वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • “स्वस्थ बसून लक्ष दे!” एकाग्रता अभाव व अतिक्रियाशीलता विकार नावाचे आव्हान
    सावध राहा!—१९९७
  • आव्हानास सामोरे जाणे
    सावध राहा!—१९९७
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

सर्पदंश मी एक पेशेवाईक सरीसृप शास्त्रज्ञ असल्यामुळं सापांची निगा राखणं आणि त्यांच्यातील विष काढणं, हे तर माझं रोजचंच काम आहे. “नागाला भेटावयास तुम्हाला आवडेल का?” (एप्रिल-जून १९९६), “हाबू—या सर्पापासून दूर राहा” (जुलै ८, १९९६, इंग्रजी) आणि “धोका! मी विषारी आहे” (ऑगस्ट २२, १९९६, इंग्रजी) या सर्व लेखांनी यहोवाच्या निर्मितीसंबंधी एक सकारात्मक मनोवृत्ती प्रकट केली. एक गोष्ट मात्र मला सांगाविशी वाटते, की सर्पदंशासाठी रक्‍तस्रावबंध वापरण्याची शिफारस केली जात नाही. बहुतेकांना ते लावता येत नाही; काहींना आपला सबंध हात किंवा पायही गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. माझं असं ठाम मत आहे की, पायाचा घोटा किंवा मनगट मुरगळले असता जितका दाब लावला जातो तितक्याच दाबानिशी संपूर्ण हात किंवा पाय बांधण्यासाठी दाबपट्टी वापरली जावी. यामुळं, ज्या हातावर किंवा पायावर दंश केला गेला आहे तिथलं विष त्याच ठिकाणी राहतं, रक्‍त पुरवठा चालू राहतो, शिवाय तो विशिष्ट हात किंवा पायही “सजीव” राहतो.

पी. आर., इंग्लंड

अलीकडील अनेक वैद्यकीय पाठ्यपुस्तके या मुद्द्‌याशी सहमत आहेत आणि हे स्पष्टीकरण दिल्याबद्दल आम्ही आमच्या वाचकाचे आभारी आहोत.—संपादक.

डोंबकावळा “डोंबकावळा—कशामुळे तो भिन्‍न आहे?” (जानेवारी ८, १९९७, इंग्रजी) हा लेख प्रकाशित होऊन आला तेव्हा मी आजारी होते. हसण्याच्या मनःस्थितीत तर अजिबातच नव्हते. पण डोंबकावळ्याच्या चतुराईविषयी वाचल्यावर मात्र मला हसू आवरलं नाही. नंतर, सावध राहा! लेखांतील माहितीचा उपयोग करून मी शाळेत, पक्ष्यांवर एक निबंध लिहिला आणि त्याकरता मला अतिशय चांगले मार्क्स मिळाले!

जे. बी., स्लोवाक

अध्ययन असमर्थता “अध्ययन असमर्थतांशी झुंजणाऱ्‍या मुलांना साहाय्य” (मार्च ८, १९९७) या श्रृंखलेसाठी फार आभारी आहे. मी एक खासगी शाळा चालवते आणि माझ्या शिक्षकांसाठी मी याच्या अनेक प्रती तयार केल्या आहेत. तुमच्या मासिकातील माहितीवर आधारित मी बातमीपत्रंही छापली आहेत. एक संतुलित दृष्टिकोन राखून तुम्ही हे विषय लिहिलेत त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.

ई. जी., होंडुरास

एडीडी विकृती असलेल्या मुलांसाठी व प्रौढांसाठी क्रियाशीलपणे कार्य करणाऱ्‍या सर्वात मोठ्या, राष्ट्रीय विना नफा संस्थेची मी कार्यकारी संचालिका आहे. अटेन्शन डेफिसिट हायपरॲक्टिव्हीटी डिसॉर्डर (एडीएचडी) आणि अटेन्शन डेफिसिट डिसॉर्डर (एडीडी), या विषयांवर असे विचारशील लेख लिहिल्याबद्दल तुमची खरंच वाखाणणी करण्यास हवी. या विकृती, एखाद्यास असमर्थ करणाऱ्‍या आणि बहुतेक वेळा योग्य प्रकारे न समजल्या गेलेल्या असतात. मदत हवी असणाऱ्‍या अनेकांना, उचित रोगनिदान आणि प्रयोगसिद्ध उपचारांचा फायदाच होतो हे मान्य केल्याबद्दल आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत. पालकांचे प्रेम आणि समजूतदारपणा यांवर भर दिल्यामुळं एक महत्त्वपूर्ण संदेशही ध्वनित होतो.

एल. आर., संयुक्‍त संस्थाने

माझ्या मुलाला देखील एडीएचडी हा विकार आहे, आणि तो केवळ एक त्रासदायक मूल नाही ही वास्तविकता स्वीकारणं मला फार जड जातं. “त्यांना काय शिस्त लावता येत नाही त्याला?” अशाप्रकारचं बोलणं नेहमीच ऐकावं लागतं. त्याला शिस्त लावण्याच्या प्रयत्नांत मी कोणतीही कसूर ठेवली नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेता, असलं बोलणं मनाला फार झोंबतं. मी आशा करतो, की या विकाराबद्दल तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण त्यांना हे समजण्यास मदत करील, की यामागे खरंच एक समस्या आहे, आणि त्यामुळं इतरांनी अधिक उत्तेजनात्मक असण्यास हवं.

एम. टी., संयुक्‍त संस्थाने

आम्ही, अध्ययन असमर्थता असलेल्या मुलाचे पालक असल्यामुळं हा अंक आम्हाला किती आवडला याची तुम्ही कल्पना करू शकता. याचा पालकांवर कसा परिणाम होतो, तसंच आमच्यावर आधीच या समस्येचा भार असताना इतरांचे टोचणारे शब्द ऐकणं देखील एक मोठा भार आहे; लेखातील हा मुद्दा आम्हाला विशेष मोलाचा वाटला.

जे. सी. आणि बी. सी., कॅनडा

देवाचा मित्र “तरुण लोक विचारतात . . . देवाचा मित्र बनण्यासाठी मी काय करावे?” (मार्च ८, १९९७) या लेखासाठी फार फार आभारी. त्यामुळं मला खूप फायदा झालाय. आता मला फार बरं वाटतं, कारण मला समजलं आहे, की यहोवा माझा मित्र आहे! ही मैत्री कशी टिकवून ठेवावी या लेखासाठी मी आता अधीर झालो आहे.a

टी. ई., इटली

फुले मी दहा वर्षांची आहे आणि, “फुलं दाखवतात की कोणीतरी तुमची पर्वा करतं,” (एप्रिल ८, १९९७) या लेखासाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते. फुलं जास्त वेळ टिकावीत म्हणून त्यांची काळजी कशी घेतली जावी हे मी त्या लेखातून शिकले.

एल. सी., इटली

मला फुलांची खूप आवड असल्यामुळं ती कशी टिकवता येतील असा प्रश्‍न कित्येक वर्षांपासून मला सतावत होता. ती नेहमीच पटकन कोमेजून जायची. सावध राहा! यात दिलेल्या सूचनांमुळं मला खरोखरच मदत मिळाली आहे. तुम्ही करत असलेल्या कार्याची मी मनस्वी कदर करतो.

जे. पी., मेक्सिको

[तळटीप]

a जून ८, १९९७ चे सावध राहा! पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा