वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ३/८ पृ. १६-१७
  • दीपगृह पहारेकरी—लोप पावत असलेला पेशा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दीपगृह पहारेकरी—लोप पावत असलेला पेशा
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वादळांचा सामना
  • एकान्तपणा आणि तोचतोचपणा
  • लोप पावत असलेला पेशा
  • सचोटी राखणाऱ्‍यांसाठी सांत्वन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • सचोटी राखण्याद्वारे यहोवाचे अंतःकरण आनंदी करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • आपण तर यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • आंधळेपणातही स्वावलंबी आणि आनंदी
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ३/८ पृ. १६-१७

दीपगृह पहारेकरी—लोप पावत असलेला पेशा

कॅनडातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

“मला दुसरं काहीच करायला आवडलं नसतं,” असे दीपगृह पहारेकऱ्‍यांनी कित्येकदा म्हणून दाखवले आहे. १०६ वर्षे होऊन गेलेल्या एका दीपगृहाचा पहारा करण्यासाठी कॅनडाच्या टोरोंटो येथील एका प्लास्टिकच्या कंपनीतली मॅनेजरची पोस्ट सोडून दिलेल्या एका व्यक्‍तीने म्हटले की या कामामुळे त्यांना “आपल्या वयापेक्षा १० वर्षे जवान असल्यासारखं वाटलं.”

खलाशांसाठी प्रखर प्रकाश देणे ही दीपगृहाच्या पहारेकऱ्‍याची प्रमुख जबाबदारी असते. धुक्याच्या वेळी ध्वनी संकेत देणे आणि ध्वनी संकेत घंट्यांची काळजी घेणे त्याचप्रमाणे कोळ्यांना आणि जाण्या-येणाऱ्‍या नौकांना रेडिओद्वारे हवामानाची माहिती देणे हे देखील त्याचे काम असते.

गतकाळात, दीपगृहाच्या पहारेकऱ्‍यांना तेलाचा साठा भरणे, दिवे लावणे आणि दिव्याच्या काचांवरचा धूर साफ करणे ही कामे करावी लागत. दिवे लवकर ठीक करता आले नाहीत तर जहाजांना सुरक्षित स्थानी मार्गदर्शित करण्यासाठी आख्खी रात्र हाताने दिवे हालवणे किंवा धुक्याच्या वेळी द्यावयाच्या ध्वनी संकेताची घंटी बिघडल्यावर रात्रभर हातोड्याने धुक्याची घंटी वाजवणे ही पहारेकऱ्‍यांसाठी काही नवलाईची गोष्ट नव्हती!

वादळांचा सामना

कडाक्याची वादळे हे प्रमुख चिंतेचे कारण असतात. एकदा एका पहारेकऱ्‍याला “प्रचंड मोठे पांढरे ढग” दिसल्यासारखे वाटले पण ती चक्काचूर करणारी एकच लाट होती! ही लाट १५ मीटर उंचीपर्यंत चढून पहारेकऱ्‍याच्या खोलीपर्यंत पोचली. या एकाच लाटेने एका वादळाइतके नुकसान पोचवले.

दुसऱ्‍या एका प्रसंगी, एका सुसाट्याच्या वादळामुळे नोवा स्कोटिया येथील पबनिको बंदराच्या दीपगृहावर रात्रभर लाटा आदळत राहिल्या. तिथल्या पहारेकऱ्‍याला आणि त्याच्या कुटुंबाला फक्‍त शांत राहून आशा करत राहण्याव्यतिरिक्‍त काहीच गत्यंतर नव्हते. सकाळपर्यंत वादळ निवळले होते. पण, पहारेकऱ्‍याने बाहेर जाऊन पाहिले तर दीपगृहाच्या भोवतालची जमीन दिसेनाशी झाली होती. जमिनीपासून त्यांचा संबंध तुटला होता.

एकान्तपणा आणि तोचतोचपणा

एकान्तपणाविषयी विचारले असता, एका दीपगृहाचा पहारेकरी गालातल्या गालात हसून म्हणाला: “लोक आम्हाला म्हणतात, ‘तुम्हाला हा एकान्तपणा कसा काय सहन होतो बुवा?’ आणि आम्ही त्यांना म्हणतो, ‘तुम्हाला शहरातला आवाज आणि गोंधळ कसा सहन होतो कोणास ठाऊक.’”

गतकाळात, संयुक्‍त संस्थानांतल्या एकाकी दीपगृहांना पुस्तकांचे लहान गठ्ठे उपलब्ध करून दिले जात होते. अशातऱ्‍हेने, १८८५ सालापर्यंत ४२० ग्रंथालये चालू होती! स्पष्टतः, दीपगृह पहारेकरी उत्तम वाचक बनले.

लोप पावत असलेला पेशा

अलीकडील वर्षांमध्ये, ज्यात लोक राहतात अशा चिरेबंदीच्या दीपगृहांऐवजी ज्यात लोक राहत नाहीत अशी प्रखर प्रकाशन दिवे असलेली स्टील-सांगाड्याची बुरूजे बांधली जात आहेत. आता खलाशी अंधारात अंधूकसा दिवा किंवा अंधूकशी ज्योत शोधत बसत नाहीत. आजकाल, शक्‍तिशाली टंगस्टन हॅलोजन दिवे आणि स्पष्ट, दूरपर्यंत ऐकू येणारे धुक्याचे ध्वनी संकेत खलाशाला समुद्रातील धोक्यांची सूचना देतात.

दीपगृहांकडील संकेत प्राप्त करण्याची व्यवस्था असलेल्या नौकांना आता, धुके कितीही दाट असले, तरी आपण कोठे आहोत हे माहीत असते. समुद्रकिनाऱ्‍यानजीकचे हानीकारक वालुकाभिंत, धोकेदायक शैलभित्ती आणि अजाण खडक यांना टाळणे शक्य आहे अशा आत्मविश्‍वासाने एखाद्या नाविकाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एका किनाऱ्‍यापासून दुसऱ्‍या किनाऱ्‍यापर्यंत प्रवास करणे शक्य होते.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीपगृह पहारेकरी आता नाहीसे होऊ लागले आहेत. आपले २५ वर्षांचे बेटावरील घर सोडताना आपल्या आयुष्याचा एक भाग कायमचा छाटला गेला असे वाटत असलेल्या एका दीपगृह पहारेकऱ्‍याने खेदाने असे म्हटले: “इथं आमचं जीवन समाधानकारक होतं. आम्हाला सोडून जायची इच्छाच नव्हती.”

अजूनही, फिरते दिवे, सहायक दिवे, तातडीचे दिवे, ध्वनी संकेत आणि रडार दिवे या सर्वांची सर्व्हिसींग करावी लागते आणि दीपगृहांना देखील उत्तम स्थितीत ठेवावे लागते. दीपगृहांची सर्व्हिसींग आता प्रवासी तंत्रज्ञ करतात.

दीपगृह पहारेकऱ्‍यांच्या कित्येक वर्षांच्या सेवेबद्दल ज्यांना कदर वाटते त्यांना मेनच्या ऑगस्टा येथील एका माणसाप्रमाणेच वाटते जो खेदाने असे म्हणतो: “दीपगृहाकडे पाहून तिथला दिवा आता संगणकाद्वारे चालवला जातो आणि तिथे कोणी लोक नाहीत असा विचार केल्यावर त्यात पूर्वीसारखी मजा राहणार नाही.”

[१७ पानांवरील चौकट]

पहिले दीपगृह

नमूद असलेल्या इतिहासानुसार पहिले दीपगृह इजिप्तच्या टॉलेमी दुसरे यांच्या कारकीर्दीदरम्यान पूर्ण करण्यात आले होते. ते सा. यु. पू. ३०० च्या सुमारास फारोस बेटावर बांधले होते; आताच्या ॲलेक्झांड्रियाच्या बंदराच्या प्रवेशापासून थोड्याच अंतरावर ते होते. त्याला बांधायला २० वर्षे लागली आणि २५ लाख डॉलर इतका खर्च आला.

ऐतिहासिक लिखाणांनुसार ते सुमारे ९० मीटर उंचीचे होते. त्याच्या वरील खोलीच्या खिडक्यांचे तोंड समुद्राकडे होते आणि त्यांच्यामागे लाकडांचा जाळ केलेला किंवा कदाचित दिवे असत; जोसिफसच्या मते हे ५० किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होते.

ही प्रचंड मोठी इमारत सात अतिशय आश्‍चर्यकारक बांधकामांपैकी एक गणली जात होती. तिच्या धगधगत्या आगीने १,६०० वर्षे संकेत दिव्याचे काम केले; निश्‍चितार्थाने तिचा भूकंपाने विनाश झाला.

शतके उलटली तशी विविध आकार आणि वर्णनांची हजारो दीपगृहे जगभरातल्या बंदरांवर बांधली गेली. जुनी चिरेबंदीची दीपगृहे आज राष्ट्रीय, राज्य, गावाच्या आणि शहरातल्या बागांमध्ये अजबखाने आणि पर्यटकांचे आकर्षण बनून राहिले आहेत आणि लाखो लोक त्यांना पाहतात.

[१६ पानांवरील चित्र]

केप स्पिअर दीपगृह, न्यूफाऊंडलंड, कॅनडा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा