वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ३/८ पृ. ३
  • मस्तिष्काघात!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मस्तिष्काघात!
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • त्याच्या परिणामांचा सामना करणे
    सावध राहा!—१९९८
  • मस्तिष्काघात—त्याचे कारण
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ३/८ पृ. ३

मस्तिष्काघात!

पश्‍चिम औद्योगिक जगात मृत्यूचे आणि गंभीर अपंगत्वाचे एक प्रमुख कारण म्हणजे मस्तिष्काघात होय. “आघात” ह्‍या शब्दावरूनच ‘मस्तिष्क घाताचा’ आकस्मिकपणा सूचित होतो. एका क्षणी तुम्ही अगदी बरे असता आणि दुसऱ्‍याच क्षणी तुम्हाला वीजेचा झटका बसल्यासारखा वाटतो—तीव्र मस्तिष्काघातामुळे तुमच्या जीवनात अचानक आणि खूप मोठा बदल होऊ शकतो. त्याच्याने लुळे-पांगळे झाल्यामुळे, तुम्हाला बोलता येणार नाही, तुमच्या भावनांमध्ये गोंधळ होईल, व्यक्‍तिमत्त्वात आणि ज्ञानशक्‍तीत बदल होईल आणि तुमचे व तुमच्या कुटुंबाचे सर्वसाधारण जीवन पुन्हा मिळवण्याची अंतहीन धडपड जणू तुम्हाला करावी लागेल.

एलन मोरगन यांचीच गोष्ट पाहा.a ६४ वर्षांच्या एलन बुधवारच्या दिवशी चांगल्या ठणठणीत होत्या. गुरुवारी, आपल्या पतीसोबत खरेदी करताना एलन यांना अचानक बोलताच येईना आणि त्यांचे तोंड वाकडे झाले. त्या एकदम गळून गेल्या आणि प्यायलेल्या व्यक्‍तीसारख्या झोकांड्या खाऊ लागल्या. एलन यांना खूप तीव्र मस्तिष्काघात झाला होता!

मस्तिष्काघात झाल्यावर, एलन यांची अवस्था अशी होती की, त्यांना आंघोळ करणे किंवा कपडे घालणे अशा साध्यासोप्या गोष्टीही करता येत नव्हत्या. लिहिणे, विणकाम किंवा शिवणकाम हे सर्व बंद झाल्याने त्या खूप रडायच्या आणि त्यांना खूप थकवाही जाणवायचा. पण, एलन यांच्या विचारक्रियेवर काहीच परिणाम झाला नव्हता; परंतु, इतरजण आपल्याला निर्बुद्ध समजताहेत असे त्यांना वाटायचे तेव्हा त्यांना खूप ओशाळल्यागत व्हायचे. नंतर, एलन म्हणाल्या: “या अचानक बदलाच्या धक्क्यामुळे एका व्यक्‍तीवर भावनिक आणि मानसिक परिणाम कसा होतो याची जाणीव फार कमी लोकांना असते. व्यक्‍ती म्हणून माझं अस्तित्व आता संपलं असंच मला वाटलं.”

मस्तिष्काघात कशामुळे होतो? मस्तिष्काघात झालेल्या प्रत्येक व्यक्‍तीवर सारखाच परिणाम होतो का? मस्तिष्काघात झालेल्या लोकांनी या विकाराला कसे तोंड दिले आहे? मस्तिष्काघात झालेल्या व्यक्‍तींची कुटुंबे याला कसे तोंड देतात? आधार पुरवण्यासाठी आपण सर्वजण काय करू शकतो? सावध राहा! अशा प्रश्‍नांचे परीक्षण करते आणि मस्तिष्काघात झालेल्या व्यक्‍तींच्या व त्यांच्यासोबत झटणाऱ्‍या त्यांच्या कुटुंबांच्या जीवनाचे दर्शन घडवून देते.

[तळटीप]

a आजारी व्यक्‍ती आणि त्यांच्या कुटुंबांचा विचार करून काही नावे मुद्दामहून बदलण्यात आली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा