वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ४/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • लाईम रोग तुम्हाला त्याचा धोका आहे का?
    सावध राहा!—१९९६
  • कार्निव्हल उत्सव बरोबर की चुकीचे?
    सावध राहा!—१९९६
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९७
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ४/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

दूरध्वनीवरील शिष्टाचार “तुमचे दूरध्वनीवरील शिष्टाचार कसे आहेत?” (जुलै-सप्टेंबर १९९६) या सुरेख लेखाकरता आभारी आहे. मी अशा एका बँकेत कामाला आहे जिथं ग्राहकांना दूरध्वनीद्वारे सेवा उपलब्ध आहेत. मी माझ्या सुपरव्हाईझरला हा लेख दिला आणि तो लेख फायदेकारक, समयोचित आणि व्यावहारिक असल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी आमच्याकडील सर्व ३२ टेलिफोन ऑपरेटर्सना हा लेख द्यायला सांगितला.

एन. जे. एस., ब्राझील

गतकाळात गुन्हेगारी हेतूस्तव अनावश्‍यक टेलिफोन करणाऱ्‍या लोकांचा त्रास झाल्यामुळं, अशा कोणा व्यक्‍तीनं फोन केल्यास तीनदा शालीनतेनं विचारल्यावरही तिनं आपलं नाव सांगितलं नाही तर फोन ठेवून द्यावा असं कंपनीनं सुचवल्यानुसार आम्ही पुष्कळ दिवसांपासून करत आलो आहोत. यामुळं लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे, काही वेळा कोण बोलतंय ओळखा पाहू अशी गंमत कोणा मित्रानं केली असल्यास, त्याला वाईट वाटलं आहे. यांसारखे लेख, अशा क्षुल्लक बाबतीतही चांगुलपणा आणि समंजसपणा दाखवायला उत्तेजन देतात.

जी. ए., संयुक्‍त संस्थाने

लाईम रोग “लाईम रोग—तुम्हाला त्याचा धोका आहे का?” (जुलै-सप्टेंबर १९९६) या लेखासाठी आभारी आहे. डॉक्टर असल्यामुळं, अलीकडेच हा रोग असलेले बरेचसे रुग्ण माझ्याकडे आले होते, आणि त्या लेखात दिलेल्या प्रतिबंधांचे मी समर्थन करतो. बहुतेक वेळा, रुग्णांकडे अधिक लक्ष दिलं जात नाही आणि त्यामुळे त्यांना पुष्कळ काळापर्यंत त्रास सोसावा लागतो. सावध राहा! नियतकालिकाने त्या रोगाच्या संधिदाह प्रकाराविषयी सांगितलं जो संयुक्‍त संस्थानांत सगळीकडे पाहायला मिळतो. युरोपमध्ये इतर दोन रोगकारके सापडली आहेत जी नेहमीच्या प्रयोगांद्वारे निष्पन्‍न होत नाहीत. प्रतिजैव औषधे, लाईम रोगाच्या केवळ सुरवातीच्या टप्प्यातच गुणकारी ठरतात आणि बहुधा नंतर त्यांचा काहीएक परिणाम होत नाही.

आय. एस., जर्मनी

मला लाईम रोग असल्यामुळं, हा सुंदर लेख माझ्यासाठी अतिशय प्रोत्साहक होता. सर्व वाचक या रोगाकडे दुर्लक्ष करणार नाहीत आणि आवश्‍यक ते सर्व प्रतिबंधक उपाय करतील अशी माझी आशा आहे.

डी. पी., संयुक्‍त संस्थाने

शिक्षणसंबंधी विकार “तरुण लोक विचारतात . . . मी का शिकू शकत नाही?” (जुलै-सप्टेंबर १९९६) या लेखाची मी खरोखर प्रशंसा करते. त्या लेखात दिलेल्या काही कारणांमुळे शाळेत मला अतिशय झटावं लागतंय. तुम्ही दिलेल्या सुचना मी अंमलात आणणार आहे. फार फार आभारी आहे.

आर. के., संयुक्‍त संस्थाने

शिकण्यात मला मुळीच रस उरला नव्हता आणि मी शाळेत जास्त लक्षही देत नव्हतो. लेखात दिलेल्या सुचना अनुसरून माझ्या शिक्षणाच्या सवयी सुधारण्याची मी आशा करतो.

एम. इ. ओ., युगांडा

मला शिक्षणसंबंधी कसलेही विकार नाहीत पण मला अभ्यास करायला मुळीच आवडत नाही. गणितातले सूत्र लक्षात ठेवणं सुद्धा मला कठीण जातं. अल्पकालीन स्मरण अडचणींकरता मदत म्हणून या लेखात पुनरुक्‍ती करणे आणि मोठ्याने वाचण्याविषयी सांगितलं होतं. सुरवातीला मला वाटलं, की मोठ्याने वाचणं विचित्र असेल पण नंतर मात्र मजा येऊ लागली!

एन. आय., जपान

तडीपार “मला तडीपार करण्यात आले होते” (जुलै-सप्टेंबर १९९६) हा फ्रँक मॉन्‍निनो यांचा अनुभव छापल्याबद्दल आभारी आहे. त्याचा माझ्यावर प्रभाव पडला आणि आपला निर्माणकर्ता यहोवा किती शक्‍तिशाली आणि प्रेमळ आहे हे समजण्यास मला मदत मिळाली. मी ३० वर्षांपासून त्याची सेवा करत आहे आणि या अनुभवानं मला वेळ मिळेल तेव्हा प्रचार कार्यात होता होईल तितकं करण्यास प्रोत्साहन दिलं आहे.

इ. बी., इटली

या लेखानं मला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याच्या सुहक्काचं मूल्य जाणण्यास मदत केली. व्यक्‍तिगत सुव्यवस्था नसल्यामुळं सभांना नेहमी उशिरा जाण्याची माझी सवय बनली आहे. तुरुंगात असताना फ्रँक मॉन्‍निनोला फारसं स्वातंत्र्य नव्हतं पण तरीही तो फलदायी होता.

डी. डब्ल्यू., संयुक्‍त संस्थाने

तुरुंगात असतानाही फ्रँक मॉन्‍निनोनं किती आवेश दाखवला ते पाहून मी हेलावून गेलो. त्याच्या जीवनाची सुरवात वाईट असली, तरीही आता तो एक आदर्श आहे.

के. आर., संयुक्‍त संस्थाने

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा