वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ४/८ पृ. ३१
  • कळकळीची एक याचना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कळकळीची एक याचना
  • सावध राहा!—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • बाळाच्या आगमनामुळे वैवाहिक जीवनात बदल कसा होतो?
    तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
  • मुले—जबाबदारी व एक बहुमान
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • मुलांच्या गरजा व इच्छा
    सावध राहा!—२००४
  • नव्यानेच पालक बनलेल्यांची आव्हाने
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ४/८ पृ. ३१

कळकळीची एक याचना

मे ८, १९९६ च्या सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकात दत्तक घेण्याविषयी काही लेख प्रकाशित झाले होते. यासाठी सबंध जगभरातून मिळालेला वाचकांचा प्रतिसाद पाहून आम्ही अतिशय अचंबित झालो आहोत. पुढील पत्र तर सर्वात हृदयस्पर्शी होते.

“आपल्या मुलांना दत्तक दिलेल्या आम्हापैकी पुष्कळांना खरं म्हणजे आमची मुलं हवी होती हे आवर्जून सांगितलंच पाहिजे असं मला वाटलं. मी शाळेत जाणारी अविवाहित किशोरवयीन होते. मला दिवस गेलेत असं माझ्या पालकांना कळताच, मी मुलाचं हित पाहावं आणि त्यास दत्तक द्यावं असं त्यांनी मला सांगितलं. ‘बाळाला आई आणि बाबा दोन्ही हवे असतात,’ असं मला सांगण्यात आलं आणि ही गरज मी पूर्ण करू शकत नव्हते. बाळाला मी आपल्याजवळ ठेवावं हे माझ्या पालकांना मान्य नव्हतं—बाळ माझ्याजवळ राहिलं असतं तर घरात मला थारा नव्हता. अशावेळी मी काय करू शकले असते? त्यांनी असा वाद केला: ‘तुला स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणून नंतर तू आपल्या बाळाचा द्वेष करू लागशील.’

“मला दिवस गेल्याचं स्पष्ट दिसू लागलं तेव्हा त्यांनी मला शाळेतून काढलं आणि एका नातेवाईकाकडे राहायला पाठवलं. घर सोडताना, माझं बाळंतपण होऊन बाळाला दत्तक देईपर्यंत मला घरात घेतलं जाणार नाही याची मला जाणीव होती.

“मला अविवाहित मातांसाठी असलेल्या आश्रमात पाठवण्यात आलं. मी बाळाला दत्तक देण्याचा खरोखर निर्णय घेतला आहे का असं तिथल्या सामाजिक कार्यकर्तीनं मला विचारलं तेव्हा माझ्याकडे दुसरा पर्याय उरलाच नव्हता याची जाणीव तिला नसल्याचं मला माहीत होतं. मला माझं बाळ हवं होतं! त्यास हसत आणि आनंदी असलेलं पाहायची मला खूप इच्छा होती. जन्म दिलेल्या अनेक मातांना माझ्यासारखंच वाटतं याची जाण तुमच्या वाचकांना असली पाहिजे.

“मला खरं म्हणजे अशी कोणतीच निवड करायला दिली नव्हती.” म्हणून मुलाच्या ‘हिताचा’ विचार करून मी सांगण्यात आलं होतं तसंच केलं. आणि तेव्हापासून माझ्या मनात हे दुःख सलतंय. मला माझ्या मुलाबद्दल काळजी नव्हती आणि मला तो नकोसा होता असा विचार माझा मुलगा करील अशी चिंता मला वाटते.

“आता एक ख्रिस्ती असल्यामुळं, आपल्या जीवनात देवाच्या वचनानुसार न जगल्यामुळं आपण जी संकटं स्वतःवरच ओढवून घेतो त्यासंबंधी बायबलच्या सल्ल्याची मी नेहमी कदर करते. जगिक तर्क करण्याचे कोणते दुःखमय आणि व्यापक परिणाम आहेत त्यांस ते स्पष्ट करते. पण, दत्तक घेतलेल्यांना हे ठाऊक असलं पाहिजे की त्यांना दत्तक देण्यात आलंय म्हणजे ते नको होते असं नाहीय. तुम्ही त्यांना हे सांगावं अशी माझी कळकळीची विनंती आहे!”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा