वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ११/८ पृ. ३
  • त्रासमुक्‍त परादीस स्वप्न आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्रासमुक्‍त परादीस स्वप्न आहे का?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • परादीस—म्हणजे काय?
  • पृथ्वीवर नंदनवन—एक कल्पना की वास्तविकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • “नंदनवनात भेटू या!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • बायबलमध्ये उल्लेख केलेले नंदनवन कोठे आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • परादीस—तुम्ही ही आशा बाळगता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ११/८ पृ. ३

त्रासमुक्‍त परादीस स्वप्न आहे का?

“कि ती शांत वातावरण आहे!” अमेरिकेच्या संयुक्‍त संस्थानांच्या इडाहो राज्यातल्या रेडफीश लेकवरील देवदारुच्या वनराईतून दिसणारे दृश्‍य खरेच निवांत होते. “याला म्हणतात नंदनवन,” असे तो प्रवासी म्हणाला.

सायप्रसच्या भूमध्य बेटावरील दक्षिण किनाऱ्‍यावर सूर्य झळाळत होता. लाटा किनाऱ्‍यावर येऊन विरत होत्या. एका खड्या खडकावरच्या रेस्टॉरंटमध्ये बसून ते विहंगम दृश्‍य पाहत असलेल्या पर्यटकाने उद्‌गारले: “हेच ते नंदनवन!”

आम्हा पुष्कळांच्या स्मरणात अशी दृश्‍ये बद्ध होतात. पण तिथल्या रहिवाश्‍यांना माहीत असते की त्या नयनरम्य परिसरांमागे दररोजच्या जीवनातल्या कटू वास्तविकता दडलेल्या असतात: रॉकी पर्वतपायथ्यावरील जंगलातला वणवा, समुद्रातले प्रदूषण ज्याचा माश्‍यांवर आणि सरतेशेवटी मानवांवर होणारा विपरीत परिणाम—शिवाय, आंतरराष्ट्रीय आणि आंतरजातीय जीवघेण्या झगडण्यांविषयी काही वेगळे सांगायला नको.

परादीस—म्हणजे काय?

तुमच्यामते परादीस काय आहे? द न्यू शॉर्टर ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत पॅराडाईजची पहिली व्याख्या अशी दिली आहे: “उत्प[त्ति] २, ३ येथे वर्णन केलेला एदेन बगिचा.” ही व्याख्या बायबलच्या पहिल्या पुस्तकातल्या त्या ठिकाणाच्या वर्णनाला सूचित होते जेथे देवाने पहिल्या मानवाला अर्थात आदामाला ठेवले होते. त्या मूळ परादीसमध्ये, “दिसण्यात सुंदर व अन्‍नासाठी उपयोगी” अशा झाडांची गर्द वनराई होती.—उत्पत्ति २:९.

त्या शब्दकोशातल्या दुसऱ्‍या व्याख्येत “पॅराडाईज” चा संबंध “ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मशास्त्रांमधले स्वर्ग” याजशी जोडला आहे पण ते पुढे म्हणते: “आता खासकरून काव्य[त्मक].” पण आपल्या प्रवाशाला आणि पर्यटकाला परादीस हे “नयनरम्य किंवा नेत्रदीपक ठिकाण” होते; आणि ही शब्दकोशातली तिसरी व्याख्या आहे.

१६ व्या शतकातले ब्रिटिश मुत्सद्दी, सर थॉमस मोअर यांनी युटोपिया हे पुस्तक लिहिले; त्यात त्यांनी एका काल्पनिक देशाचे चित्र रेखाटले होते ज्याच्या नियमांमध्ये, सरकारामध्ये आणि सामाजिक परिस्थितींमध्ये काहीच खोट नव्हती. हे इतके अवास्तविक वाटले की आज वेबस्टर्स न्यू कॉलेजिएट डिक्शनरीत “युटोपिया” चे एक वर्णन “सामाजिक सुधारणेची एक काल्पनिक योजना” असे दिले आहे.

पीपल्स टेंपल पंथाचा पुढारी, जिम जोन्स याच्या अनुयायांकरता युटोपिया हे गुयानातल्या जंगलातली एक साफ जागा होती. दुःखाची गोष्ट अशी, की १९७८ मध्ये ९०० पेक्षा अधिक लोकांसाठी हेच अपेक्षित परादीस, मृत्यूचे दृश्‍य बनले—खरेच भयंकर स्वप्न! म्हणून, काहीवेळा लोक परादीसचा संबंध, धक्केदायक आणि अस्वस्थ करणाऱ्‍या चालीरीती असलेल्या विचित्र पंथांशी जोडतात.

गुन्हेगारी आणि हिंसेचा धोका जेथे वाटतो, जेथे प्रौढांना रोग होतातच पण लहान मुलेही त्यातून सुटत नाहीत, जेथे द्वेष आणि धार्मिक भेदांमुळे समाजात फूटी निर्माण होतात अशा जगात सुंदर परिसर हा फक्‍त दिखावा असतो. म्हणूनच तर, परादीस हे केवळ एक स्वप्न आहे अशी लोकांची धारणा झाली आहे! पण म्हणून लोकांनी रमणीय ठिकाण शोधण्याचे किंवा निर्माण करण्याचेही थांबवलेले नाही. त्यांना कितपत यश लाभले आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा