वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 २/८ पृ. २५-२६
  • जॉर्जिया—एका प्राचीन संस्कृतीचे जतन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जॉर्जिया—एका प्राचीन संस्कृतीचे जतन
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • हिंसाचाराला बळी पडलेल्यांना न्याय मिळाला!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • चाळीस वर्षांपेक्षाही जास्त काळ कम्युनिस्ट पक्षाच्या बंदीत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
सावध राहा!—१९९८
g98 २/८ पृ. २५-२६

जॉर्जिया—एका प्राचीन संस्कृतीचे जतन

सावध राहा! बातमीदाराकडून

जेथे काही लोक १०० आणि त्याहून अधिक वर्षे जगतात त्या ४,६०० मीटर हिमाच्छादित शिखरांमध्ये विसावलेल्या सुपीक दऱ्‍याखोऱ्‍यांच्या देशात राहण्यास तुम्हाला आवडेल का? जॉर्जियाच्या रहिवाशांसाठी हे निव्वळ स्वप्न नाही. एक वास्तविकता आहे.

युरोप व आशिया, या दोहोंमध्ये असलेल्या भौगोलिक व सांस्कृतिक सरहद्दीवर जॉर्जिया वसलेले आहे. पुरातन काळी, सुप्रसिद्ध रेशीम-मार्गावर (सिल्क रोड) जॉर्जिया एक प्रमुख स्थळ होते; किंबहुना, याच मार्गाने मार्को पोलोने चीनकडे प्रयाण केले होते. पूर्व-पश्‍चिमेशी लागेबांधे असल्यामुळे आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या जॉर्जियाला लाभ झाला खरा, पण काही वेळा या मार्गावरून ये-जा करण्यात हल्लेखोरांना देखील तितकाच फायदा झाला. एका अंदाजानुसार चक्क २९ वेळा जॉर्जियाची राजधानी, तिबिलिसी, उद्ध्‌वस्त करण्यात आली आहे! आज मात्र तिबिलिसी एक गजबजलेले, उत्साहपूर्ण, प्रशस्त भुयारी मार्ग असलेले आणि अत्याधुनिक इमारतींसोबत ठिकठिकाणी इतिहासकालीन वास्तू असलेले शहर आहे.

जॉर्जियाचा सुमारे ८७ टक्के भूप्रदेश डोंगराळ आहे. उजाड, बर्फाच्छादित डोंगराळ प्रदेशावरून २५,००० नद्या सपाट भूमीवर खळाळत येतात; यांच्यापैकी बहुतेक नद्यांत ट्राउट मत्स्यसंपत्ती विपुल आहे. देशाचा तृतीयांशापेक्षा अधिक भाग वनाच्छादित, किंवा झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. जॉर्जियाच्या उत्तरेकडच्या सरहद्दीवरील कॉकेशस पर्वतराजी, उत्तरेकडून येणाऱ्‍या अतिथंड वाऱ्‍यापासून देशाच्या आतील भागाचे संरक्षण करते. या स्थितीमुळे, काळ्या समुद्रापासून वाहणाऱ्‍या दमट हवेमुळे पश्‍चिम जॉर्जियाचे हवामान उबदार राहते; म्हणूनच, सुट्टीला येणाऱ्‍या प्रवाशांसाठी जॉर्जिया एक आवडते पर्यटन स्थळ बनले आहे. येथील सौम्य हवामानाने जगातील सर्वात पुरातन व उत्कृष्ट द्राक्षारसनिर्मिती परंपरेला देखील हातभार लावला आहे. खरे तर, जॉर्जियामध्ये, द्राक्षवेलांच्या व द्राक्षारसाच्या ५०० पेक्षा अधिक निरनिराळ्या जातींचे उत्पादन होते!

तथापि, जॉर्जियाची सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे तेथील लोक. त्यांचे शौर्य, बुद्धिमत्ता, उदार आदरातिथ्य, विनोदबुद्धी व जीवनावरील त्यांचे प्रेम कित्येक काळांपासून सर्वज्ञात आहे. त्यांची संस्कृती गायनकला व नृत्यकला यांनी नटलेली असून आजही जॉर्जियन कुटुंबांमध्ये जेवणाच्या टेबलाभोवती बसून सामूहिक गीते गाण्याची पद्धत आहे.

वाङ्‌मयीन इतिहासासंबंधी देखील जॉर्जियाने एक दीर्घकालीन इतिहास घडविला असून ही साहित्य परंपरा पाचव्या शतकापर्यंत भिडविता येते. सर्व प्रथम ज्या भाषांत बायबलची भाषांतरे करण्यात आली होती, त्यांत विलक्षण सुरेख वर्णमाला असलेली जॉर्जियन भाषा देखील समाविष्ट आहे. ही समस्त संस्कृती म्हणजे जॉर्जियाच्या इतिहासाशी जोडणारा एक दुवाच—अर्वाचीन देशात एका प्राचीन संस्कृतीचे जतन.

[२५ पानांवरील चित्राचे श्रेय]

Pat O’Hara/Corbis

[२६ पानांवरील चित्र]

१. जॉर्जियन बायबल

२. काही रहिवासी १०० आणि त्याहीपेक्षा अधिक वर्षे जगतात!

३. तिबिलिसीमधील वर्दळीचा रस्ता

[चित्राचे श्रेय]

Dean Conger/Corbis

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा