वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ८/८ पृ. ८-१०
  • इंटरनेटची तुम्हाला खरोखरच गरज आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इंटरनेटची तुम्हाला खरोखरच गरज आहे का?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • गरज—तुम्ही हिशोब लावला आहे का?
  • सुरक्षा—तुमची गोपनीयता कायम राहील का?
  • तुमच्याजवळ एवढा वेळ आहे का?
  • तुम्ही काही गमावत आहात का?
  • इंटरनेट सावध का असावे?
    सावध राहा!—१९९७
  • इंटरनेट याचा सुज्ञपणे उपयोग करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • इंटरनेट आहे तरी काय?
    सावध राहा!—१९९७
  • इंटरनेटचे विनियोग आणि साधने
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ८/८ पृ. ८-१०

इंटरनेटची तुम्हाला खरोखरच गरज आहे का?

तुम्ही इंटरनेट वापरावे का? अर्थात हा ज्याचा त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे; एक असा प्रश्‍न की ज्यावर तुम्ही सांगोपांग विचार केला पाहिजे. तुमच्या निर्णयावर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडू शकेल?

गरज—तुम्ही हिशोब लावला आहे का?

इंटरनेटची अलीकडे जी भरभराट चालली आहे ती बऱ्‍याचशा प्रमाणावर व्यापार विश्‍वाच्या जोरदार विक्री तंत्रांमुळे आहे. अर्थातच, आपल्याला इंटरनेटची गरज आहे असे लोकांना वाटायला लावणे हेच त्यांचे मूळ उद्दिष्ट आहे. गरज असल्याची ही धारणा निर्माण झाली की मग जी माहिती आणि ज्या सेवा तुम्हाला सुरवातीला विनामूल्य उपलब्ध होत्या त्यांसाठी, काही संस्था सदस्यत्वाची रक्कम किंवा वार्षिक वर्गणी मागू लागतात. ही रक्कम, तुम्ही इंटरनेट वापरण्यासाठी जो दरमाही खर्च देता त्याच्या व्यतिरिक्‍त द्यावी लागते. या प्रकारासाठी, इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्‍या काही वृत्तपत्रांचे उदाहरण देता येईल.

तुम्हाला इंटरनेटची नेमकी किती गरज आहे आणि त्यामानाने तुम्हाला साधनसामग्री आणि सॉफ्टवेअर यांवर किती खर्च करावा लागेल याचा तुम्ही हिशोब लावला आहे का? (पडताळा लूक १४:२८.) इंटरनेटची सोय उपलब्ध असणारी सार्वजनिक ग्रंथालये किंवा शाळा आहेत का? या माध्यमांचा उपयोग केल्यास तुम्हाला पर्सनल कॉम्प्युटर आणि संबंधित साधनसामग्रीसाठी मोठी रक्कम न गुंतवता, आपल्याला खरोखर गरज आहे किंवा कसे हे ठरवण्यास मदत होईल. इंटरनेटच्या साधनांची आपल्याला वास्तविकतः किती वेळा गरज पडते हे स्पष्ट होईपर्यंत अशा यथोचित साधनांचा सार्वजनिक माध्यमांतून वापर करता येईल. लक्षात असू द्या, इंटरनेट दोन दशकांपासून अस्तित्वात असूनही सर्वसामान्य जनतेला त्याची गरज पडणे तर दूरच, पण त्यांना त्याचा पत्ताही नव्हता!

सुरक्षा—तुमची गोपनीयता कायम राहील का?

विचारात घेण्याजोगी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोपनीयता. उदाहरणार्थ, तुमचा ई-मेल संदेश तुम्ही ज्याला तो पाठवला आहे केवळ त्यानेच पाहिला पाहिजे. पण, ते पत्र मार्गात असतानाच कावेबाज आणि कदाचित दुष्ट हेतू राखणारी एखादी व्यक्‍ती किंवा काहीजण मिळून तुमचा पत्रव्यवहार खंडित करू शकतात किंवा तुमचे संदेश वाचू देखील शकतात. संदेशांच्या सुरक्षेसाठी काही जण ई-मेल सॉफ्टवेअर साहित्यांचा उपयोग करून पत्र पाठवण्याआधी त्यातला गोपनीय भाग मुद्दामहून उलटापालटा करून टाकतात. दुसऱ्‍या बाजूला, ज्यांना पत्र मिळते त्यांना हा उलटापालटा संदेश पूर्ववत करण्यासाठी अशाच प्रकारच्या सॉफ्टवेअरची गरज पडू शकते.

अलीकडे, इंटरनेटवर क्रेडिट काड्‌र्स आणि व्यावसायिक उपयोगासाठी असणारी इतर गोपनीय माहिती देण्याबद्दल खासकरून बऱ्‍याच प्रमाणावर चर्चा केली जात आहे. पुष्कळशा नवनवीन पद्धती वापरून सुरक्षा वाढेल अशी अपेक्षा केली जात असली तरीसुद्धा, सुविख्यात कॉम्प्युटर सेक्युरिटी ॲनलिस्ट डॉरथी डेनिंग म्हणतात: “संपूर्णतः सुरक्षित असलेल्या यंत्रणा बनवणे शक्यच नाही; तथापि, विशिष्ट यंत्रणेत साठवलेल्या माहितीचे महत्त्व, तसेच, संगणक तंत्रांत पारंगत असणारे (हॅकर्स) आणि विश्‍वासातली माणसे (इन्सायडर्स) यांच्याकडून संभवणाऱ्‍या धोक्याच्या समप्रमाणात, ही जोखीम बरीच कमी करता येते.” कोणत्याही संगणकप्रणालीत संपूर्ण सुरक्षा साधणे अशक्य आहे, मग ती इंटरनेटला जोडलेली असो वा नसो.

तुमच्याजवळ एवढा वेळ आहे का?

आणखी एक महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे तुमचा वेळ. इंटरनेट इनस्टॉल करून त्याची सफर करू शकण्यासाठी आवश्‍यक उपकरणे कशी हाताळायची हे शिकून घ्यायला किती वेळ लागेल? शिवाय, एका अनुभवी इंटरनेट मार्गदर्शकाने सांगितले, की इंटरनेटवर शोधभ्रमण करताना “कोणाही नवशिक्याला याची फार वाईट रितीने चटक लागते आणि हे त्याच्यासाठी अत्यंत वेळखाऊ काम ठरू शकते.” असे का बरे?

कितीतरी लक्षवेधक विषयांना आणि शोधून काढण्याजोग्या नवनवीन गोष्टींना अंतच नसतो. खरे तर इंटरनेट म्हणजे अत्यंत आकर्षक डॉक्यूमेंट्‌स असलेली जणू असंख्य ग्रंथालये. यातील केवळ एक लहानसा भागही चाळून पाहतो म्हटले तरी अख्खी संध्याकाळ अशी निघून जाईल की तुम्हाला झोपेची आठवणसुद्धा येणार नाही. (पृष्ठ १३ वर “तुमच्या वेळेचे मोल किती?” या शीर्षकाची पेटी पाहा.) अर्थात, सर्वच वेब व्यासंगी असे नियंत्रण गमावून बसत नाहीत. तथापि, वेबवर शोधभ्रमण करताना वेळेवर आणि माहितीच्या प्रमाणावर निर्बंध लावणे—विशेषतः मुलांच्या बाबतीत असे करणे शहाणपणाचे ठरेल. कित्येक कुटुंबे टीव्हीच्या बाबतीतही असेच निर्बंध लावतात.a यामुळे, एकमेकांच्या सहवासात आणि आध्यात्मिक कार्यांत घालवण्यासाठी राखून ठेवलेला वेळ वाया जाणार नाही.—अनुवाद ६:६, ७; मत्तय ५:३.

तुम्ही काही गमावत आहात का?

कालांतराने, इंटरनेटचे तंत्र जगाच्या विकसनशील भागांत अधिक व्यापक प्रमाणावर प्रचारात येईल. तथापि, पहिल्या लेखाच्या सुरवातीला उल्लेखलेल्या लोकांना आठवून पाहा. त्यांना उपलब्ध झालेली बरीचशी माहिती ग्रंथालये, दूरध्वनी, सर्वसामान्य टपाल, किंवा वृत्तपत्र यांसारख्या माध्यमांतूनही मिळवता येण्यासारखी होती. अर्थात, यातील काही पद्धतींना अधिक वेळ लागू शकतो किंवा अधिक खर्च येऊ शकतो. तरीसुद्धा, सबंध जगातील बहुतांश लोकांसाठी याच पारंपरिक पद्धती काही काळापर्यंत तरी दळणवळणाच्या प्रमुख पद्धती म्हणून कायम राहतील.

[तळटीप]

a सावध राहाच्या! (इंग्रजी) फेब्रुवारी २२, १९८५ अंकातील “तरुण लोक विचारतात . . . माझा टीव्हीचा नाद कसा सुटेल?” हा लेख पाहा.

[९ पानांवरील चित्र]

आत्मनियंत्रण नसल्यास नेटवर शोधभ्रमण करणे पाशरूप ठरू शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा