वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ५/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९६
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९७
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९७
सावध राहा!—१९९७
g97 ५/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

फुटी निर्माण करणारे भेदभाव “विविध भेदभावांमुळे आपल्यात फुटी निर्माण व्हाव्यात का?” (ऑगस्ट ८, १९९६, इंग्रजी) या मालिकेबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो. आम्ही इथं मेक्सिकोमध्ये गेल्या एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्वयंसेवकांच्या एका गटात काम करत आहोत. कित्येक महिने उलटल्यावरही एकमेकांशी आमचं जमत नव्हतं, पण असं का होतंय याची कल्पना आम्हाला नव्हती. निराळ्या संस्कृतीसोबत मिसळल्यामुळं आम्हाला एक प्रकारचा परकेपणा वाटत होता हे समजण्यास त्या लेखांमुळं मदत मिळाली. “दुसऱ्‍या संस्कृतींविषयी समजून घेतल्याने आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळू शकते” हे वाक्य आम्ही मनावर घेतले आणि आता आम्हाला आमची नियुक्‍ती अत्यंत आवडते.

के. एच आणि जे. एच., मेक्सिको

हा उल्लेखनीय विषय ज्या तऱ्‍हेने प्रस्तुत केला गेला आणि मांडण्यात आला ते मला अतिशय आवडलं. मानवी इतिहासात भेदभावांमुळं पुष्कळ द्वेष निर्माण झाला आहे. हे लेख मला इतर संस्कृतींविषयी अधिक समजून घेण्यास मदत करतील. जगातील सर्वांना हे लेख वाचायला मिळाले आणि त्यांनी इतरांबद्दलची आपली नकारात्मक धारणा बदलली तर किती बरं होईल!

जी. ओ., नायजेरिया

हे लेख वाचून मी अक्षरशः रडले. माझी एक मैत्रिण आहे आणि तिचं आणि माझं खूप पटतं. पण तरीही आमच्यामध्ये एक अदृश्‍य अडथळा असल्याचं मला नेहमी जाणवत असे. आता मला कळालं की, आमच्या दोघींच्या विविध संस्कृती आहेत. या माहितीमुळं, इथून पुढं माझा तिच्यासोबतचा संबंध निश्‍चितच बदलेल.

ए. एफ., संयुक्‍त संस्थाने

कॉलेजमधल्या मानवशास्त्रावरील प्रबंधासाठी संशोधन करताना मी एका आफ्रिकन देशात पुष्कळ आठवडे घालवले. तेव्हा माझी भेट पुष्कळ यहोवाच्या साक्षीदारांशी झाली आणि मला त्यांच्या सभांना देखील उपस्थित राहायला मोका मिळाला. तो एक विलक्षण अनुभव होता! त्या लेखात म्हटल्यानुसार, निराळ्या संस्कृतींच्या लोकांसोबत परिचय करून घेतल्यामुळं पुष्कळ काही शिकायला मिळतं. मला अनेक लोकांसोबत नवीन आणि अर्थपूर्ण मैत्री जमवता आली.

एस. बी., इटली

उडत्या तबकड्या “बायबलचा दृष्टिकोन: उडत्या तबकड्या—देवाकडील संदेष्टे?” (ऑगस्ट ८, १९९६, इंग्रजी) या लेखाबद्दल मी तुमचे आभार मानते. आमच्या या परिसरात काही लोक परग्रहवासीयांविषयीच्या वृत्तांवर विश्‍वास करतात. बायबल त्याविषयी काहीच सांगत नसल्यामुळं त्यांना बायबलविषयी शंका वाटते. सैतान आणि त्याचे दुरात्मे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि परग्रहवासीयांविषयीच्या अशा निराधार वृत्तांवर विश्‍वास करणं मूर्खपणाचं ठरेल हे पाहण्यास त्या लेखाने आमची मदत केली.

ए. डब्ल्यू., तायवान

ट्यूलिपची फुलं “खडतर इतिहास असलेलं फूल—ट्यूलिप.” (ऑगस्ट ८, १९९६, इंग्रजी) या सुंदर लेखाबद्दल आभारी आहे. त्यांच्या उगमाविषयीची माहिती आणि त्यांची लागवड करण्याविषयीची सूचना मला अतिशय रोचक वाटली.

डी. जी., संयुक्‍त संस्थाने

मौज करणे मी बारा वर्षांची आहे आणि मला “तरुण लोक विचारतात . . . दुसरे युवकच मजा का करतात?” (ऑगस्ट ८, १९९६, इंग्रजी) हा लेख खूप आवडला. माझासुद्धा हाच प्रश्‍न असायचा. माझ्या शाळेत पार्ट्या, नृत्य आणि इतर गोष्टींमध्ये भाग घेता येतो. मला पुष्कळदा जावंसं वाटलंय. पण, माझ्या निर्णयांसाठी मी यहोवासमोर जबाबदार आहे हे ओळखण्यास या लेखानं माझी मदत केली. म्हणून मी माझ्या ख्रिस्ती मित्र-मैत्रिणींसोबतच राहीन.

ए. एस., संयुक्‍त संस्थाने

तुम्ही त्या लेखात सांगितल्यानुसार, मलासुद्धा पुष्कळदा [बायबलचा लेखक,] आसाफासारखंच वाटलंय. शाळेमध्ये योग्य निवड करण्यासाठी या लेखानं मला आणखी बळकट केलं.

ए. एस., जपान

काही युवकांना जगिक पार्ट्यांमध्ये सामील होऊ न “दिल्यामुळं” त्यांना एकटं-एकटं किंवा वंचित असल्यासारखं वाटतं हे खरं आहे. पण यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्वच मुलांना तसं वाटत नाही! जगिक पार्ट्यांमध्ये जे काही घडतं त्याबद्दल मला स्वतःला तिटकारा वाटतो आणि माझ्या ख्रिस्ती मित्रमैत्रिणींनाही तसंच वाटतं. आम्हाला—तसंच निश्‍चितच इतर पुष्कळांनाही—वंचित ठेवल्यासारखं वाटत नाही!

के. एच., संयुक्‍त संस्थाने

बदललेल्या प्राथमिकता “त्यांनी आपल्या प्राथमिकता का बदलल्या” (ऑगस्ट ८, १९९६, इंग्रजी) या लेखामुळं मला अतिशय उत्तेजन मिळालं हे मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे. मी १३ पेक्षा अधिक वर्षांपासून पूर्ण-वेळेच्या सुर्वातिकाचं काम करत आलेय, आणि आपल्या या अधिकाधिक धकाधकीच्या जगात प्राथमिकता ठरवणं नेहमीच सोपं नसतं. दर वर्षी, पूर्ण-वेळेच्या सेवेत टिकून राहणं हे जणू आव्हानच बनतं. जेरमीनं, राखीव उद्यानातलं मुख्य अधिकाऱ्‍याचं प्रतिफळदायी करियर सोडून पूर्ण-वेळेची सेवा स्वीकारली याचा विचार केल्यावर, माझ्या स्वतःच्या जीवनात सेवेला प्राधान्य दिल्याचं काही चीज झालंय असं मला प्रोत्साहन मिळालं.

एन. के., संयुक्‍त संस्थाने

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा