तुम्हाला माहीत आहे का?
(या प्रश्नावलीची उत्तरे, दिलेल्या बायबल अवतरणांत आढळतील, शिवाय पृष्ठ २६ वर उत्तरांची छापील यादी देखील पुरवलेली आहे. अतिरिक्त माहितीकरता वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित, “शास्त्रवचनावरील सूक्ष्मदृष्टी” [इंग्रजी] या प्रकाशनात पाहा.)
१. शास्त्री आणि परुश्यांवर दोषारोप लावताना, “वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला मारले?” असे येशूने कोणाबद्दल म्हटले होते? (मत्तय २३:३५)
२. बन्यामिनाचा जेष्ठ पुत्र कोण होता? (उत्पत्ति ४६:२१)
३. कोणता अहरोनी याजक एक नामवंत शास्त्री आणि नियमशास्त्राचा शिक्षक होता? (नहेम्या ८:१, २)
४. एखाद्याला खरोखर ज्ञानी व्हायचे असल्यास जगाच्या नजरेत त्याने काय झाले पाहिजे? (१ करिंथकर ३:१८, १९)
५. कानाच्या लोंबत्या भागास काय म्हटले जाते? (लेवीय १४:१४)
६. पौलाच्या मते, द्रव्याच्या लोभाने काय परिणीत होते? (१ तीमथ्य ६:१०)
७. यहेज्केलच्या दृष्टान्तातील वैभवी रथाचा “पृष्ठभाग” कशासारखा होता? (यहेज्केल १:२२)
८. पौलाला कैद करून रोमला नेताना, ज्या ठिकाणी नौकाभंग होण्याचे खलाशांना भय होते त्या आखाताचे नाव काय? (प्रेषितांची कृत्ये २७:१७)
९. अहरोनाची काठी कोणत्या झाडाची होती? (गणना १७:८)
१०. लोकांच्या जमावापासून आपल्या पाहुण्यांचे संरक्षण करण्यासाठी लोट कोणत्या टोकापर्यंत गेला? (उत्पत्ति १९:६-८)
११. इजिप्शियन मेम्फिस शहरास बायबलमध्ये कोणते नाव दिले आहे? (यशया १९:१३)
१२. तांबड्या मृगाच्या मादीला काय म्हणतात? (नीतिसूत्रे ५:१९)
१३. आपल्या काहीशा जटिल सामाजिक संघटनेमुळे कोणत्या कीटकांना “लोक” असे म्हटले आहे? (नीतिसूत्रे ३०:२५; NW)
१४. यहूदाच्या पत्नीचा कनानी पिता कोण होता? (उत्पत्ति ३८:२)
१५. एका नर गाढवाच्या आणि मादी घोड्याच्या मिश्रजातीय पिल्लास काय म्हणतात? (२ शमुवेल १३:२९)
१६. कोणत्या गोष्टीबद्दल म्हटले आहे की ती, “परमेश्वराला वीट आणिते?” (नीतिसूत्रे १२:२२)
१७. कोणत्या खोट्या दैवतापुढे इस्राएलातील ७,००० जणांनी गुडघे टेकले नाहीत असे एलीयाला सांगण्यात आले? (१ राजे १९:१८)
१८. इब्री आणि ग्रीक भाषेतील शिओल व हेडीस, या दोन्ही शब्दांचा अनुवाद करण्यासाठी वापरलेला, आणि मृतांचे काय होते याविषयी संभ्रम निर्माण करणारा शब्द कोणता आहे? (प्रेषितांची कृत्ये २:३१, किंग जेम्स व्हर्शन)
१९. हन्ना दारूच्या नशेत असावी असा कोणाचा विपरीत ग्रह झाला? (१ शमुवेल १:१३)
२०. रोम मंडळीतील कोणाविषयी पौलाने, “ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला” असे म्हटले? (रोमकर १६:१०)
२१. शुभवर्तमानांत कोणत्या प्रेषिताची विधाने, इतर ११ प्रेषितांपेक्षा अधिक वेळा नमूद केलेली आहेत? (मत्तय १५:१५)
२२. काय घोषित केल्यामुळे फटके बसण्यापासून पौल वाचला? (प्रेषितांची कृत्ये २२:२५-२९)
२३. दफन करण्यास येशूचे शरीर तयार करताना निकदेमने कोणते दोन प्रकारचे मसाले वापरले? (योहान १९:३९)
२४. एकाच कुष्ठरोग्याने येऊन येशूचे आभार मानले त्या प्रसंगी येशूने खरे तर किती कुष्ठरोग्यांना बरे केले होते? (लूक १७:१२-१९)
२५. कोणत्या व्यंगामुळे स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तीला शिव्याशाप देणे नियमशास्त्राप्रमाणे निषिद्ध होते? (लेवीय १९:१४)
प्रश्नावलीची उत्तरे
१. “बरख्याचा पुत्र जखऱ्या”
२. बेला
३. एज्रा
४. मूर्ख
५. पाळी
६. ‘वाईटात’ तसेच ‘विश्वासापासूनही बहकले’ जाणे यात
७. “दिपविणाऱ्या व भयानक स्फटिकासारखे”
८. सुर्ती
९. बदाम
१०. त्याने आपल्या मुली त्यांना देऊ केल्या
११. नोफ
१२. हरिणी
१३. मुंग्या
१४. शूवा
१५. खेचर
१६. असत्य वाणी
१७. बआल
१८. नरक
१९. महायाजक एली
२०. अपिल्लेस
२१. पेत्र
२२. की तो एक रोमी होता
२३. गंधरस व अगरु
२४. दहा
२५. बहिरेपणा