पृष्ठ दोन
इंटरनेट तुमच्यासाठी आहे का? ३-१३
इंटरनेट म्हणजे जणू कधी न संपणाऱ्या असंख्य साधनांचे भांडार. काहीजण त्याला माहितीचा सुपरहायवे म्हणतात. तुम्हाला स्वतःला त्याची गरज आहे का? काही बाबतीत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे का?
नेहमी मलाच का दोषी ठरवलं जातं? १४
कशाच्याही बाबतीत काही गडबड झाली की लगेच त्याचं खापर हमखास तुमच्याच डोक्यावर फोडलं जाईल असं तुम्हाला वाटू लागलंय का? तुमच्यावर अन्यायीपणे टीका केली जाते तेव्हा तुम्ही या परिस्थितीला कसे तोंड देऊ शकता?
हिरे इतके महाग का असतात? २०
बहुमोल हिऱ्याची निर्मिती कशाप्रकारे केली जाते? या प्रश्नाच्या उत्तरावरून याची किंमत एवढी प्रचंड का असते हे लक्षात येईल.