त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली
भारतात, यहोवाच्या साक्षीदारांशी भेट झालेल्या एका व्यक्तीला हे दिसून आले की, त्याने चर्चमध्ये जे शिकले होते त्यापेक्षा त्यांचे शिक्षण काही निराळेच होते. त्याने यहोवाच्या साक्षीदारांशी याविषयी चर्चा केली आणि भारतातील शाखा दप्तराला पत्र लिहून प्रश्न देखील विचारले.
मग, एके दिवशी या व्यक्तीचे पत्र आले ज्यात अशी सुरवात केली होती: “लोणावळ्यातील माझ्या प्रिय बंधूंनो”—हे भारतातील साक्षीदारांच्या शाखा दप्तराचे ठिकाण आहे. त्याने पुढे म्हटले: “मे ८, १९९५, सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकातील ‘तुम्ही कधी विचार केला आहे का?’ या लेखात माझ्या सर्व शंकांची आणि प्रश्नांची उत्तरे सहजासहजी मिळाली. यहोवाच्या साक्षीदारांकडेच सत्य आहे याची मला पूर्णपणे खात्री पटली आहे.”
त्या सावध राहा! नियतकालिकात पुढील प्रश्नांची उत्तरे होती: “खरी उपासना देवाचे नाव प्रकट करील की ते लपवण्याचा प्रयत्न करील?” “आपल्या शिकवणुकींमुळे खऱ्या धर्माचे कोणते वर्तन असावे?” “देवाची स्वीकृती असलेली उपासना युद्धांमध्ये सहभाग त्याचप्रमाणे जातीय अथवा जमातीय हत्याकांडांना अनुमती देईल का?”
सावध राहा! नियतकालिक बायबल सत्याच्या शोधात तुमचीही मदत करू शकते अशी आम्हाला खात्री आहे. तुम्हाला त्याची प्रत हवी असल्यास, अथवा कोणी तुमच्या घरी येऊन तुमच्यासोबत बायबलची चर्चा करण्याची तुम्हाला इच्छा असल्यास, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहून पाठवा.