वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १२/८ पृ. ३-५
  • ध्वनी प्रदूषण आधुनिक पीडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ध्वनी प्रदूषण आधुनिक पीडा
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नवीन समस्या नव्हे
  • व्यापक आधुनिक दूषक
  • ध्वनी प्रदूषण तुम्ही काय करू शकता
    सावध राहा!—१९९७
  • शांतता कधी असेल का?
    सावध राहा!—१९९७
  • जेरूसलेममध्ये वाट पाहणं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • वाहतुकीच्या समस्येवर तुमच्याकडे काही तोडगा आहे का?
    सावध राहा!—२००६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १२/८ पृ. ३-५

ध्वनी प्रदूषण आधुनिक पीडा

ब्रिटनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

“जीवनात सर्वाधिक तणाव आणणारी गोष्ट.”—मॉकीस त्सॉपोगॉस, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार.

“अमेरिकेतला सर्वात व्यापक दूषक.”—द बॉस्टन संडे ग्लोब, अ.सं.सं.

“आपल्या समयातील सर्वात घातक दूषक.”—डेली एक्सप्रेस, लंडन, इंग्लंड.

तो दिसत नाही, त्याचा वास घेता येत नाही, तो चाखता येत नाही किंवा त्याला स्पर्श करता येत नाही. ध्वनी, हा आधुनिक शहरी जीवनाचा शाप आता ग्रामीण भागाला ग्रासत आहे.

निसर्गातले आवाज ध्वनिमुद्रित करण्यात सुमारे १६ वर्षे खर्चलेल्या अमेरिकन निसर्ग वैज्ञानिकाला आता आपले काम तितके सोपे वाटत नाही. सन १९८४ मध्ये, संयुक्‍त संस्थानांतल्या वॉशिंग्टन राज्यात, १५ किंवा त्याहून अधिक मिनिटांकरता शांत असलेली २१ ठिकाणे त्याने अभ्यासली. पाच वर्षांनंतर अशी केवळ तीन ठिकाणे उरली होती.

पण जगातल्या बहुतांश रहिवाशांना फक्‍त तीन शांत ठिकाणे मिळणे देखील महामुश्‍कीलीचे आहे. जपानमध्ये, १९९१ च्या राष्ट्रीय अहवालात म्हटले होते की, इतर कोणत्याही प्रदूषणापेक्षा सर्वात जास्त तक्रारी आवाजाविषयी होत्या. म्हणून लंडनचे द टाईम्स, ध्वनीला “सद्य जीवनातली सर्वात मोठी पीडा” म्हणते यात तथ्य आहे. डोके उठवणारे कुत्र्याचे एकसारखे भुंकणे काय, शेजाऱ्‍याच्या स्टिरिओची भणभण काय किंवा कारमधला बरग्लर आलार्म अथवा कार रेडिओची घणघण काय आवाजाशिवाय पान हालत नाही. तरीही, ध्वनी प्रदूषण ही काही नवीन समस्या नाही. त्याची लांबलचक कहाणी आहे.

नवीन समस्या नव्हे

वाहतुकीची गर्दी होऊ नये म्हणून ज्यूलियस सिझरने रोमच्या मध्य भागातून दिवसा गाड्या चालवण्यावर बंदी घातली. पण त्या नियमामुळे, रात्री “दगडी फरश्‍यांवरून गाड्यांच्या लाकडी किंवा लोखंडी चाकांच्या घरघरणाऱ्‍या आवाजामुळे” त्याला आणि रोमी रहिवाशांना बरेच ध्वनी प्रदूषण सोसावे लागले. (लुईस ममफोर्ड यांचे शहराचा इतिहास) (इंग्रजी) शंभरपेक्षा अधिक वर्षांनंतर, जुवेनल या कवीने, आवाजामुळे रोमन लोकांना निद्रानाशाचा कायमचा रोग जडला अशी तक्रार केली.

सोळाव्या शतकापर्यंत इंग्लंडची राजधानी लंडन हे गजबजलेले महानगर बनले होते. एलिझाबेथकालीन इंग्लंड (इंग्रजी) या पुस्तकाची लेखिका ॲलेसन प्लाउडन लिहिते, “तेथे येणाऱ्‍या अनेक लोकांना गेल्या गेल्या तेथील गोंगाट लक्षात आल्याशिवाय राहिला नसणार: हजारो हजार वर्कशॉपमधला तो कलकलाट आणि ती आदळआपट, घोडागाड्यांच्या चाकांचा गडगडण्याचा आणि कर्कश आवाज, बाजारात नेल्या जाणाऱ्‍या गुरांच्या हंबरण्याचा आवाज, आपल्या मालाची जाहिरात करीत रस्त्यावरील विक्रेत्यांचे ते जोरजोरात ओरडणे.”

अठराव्या शतकाने औद्योगिक क्रांतीची सुरवात पाहिली. मग, यंत्रांच्या आवाजाचा परिणाम स्पष्ट दिसू लागला कारण कंपनीतल्या कामगारांच्या श्रवणशक्‍तीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला. पण, कारखान्यांजवळ राहत नसलेले शहरी लोक देखील त्रास होत असल्याची अधिकाधिक तक्रार करू लागले. कोंबड्यांचे आरवणे, शेजाऱ्‍यांच्या पियानोचा आवाज आणि जवळपासच्या रस्त्यावरील वाहतुकीचा आवाज नको म्हणून इतिहासकार थॉमस कारलाईल आपल्या लंडनमधील घराच्या माडीवरच्या “शांत खोलीत” बसायचे. द टाईम्स असे वृत्त देते: “पण त्याचा काही फायदा झाला नाही.” का? “कारण त्यांना बोटींचा भोंगा, रेलगाड्यांचा भोंगा आणि अशाच अनेक आवाजांचा भयंकर त्रास होऊ लागला!”

व्यापक आधुनिक दूषक

आज, ध्वनी प्रदूषण-विरोधक विमानतळांविरुद्ध विशेष प्रतिकार करतात; कारण ध्वनी प्रदूषणाविरुद्ध काही नियम बनवण्याच्या प्रयत्नांचा एअरलाइन्स सक्‍त विरोध करतात. सुपरसोनिक कॉन्कॉर्डच्या उड्डाणाच्या प्रत्येक वेळी इंग्लंडमधल्या मॅनचेस्टर विमानतळाने दंड बसवला पण त्याचा काही फायदा झाला का? काहीच नाही. कॉन्कॉर्डच्या एका कॅप्तानाने म्हटले की विमानाचा आवाज होतो हे खरे पण आवाज कमी करण्यासाठी जर विमानाने कमी इंधन घेतले तर ते टोरोन्टो किंवा न्यूयॉर्कपर्यंत मध्ये न थांबता पोहंचू शकणार नाही.

रस्त्यावरील वाहतुकीच्या आवाजावर प्रतिबंध घालणे देखील तितकेच कठीण आहे. उदाहरणार्थ, जर्मनीत, अभ्यासांवरून दिसून येते की, अशाप्रकारच्या प्रदूषणामुळे ६४ टक्के लोकसंख्येला त्रास होतो. आणि ही समस्या वाढतच आहे; अहवालांनुसार तिचे प्रमाण समाजात वाहतूक नव्हती तेव्हापेक्षा एक हजार पटीने अधिक झाले आहे. ग्रीसमधल्या एका वृत्तानुसार, “युरोपमध्ये एथेन्स हे सर्वात गोंगाटाचे शहर आहे आणि हा कलकलाट इतका वाईट आहे की एथेन्समधल्या लोकांच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे.” त्याचप्रमाणे, जपानच्या पर्यावरण एजेन्सीने देखील वाहतुकीचा आवाज दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे निरीक्षिले आणि गाड्यांचा जास्त वापर हे त्याच्यामागचे कारण आहे असे सांगितले. कारचा वेग कमी असताना इंजिनचाच आवाज जास्त होत असतो पण ताशी ६० किलोमीटरपेक्षा अधिक वेग असताना चाकांचा जास्त आवाज होतो.

ब्रिटनमध्ये ध्वनी तक्रारींचे सर्वात मोठे कारण म्हणजे घरातला गोंधळ. सन १९९६ मध्ये, ब्रिटनच्या चारटर्ड इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरनमेंटल हेल्थने गोंधळ माजवणाऱ्‍या शेजाऱ्‍यांविषयीच्या तक्रारींमध्ये १० टक्के वाढ झाल्याचे नोंदले. त्या संस्थेच्या महिला प्रतिनिधीने म्हटले: “याचं कारण सांगणं कठीण आहे. लोकांच्या कामातल्या धकाधकीमुळे घरी शांततेची जास्त अपेक्षा केली जाते हे एक कारण असावे.” १९९४ दरम्यान ब्रिटनमध्ये नोंदलेल्या दोन तृतीयांश तक्रारी रात्री उशिरापर्यंत चालणारे संगीत आणि वेगाने गाडी चालवण्यामुळे होणारा आवाज, गजर आणि हॉर्न यांविषयी होत्या. पण त्या ७० टक्के ध्वनी-प्रदूषण पीडितांविषयी काय, जे बदला घेतला जाण्याच्या भीतीने तक्रार करत नाहीत. ही समस्या खरोखर व्यापक आहे.

आवाजाच्या व्यापक त्रासामुळे, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्‍या एजेन्सीस ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण राखण्यासाठी नियम करावेत अशी जोरदार मागणी करत आहेत. उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांत काही समाजांनी बागकामाच्या विद्युत यंत्रांच्या वापरावर मर्यादा घालायला काही नियम केले आहेत. ब्रिटनमध्ये, एका नवीन ध्वनीनियंत्रण कायद्यांतर्गत रात्री ११ ते सकाळी ७ च्या दरम्यान गोंधळ करणाऱ्‍या शेजाऱ्‍यांवर जागच्या जागी दंड बसवतात. स्थानिक अधिकाऱ्‍यांना तर मोठ्याने लावलेल्या स्टिरिओ साधनांना जप्त करण्याचाही अधिकार आहे. पण तरीही आवाज आहे तो आहेच.

ध्वनी प्रदूषणाची समस्या खरच वाढत असल्यामुळे तुम्ही पीडित या नात्याने काय करू शकता हा विचार निश्‍चितच तुमच्या मनात आला असेल. पण, तुम्ही सुद्धा आवाजात भर घालण्याचे कसे टाळू शकता? अविरत शांती कधी मिळेल का? या प्रश्‍नांच्या उत्तरांसाठी पुढील लेख वाचा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा