्पुरते राहायला त्या प्राणीसंग्रहालयात आले; तेथे येणाऱ्‍या लोकांना कपींसोबत आपला केवढा जवळचा संबंध आहे याची आठवण करून देणे हा त्यांचा तेथे राहण्यामागील उद्देश होता.”

विशिष्ट प्राण्यांचा मानवांशी संबंध आहे अशा दाव्याला संदर्भ पुस्तके मान्यता दाखवतात. उदाहरणार्थ, द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “नर-वानर गणातल्या सस्तन प्राण्यांमध्ये मानवांचा त्याचप्रमाणे कपी, लीमर, माकडे आणि टारसियर यांचा देखील समावेश होतो.”

असे असले तरीसुद्धा, मानवांमधील असंख्य अनन्यसाधारण गुण प्राणी सांच्यात मात्र दिसून येत नाहीत. त्यांपैकी काही गुण म्हणजे प्रीती, विवेक, नैतिकता, आध्यात्मिकता, न्यायीपणा, दयाळुपणा, विनोदबुद्धी, सर्जनशीलता, वेळेचा चौकसपणा, आत्म-जाणीव, सौंदर्याची जाणीव, भविष्याविषयी चिंता, पिढ्यान्‌पिढ्या ज्ञान गोळा करण्याची क्षमता आणि मरण आपल्या अस्तित्वाचा शेवट नव्हे ही आशा.

या गुणांचा प्राणी सांच्यासोबत मेळ बसवण्याच्या प्रयत्नात काहीजण क्रमविकासी मानसशास्त्राकडे बोट दाखवू लागले आहेत; हे क्रमविकासी मानसशास्त्र म्हणजे क्रमविकासवाद, मानसशास्त्र आणि सामाजिक विज्ञान यांचे मिश्रण आहे. क्रमविकासी मानसशास्त्र मानवी स्वभावाचे कोडे उलगडण्यात यशस्वी झाले आहे का?

जीवनाचा काय उद्देश?

“क्रमविकासी मानसशास्त्राची ही मूळकल्पना अगदी सोपी आहे,” असे क्रमविकासवादी रॉबर्ट राईट म्हणतात. “दुसऱ्‍या कोणत्याही अवयवाप्रमाणे मानवी मन सुद्धा पुढच्या पिढीला जनुक देण्यासाठी बनवले होते; त्यामुळे मनात निर्माण होणाऱ्‍या भावना आणि विचार याच मूळकल्पनेच्या आधारावर समजले जाऊ शकतात.” दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, आपल्या जनुकांनी निर्धारित केल्याप्रमाणे आणि आपल्या मनाच्या क्रियांतून दिसून येते त्याप्रमाणे प्रजोत्पादन करणे हाच जीवनाचा एकमेव उद्देश आहे.

किंबहुना, क्रमविकासी मानसशास्त्रानुसार, “मानवी स्वभाव म्हणजे निष्ठुर जननिक स्वार्थीपणा आहे आणखी काही नाही.” द मॉरल ॲनिमल हे पुस्तक म्हणते: “नैसर्गिक निवडीनुसार, पुरुषांनी अनेक स्त्रियांसोबत लैंगिक संबंध ठेवायला ‘हवेत’.” या क्रमविकासाच्या कल्पनेनुसार, विशिष्ट परिस्थितींमध्ये स्त्रियांनी अनैतिकता करणे देखील स्वाभाविक आहे असे समजले जाते. पालकांचे प्रेम सुद्धा संततीला जिवंत ठेवण्याची एक जनुक-प्रेरित युक्‍ती मानली जाते. तर अशाप्रकारे, एक मत, मानवजात टिकवण्यासाठी जननिक वारशाच्या महत्त्वावर जोर देते.

काही मार्गदर्शक पुस्तके आता क्रमविकासी मानसशास्त्राच्या नवीन लाटेवर वाहू लागली आहेत. एकात तर, मानवी स्वभाव हा “चिम्पान्झींचा स्वभाव, गोरिलांचा स्वभाव किंवा बबूनचा स्वभाव यांच्यापेक्षा काही वेगळा नाही” असे म्हटले आहे. ते असेही म्हणते: “क्रमविकासवादात . . . प्रजोत्पादनच जास्त महत्त्वाचे.”

तर दुसऱ्‍या बाजूला, बायबलची शिकवण अशी आहे की, देवाने मानवांना केवळ प्रजोत्पादनाच्याच उद्देशासाठी निर्माण केले नाही. तर आपल्याला देवाच्या ‘प्रतिरूपाचे’ बनवण्यात आले, अर्थात त्याचे गुण विशेषतः प्रीती, न्याय, बुद्धी आणि शक्‍ती हे प्रतिबिंबित करण्याच्या क्षमतेसह आपल्याला बनवण्यात आले. आधी उल्लेखलेले अनन्यसाधारण मानवी गुणही यात जोडले तर बायबल, मानवांना प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ का गणते हे स्पष्ट होते. किंबहुना, बायबल हे प्रकट करते की, मानवांना सर्वकाळ जगण्याच्या केवळ इच्छेसह नव्हे, तर देव-निर्मित नीतिमान नवीन जगात त्या इच्छेची पूर्णता अनुभवण्याच्या क्षमतेसह देवाने मानवांची निर्मिती केली.—उत्पत्ति १:२७, २८; स्तोत्र ३७:९-११, २९; उपदेशक ३:११; योहान ३:१६; प्रकटीकरण २१:३, ४.

आपल्या विश्‍वासामुळे फरक पडतो

अचूक दृष्टिकोन कोणता हे जाणून घेणे म्हणजे फक्‍त सैद्धांतिक ज्ञान मिळवणे नाही, कारण आपल्या उत्पत्तीविषयी आपला जो विश्‍वास आहे त्याचा आपल्या जीवनावर प्रभाव होतो. इतिहासकार एच. जी. वेल्स यांनी, १८५९ साली चार्ल्स डार्विन लिखित ओरिजिन ऑफ स्पिशीझ प्रकाशित झाल्यावर अनेकांनी जे निष्कर्ष काढले ते नमूद केले.

“नीतीभ्रष्टतेची सुरवात झाली. . . . १८५९ सालानंतर विश्‍वासाची खच्ची झाली. . . . एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील लोकांचा असा विश्‍वास झाला की, ज्या जीवनसंघर्षात दुर्बल आणि इतरांवर भरवसा करणाऱ्‍या लोकांचा सशक्‍त आणि कावेबाज लोक फायदा घेतात त्या जीवनसंघर्षामुळे ते टिकून राहिले. . . . भारतातल्या डोल नावाच्या हिंसक शिकारी कुत्र्याच्या जातीप्रमाणे मानव हा समाजप्रिय प्राणी आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. . . . मानवांच्या या घोळक्यातील बलवान कुत्र्यांनी अरेरावीपणा करून इतरांना आपल्या कह्‍यात ठेवावे हे त्यांना योग्य वाटू लागले.”

म्हणूनच, आपण वास्तविकतेत कोण आहोत याचा योग्य दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. कारण, एका क्रमविकासवाद्याने प्रश्‍न केल्यानुसार, “जुन्या वहिवाटीच्या साध्या डार्विनवादामुळे पाश्‍चात्त्य संस्कृतीची नैतिक शक्‍ती ढासळली तर [क्रमविकासी मानसशास्त्राची] नवीन वहिवाट पूर्णतः मुरेल तेव्हा काय होईल?”

आपली उत्पत्ती कोठून झाली याबद्दल आपला काय विश्‍वास आहे याचा, जीवनाच्या आणि चूक व बरोबर यांच्या मूलभूत दृष्टिकोनावर परिणाम होत असल्याने या संपूर्ण प्रश्‍नाची आपण जवळून पारख करावी हे अगत्याचे आहे.

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

इतिहासकार एच. जी. वेल्स यांनी, १८५९ साली चार्ल्स डार्विन लिखित ओरिजिन ऑफ स्पिशीझ प्रकाशित झाल्यावर अनेकांनी जे निष्कर्ष काढले ते नमूद केले: “नीतीभ्रष्टतेची सुरवात झाली. . . . १८५९ सालानंतर विश्‍वासाची खच्ची झाली”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा