मौल्यवान नियतकालिक
लंडनमधील एका नर्सने सावध राहा! नियतकालिकाच्या प्रकाशकांना पुढीलप्रमाणे लिहिले:
“एका दिवशी, मी वृद्ध लोकांसोबतच्या माझ्या कामाविषयी जॅकीशी अर्थात माझ्या नवीन शेजारणीशी बोलत होते. ‘माझ्याकडे काही पत्रिका आहेत आणि त्या वृद्धजणांना वाचायला आवडतील,’ असं ती म्हणाली. तिची नियतकालिकं मी कामावर घेऊन गेले आणि तिथं टीपॉयवर ठेवून दिली. पुढे मला दिसून आलं की, ही नियतकालिकं हाताळल्यासारखी वाटत होती म्हणजेच लोक ती वाचत होती.
“नंतर मी माझी नोकरी बदलली आणि एका इस्पितळात काम करू लागले. मी वेटींग रूममध्ये माझ्या शेजारणीने दिलेली नियतकालिकं ठेवून दिली. पुन्हा एकदा मला दिसलं की लोक ती वाचत होती. एकदा सकाळी, मी एका वृद्ध बाईच्या हाताला मलमपट्टी करत असताना तिचा पती म्हणाला: ‘अहो, मी तुमच्या वेटींग रूममधून हे नियतकालिक घेऊन गेलो होतो, चालतं ना असं. त्यामध्ये एक सुंदर लेख होता आणि माझ्या मुलाला तो मला दाखवायचा होता.’
“ही नियतकालिकं माझ्यासाठी सुद्धा फायदेकारक ठरलीत. माझं अद्यापही नर्सिंगचं शिक्षण चालू असल्यामुळं, मी या लेखांमधली माहिती माझ्या रिसर्च पेपर्समध्ये उपयोगात आणली आणि माझ्या शिक्षकांना ते आवडलं.
“माझी शेजारीण एक यहोवाची साक्षीदार आहे आणि मी ज्या नियतकालिकाविषयी बोलतेय ते आहे सावध राहा! नियतकालिक. या नियतकालिकातल्या माहितीमुळं मला स्वतःबद्दल आणि मानवजातीच्या भविष्याबद्दल पुष्कळसं समजून घेण्यास मदत मिळालीय.”
तुम्हाला सावध राहा! नियतकालिकाचे भावी अंक हवे असल्यास, कृपया स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा अथवा पृष्ठ ५ वर दिलेल्या जवळच्या पत्त्यावर लिहून पाठवा.