वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ३/८ पृ. २४
  • एक विलक्षण पुनर्मिलन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक विलक्षण पुनर्मिलन
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन देणाऱ्‍या सभा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • त्यांचे हृदय हेलावून गेले
    सावध राहा!—१९९८
  • आरोग्याच्या पुनःप्राप्तीकडे वाटचाल
    सावध राहा!—१९९७
  • मला खिन्‍नता का वाटते?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
सावध राहा!—१९९८
g98 ३/८ पृ. २४

एक विलक्षण पुनर्मिलन

ब्रिटनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

सन १९४५ मध्ये मरी आणि तिचा मुलगा, ब्रूस यांनी एकमेकांना अखेरचे पाहिले तेव्हा तो अवघ्या दोन वर्षांचा होता. मरीचा घटस्फोट झाला त्यानंतर ब्रूसच्या बाबांनी कायदेशीररित्या त्याचा ताबा मिळवला. आपल्या स्वाभाविक भावभावना दडपून टाकून मरीने असा निर्णय घेतला, की आपल्यापरीने कोणत्याही भावनात्मक ओढीशिवाय, आपल्या मुलाने त्याच्या वडिलांजवळ व त्यांच्या नव्या पत्नीजवळ राहणेच त्याच्यासाठी सर्वात श्रेयस्कर ठरेल. पाहता पाहता, तिचा आणि ब्रूसचा संपर्क तुटला.

काही वर्षांनंतर मरीने दुसरा विवाह केला आणि तिला आणखीन एक मुलगा झाला; पण ब्रूसची आठवण काही केल्या तिच्या मनातून जात नव्हती. तो कुठे होता? त्याचे काय झाले होते?

सन १९७६ साली ब्रूसवरची पितृछाया हरपली; त्या अंत्यविधीसाठी मरी देखील उपस्थित होती. आपल्या तिशीतला उमदा, तरुण ब्रूसही त्याच्या सावत्र आईसोबत तिथे हजर होता. आपली सावत्र आई हीच आपली खरी आई आहे, असा अजूनही ब्रूसचा ग्रह असेल असे मरीला वाटत असल्यामुळे त्याला आपली ओळख करून देणे आणि तेही अशावेळी, निर्दयीपणाचे ठरेल असे तिला वाटले. पण ब्रूसच्या वडिलांनी पुनर्विवाह केला तेव्हाच त्यांनी त्याला आपल्यापासून दूर केले होते व नंतर तो त्याच्या आजोळीच लहानाचा मोठा झाला ही वस्तुस्थिती मरीला माहीत असती, तर तिची प्रतिक्रिया निराळी असली असती.

याच काळादरम्यान, सू नावाच्या एका यहोवाच्या साक्षीदाराशी मरीची भेट झाली आणि गृह बायबल अभ्यास करण्यासाठी ती लागलीच राजी झाली. योगायोगाने, याच कालावधीत ब्रूस आणि त्याच्या पत्नीने देखील सूचे पती, ॲलन यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली. पण लवकरच, आरोग्य समस्यांमुळे मरीने अभ्यास करण्याचे थांबवले आणि तेथून स्थलांतर केले.

सन १९९५ मध्ये पुन्हा एकदा मरीची गाठ यहोवाच्या साक्षीदारांशी पडली. तिने परत बायबल अभ्यास करण्यास सुरवात केली व जलद प्रगती केली. बाप्तिस्मा घेण्याची वेळ आली तेव्हा मरीने एका ख्रिस्ती वडिलांजवळ मन मोकळे करून ब्रूसची हकीकत त्यांना सांगितली. चौकशी केल्यानंतर वडिलांना कळाले, की ब्रूस आणि त्याचे कुटुंब केवळ यहोवाचे साक्षीदारच नव्हते, तर मरीच्या मूळ गावातील एका मंडळीत ब्रूस एक ख्रिस्ती वडील देखील होता!

ब्रूसच्या मंडळीतील इतर वडील काहीसे अस्वस्थ झाले. येत्या खास संमेलन दिवशी त्याच्या आईचा बाप्तिस्मा होणार आहे हे जर त्यांनी ब्रूसला सांगितले तर त्याची प्रतिक्रिया काय असेल? ती जिवंत आहे हे तरी त्याला माहीत होते का? तथापि, ब्रूसला सगळी वस्तुस्थिती समजताच, वेळ न दवडता तो व त्याचे कुटुंबीय मरीला भेटण्यास निघाले. “आई, सत्यात झाल्या गेल्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात; महत्त्वाच्या असतात त्या पुढे होणाऱ्‍या गोष्टी!” अशा सांत्वनदायी शब्दांनिशी त्याने आपल्या आईला प्रेमाने आलिंगन दिले.

सन १९९६ च्या मार्च महिन्यात, वयाच्या ७८ व्या वर्षी इंग्लंडमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या ईस्ट पेनिन संमेलन गृहात मरीचा बाप्तिस्मा झाला—तोही चक्क ब्रूसच्या हातून! एक आध्यात्मिक बहीण म्हणून आपल्या आईचा स्वीकार करताना ब्रूसच्या अंगावर किती रोमांच फुलले होते!

[२४ पानांवरील चित्र]

ब्रूस, आपल्या आईसह

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा