वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ८/८ पृ. २४-२५
  • विज्ञान आणि बायबल यांमध्ये एकमत आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विज्ञान आणि बायबल यांमध्ये एकमत आहे का?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चमत्कार अवैज्ञानिक आहेत का?
  • बायबल विज्ञानाच्या विरोधात?
  • श्रेष्ठ उगमाकडील ज्ञान
  • या पुस्तकाचा विज्ञानाशी मेळ आहे का?
    सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक
  • धर्म आणि विज्ञान—एक वाईट मिश्रण
    सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
सावध राहा!—१९९७
g97 ८/८ पृ. २४-२५

बायबलचा दृष्टिकोन

विज्ञान आणि बायबल यांमध्ये एकमत आहे का?

विमाने आणि अणुबॉम्बपासून ते आनुवंशिक बदल केलेल्या पेशी आणि मेंढीचे प्रतिरूप तयार करण्यापर्यंत आपले २० वे शतक विज्ञानाचे वर्चस्व असलेले युग राहिले आहे. वैज्ञानिकांनी लोकांना चंद्रावर पोचवले, देवीच्या रोगाचे निर्मूलन केले, कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणली आणि अब्जावधी लोकांसाठी क्षणार्धात, जागतिक पातळीवर संचार करणे शक्य बनवले आहे. म्हणून वैज्ञानिक बोलतात आणि लोक डोळे मिटून मान्य करतात यात नवलाईचे असे काही नाही. पण बायबलविषयी वैज्ञानिकांचे काय मत आहे? आणि, बायबल आपल्याला विज्ञानाविषयी काय सांगते?

चमत्कार अवैज्ञानिक आहेत का?

“वैज्ञानिक विचारपद्धतीचे लोक ‘कारण-परिणाम’ संबंधावर विश्‍वास ठेवतात. त्यांच्या मते प्रत्येक गोष्टीसाठी एक अगदी स्वाभाविक स्पष्टीकरण असते,” असे एका आधुनिक विश्‍वकोशात म्हटले आहे. बायबलचे विद्यार्थी देखील प्रमाणित वैज्ञानिक तत्त्वे मानतात. तथापि, त्यांना याची जाणीव आहे की, बायबलमध्ये बहुधा अशा चमत्कारिक घटनांची चर्चा केली आहे की ज्यांचे सद्य माहितीनुसार वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येत नाही. यहोशवाच्या काळातले सूर्याचे स्थिरावणे आणि येशूचे पाण्यावर चालणे ही त्याची उदाहरणे आहेत. (यहोशवा १०:१२, १३; मत्तय १४:२३-३४) परंतु, हे चमत्कार म्हणजे अलौकिक पद्धतीने देवाच्या शक्‍तीने घडणारी कृत्ये आहेत असे दाखवले जाते.

हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जर का बायबलने असे म्हटले की, ईश्‍वरी मदतीविना लोक पाण्यावर चालू शकतात अथवा आकाशातल्या सूर्याच्या हालचालीत कोणत्याही कारणाविना अडथळा आणला जाऊ शकतो तर मग ते वैज्ञानिक वस्तुस्थितींच्या विरोधात ठरू शकते. परंतु, या घटना देवाच्या शक्‍तीमुळे घडल्या असे म्हटल्यावर, बायबल अहवाल, विज्ञानाच्या विरोधात जात नाही तर विज्ञान ज्यास अद्याप समजू शकलेले नाही अशा गोष्टींची चर्चा करते.

बायबल विज्ञानाच्या विरोधात?

दुसऱ्‍या बाजूला पाहता, बायबल जेथे लोकांच्या जीवनातल्या सर्वसामान्य घटनांविषयी किंवा वनस्पती, प्राणी अथवा नैसर्गिक घटनांविषयी बोलते त्याचे काय? मनोरंजक गोष्ट अशी की, वरील विवेचनांचा संदर्भ लक्षात घेता, त्या त्या बाबतीत बायबल प्रमाणित वैज्ञानिक वस्तुस्थितींच्या विरोधात असल्याचे सिद्ध करून दाखवलेले कोणतेही उदाहरण नाही.

उदाहरणार्थ, बायबलमध्ये बहुधा काव्यात्मक भाषेचा उपयोग दिसून येतो की ज्यावरून हजारो वर्षांआधी राहत असलेल्या लोकांच्या समजुतींची झलक मिळते. ईयोबाच्या पुस्तकात यहोवा आकाशाला ठोकून “धातूच्या ओतीव आरशासारखे मजबूत” करत असल्याचे म्हटले आहे तेव्हा आकाश, लखलखणाऱ्‍या धातूच्या आरशासारखे असल्याचे यथायोग्य वर्णन केले आहे. (ईयोब ३७:१८, मराठी कॉमन लँग्वेज) पृथ्वीला “स्तंभांचा पाया” किंवा “कोनशिला” असल्याचा दृष्टान्त ज्याप्रमाणे शब्दशः अर्थाने घेतला जाणार नाही त्याचप्रमाणे या दृष्टान्ताचा अक्षरशः अर्थ घेण्याची गरज नाही.—ईयोब ३८:४-७.

हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण अनेक विवेचनकर्त्यांनी अशा दृष्टान्तांचा शब्दशः अर्थ लावला आहे. (पाहा २ शमुवेल २२:८; स्तोत्र ७८:२३, २४.) द अँकर बायबल डिक्शनरी मधून उद्धृत केल्यानुसार बायबल खालीलप्रमाणे शिकवण देते असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

“मानवजात ज्यावर वसते ती पृथ्वी गोल, घन वस्तू कदाचित तबकडी असून पाण्याच्या अमर्यादित विस्तारावर तरंगते असा समज आहे. याच खालील पाण्याच्या विस्ताराच्या समांतरात वरती अशाच प्रकारचा दुसरा पाण्याचा अमर्यादित विस्तार आहे, ज्यातून स्वर्गातील जलसंचयाला असलेल्या छिद्रांमधून आणि पाटांमधून पाणी पावसाच्या रूपात खाली पडते. चंद्र, सूर्य आणि इतर ज्योती पृथ्वीवरच्या कमानीसारख्या घडणीत बसवलेले आहेत. ही रचना याजकीय अहवालातले सुपरिचित आकाश (rāqîa‛) आहे.”

स्पष्टतः, हे वर्णन आधुनिक विज्ञानाच्या विरोधात आहे. पण स्वर्गाबद्दल बायबलच्या शिकवणुकीचा हा निष्कर्ष रास्त आहे का? मुळीच नाही. द इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया म्हणतो की, इब्री विश्‍वमंडलाची ही वर्णने “जु[न्या] क[रारातल्या] प्रत्यक्ष विधानांवर आधारित असण्याऐवजी तमोयुगादरम्यान युरोपमध्ये प्रचलित असलेल्या कल्पनांवर खरे म्हणजे आधारित आहेत.” या मध्ययुगीन कल्पना कोठून आल्या? पाश्‍चात्त्य विज्ञानाचा उगम (इंग्रजी) यात डेवीड सी. लिंडबर्ग स्पष्ट करतात की, पुष्कळसे मध्ययुगीन शिक्षण ज्यांच्या साहित्यावर आधारलेले होते ते प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानी एरिस्टोटल यांच्या विश्‍वरचनाशास्त्रावर त्या कल्पना अधिककरून आधारलेल्या होत्या.

देवाने, विसाव्या शतकातल्या वैज्ञानिकाला पसंत पडणाऱ्‍या भाषेत बायबल व्यक्‍त करणे हे निरर्थक आणि गोंधळविणारे वाटले असते. वैज्ञानिक फॉर्मुले देण्याऐवजी बायबलमध्ये अशा दृश्‍यांना शब्दात उतरवले आहे की ज्या दृश्‍यांविषयी प्रथम उल्लेख करण्यात आला ती दृश्‍ये या लेखकांच्या दररोजच्या जीवनातून घेतलेली आहेत—आजही ती एखाद्या विशिष्ट काळापुरतीच मर्यादित होती असे भासत नाही.—ईयोब ३८:८-३८; यशया ४०:१२-२३.

श्रेष्ठ उगमाकडील ज्ञान

परंतु, रंजक गोष्ट अशी की, काही बायबलमधील संदर्भ त्या काळातल्या लोकांना ज्ञात नसलेले वैज्ञानिक ज्ञान प्रकट करतात असे दिसून येते. देवाने ‘उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरवून पृथ्वी निराधार टांगली आहे,’ असे वर्णन ईयोब देतो. (ईयोब २६:७) पृथ्वी, “निराधार” टांगली असल्याची ही कल्पना अनेक प्राचीन लोकांच्या दंतकथांपेक्षा फारच वेगळी होती ज्यांच्या मतांनुसार ती हत्तींवर किंवा समुद्रातील कासवांवर आधारली होती. त्या काळच्या वैद्यकीय ज्ञानाच्या कितीतरी काळाआधीच, मोशेच्या नियमात स्वास्थ्यासंबंधी काही नियम दिले होते. महारोग असल्याचा संशय असलेल्या लोकांना वेगळे ठेवण्याविषयीच्या आणि मृत लोकांना स्पर्श न करण्याविषयीच्या नियमांमुळे निश्‍चितच कित्येक इस्राएली लोकांचे जीव वाचले. (लेवीय १३; गणना १९:११-१६) त्याच्या अगदीच विरोधात, अश्‍शुरी लोकांच्या वैद्यकीय उपचारांचे वर्णन “धर्म, शकुनविचार, भूतविद्या यांचे मिश्रण” असे केले आहे आणि त्यांमध्ये कुत्र्याची विष्ठा आणि मानवांच्या लघवीने केलेल्या उपचारांचा देखील समावेश होता.

निर्माणकर्त्याने प्रेरित केलेल्या पुस्तकाकडून अपेक्षित असल्यानुसार, बायबलमध्ये बऱ्‍याच काळाआधी अचूक वैज्ञानिक माहिती दिली आहे आणि तरीही प्राचीन लोकांना निरर्थक किंवा गोंधळात टाकले असते अशा वैज्ञानिक स्पष्टीकरणाचीच चर्चा ते करत बसलेले नाही. बायबल, ज्ञात असलेल्या कोणत्याही वैज्ञानिक वास्तविकतांच्या विरोधात नाही. उलट, प्रमाणित न झालेल्या सिद्धान्तांच्या जसे की, उत्क्रांतीच्या सिद्धान्ताच्या विरोधात बायबल आहे.

[२५ पानांवरील संक्षिप्त आशय]

पृथ्वी “निराधार टांगलेली” आहे हे ईयोबाचे बोल त्याच्या समकालीन लोकांना ठाऊक नसलेले ज्ञान प्रकट करतात

२४ पानांवरील चित्राचे श्रेय]

NASA

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा