वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ३/८ पृ. २९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • हात धुवा!
  • सिंहावलोकनाद्वारे प्रगतिपथावर
  • हसा आणि दीर्घकाळ जगा?
  • जीवनरक्षक डॉल्फिन
  • “फास्ट फूड” प्रभूभोजन
  • प्रवासी कबूतरे
सावध राहा!—१९९७
g97 ३/८ पृ. २९

जगावरील दृष्टिक्षेप

हात धुवा!

एखादे सार्वजनिक स्वच्छतागृह वापरल्यानंतर किती लोक आपले हात धुतात यावर सूक्ष्मजीवशास्त्राच्या अमेरिकन संस्थेने अलीकडेच एक संशोधन केले, असा अहवाल द न्यूयॉर्क टाइम्स देते. आपण आपले हात धुतले पाहिजेत हे बहुधा प्रत्येक व्यक्‍तीला माहीत असते. दूरध्वनीमार्फत घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये १,००४ प्रौढांपैकी ९४ टक्के लोकांनी, आपण एखादे सार्वजनिक स्वच्छतागृह वापरल्यानंतर आपले हात धूत असल्याचा दावा केला. परंतु, ते खरोखरच तसे करतात का? अमेरिकेच्या पाच महानगरांमध्ये स्वच्छतागृहांवर निरीक्षण ठेवणाऱ्‍या संशोधकांच्या निदर्शनास आले, की ६,३३३ व्यक्‍तींपैकी केवळ ६१ टक्के पुरुष आणि ७४ टक्के स्त्रिया शौचालय वापरल्यानंतर आपले हात धुतात. अस्वच्छ हात सहजपणे रोग पसरवू शकतात आणि अस्वच्छ हातांनी अन्‍न हाताळणाऱ्‍या केवळ एका वाढप्यामुळे डझणावारी लोक रोगी होऊ शकतात. या समस्याचे एक कारण पालकत्वाच्या मार्गदर्शनाचा अभाव, हे असू शकते. “आजकालच्या माता आपल्या मुलांना हात धुण्यास सांगत नाहीत,” अशी डॉ. गेल कॅसल यांनी टिप्पणी केली. “शाळाही मुलांना याविषयी काही शिकवत नाहीत. आपल्याला याची आठवण करून द्यायला हवी, की हे खरोखरच महत्त्वाचे आहे.”

सिंहावलोकनाद्वारे प्रगतिपथावर

ट्रँझिस्टरच्या आधी निर्वातनलिका हयात होत्या. आता संशोधक गतकाळावर नजर टाकत आहेत. उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठाचे भौतिकशास्त्रवेत्ता ग्रीफ्फ एल. बिलब्रो म्हणतात: “१९४० च्या दशकांतील निर्वातनलिकांचे आम्ही पुन्हा परीक्षण करत होतो. पण, रडार आणि सेल्युलर फोनमध्ये अतिउच्च वारंवारतांसह त्यांचे कार्य कसे आहे ते पाहण्यासाठी आम्ही आता नवीन साधनसामुग्रींचा आणि कॉम्प्युटर डिझाइन साधनांचा उपयोग करत आहोत.” नवीन व जुन्या नलिकांतील एक फरक आकारमानासंबंधी आहे. नवीन नलिका अतिशय लहान असून त्यांचा गट आगकाडीच्या टोकाएवढ्या असतो. विज्ञान वार्ता (इंग्रजी) म्हणते, की “हिऱ्‍यामध्ये विद्यूत अग्र घालून व आतील भागांतून वायू काढून” यांची निर्मिती केली जाते. “नवीन हिरा-निर्वातनलिका व ५० वर्षांपूर्वीचा मोठा काचेचा बल्ब यांच्यातील एक मोठी तफावत म्हणजे उष्णता. इलेक्ट्रॉन प्रवाह उत्सर्जित करण्याकरता जुन्या नलिकांना तप्त करून लाल करावे लागत होते. नवीन नलिका खोली तापमानात विद्यूत प्रवाह उत्पन्‍न करतात.” अर्धसंवाहक व कॉम्प्युटर चिप्सपेक्षा अधिक टिकाऊ असण्याखेरीज ह्‍या नवीन नलिका तापमान, विद्युत दाब आणि प्रारण यांमध्येही त्यांना मागे टाकतात.

हसा आणि दीर्घकाळ जगा?

पुरोगामी काळापासून असे मानले जाते, की हसणे एक गुणकारी औषध आहे. दहा वर्षांपूर्वी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी याचे कारण शोधून काढण्याचे ठरवले. त्यांनी अलीकडच्या आपल्या संशोधनात प्रकट केले, की हसण्यामुळे शक्‍तिशाली संप्रेरके सोडण्यास मदत होते जी एखाद्या व्यक्‍तीची प्रतिक्षम संस्था उत्तेजित करतात. सायटोकाइन नामक संप्रेरकांचा एक गट, श्‍वेत रक्‍त पेशींचे कार्य पुरस्कारण्यासाठी गवसण्यात आला आहे; ह्‍या पेशी, विषाणूजन्य व अणुजीव रोग टाळण्यास आवश्‍यक असतात तसेच संभवनीय कर्करोगाच्या पेशींचा नाश करतात. “हसण्यामुळे ज्यांचे प्रमाण वाढते त्यांपैकी [ही सायटोकाईने] केवळ एकच पदार्थ” आहेत असे लंडनचे द सन्डे टाइम्स म्हणते. हसणे आणि सायटोकाइनमधील या दुव्यामुळे काही संशोधकांनी त्यांचा उल्लेख आनंदी संप्रेरके असा केला आहे. म्हणून वृत्तपत्र हसण्याला, “दीर्घकाळाच्या जीवनाचे सूत्र” असे संबोधते.

जीवनरक्षक डॉल्फिन

वाणिज्य नियतकालिक (इंग्रजी) असा अहवाल देते, की तांबड्या समुद्रात पोहणाऱ्‍या एका व्यक्‍तीला डॉल्फिनच्या एका समुहाने कदाचित वाचवले असावे. ब्रीटनचे मार्क रिचर्डसन ईजिप्शियन किनाऱ्‍यापासून दूरवर पोहत असता एका शार्कने त्यांच्यावर हल्ला केला. शरीराच्या एका बाजूस आणि हातावर शार्कने त्यांना चावल्यानंतर “शार्कला घाबरवण्यासाठी आपले पर आणि शेपूट फडफडणाऱ्‍या” तीन बॉटल नोज डॉल्फिनने त्या व्यक्‍तीला घेरले. “श्री. रिचर्डसनचे मित्र त्यांच्या मदतीकरता येईपर्यंत” ते डॉल्फिन “त्यांच्या भोवती घेरा करून राहिले होते.” नियतकालिक यानुसार “आपल्या पिलांचे संरक्षण करतेवेळी डॉल्फिनची अशाप्रकारची वागणूक सर्वसामान्यपणे दिसून येते.”

“फास्ट फूड” प्रभूभोजन

जिम जॉन्सन नामक एक अमेरिकी उद्योगपती, चर्चच्या प्रभूभोजन सेवेत वापरण्यासाठी आधीच पॅक केलेले टाकाऊ ख्रिस्ती चिन्हे उत्पन्‍न करत असल्याचा अहवाल ख्रिश्‍चॅनिटी टूडे देते. अतिशय लहान कपासारख्या जांभळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये थोडासा द्राक्षारस अथवा द्राक्षाची दारू असते. यात, वरील आवरणे काढता येण्याजोग्या दोन कप्प्यांमध्ये बेखमीर भाकरीचे वेफरसुद्धा असते. जॉन्सन यांच्या मते, ह्‍या उत्पन्‍नाचे फायदे म्हणजे तयारी आणि स्वच्छ करण्यासाठी लागणारा कमीतकमी वेळ, किफायतशीरपणा आणि स्वच्छता हे आहेत. प्रभूभोजनाप्रती असणाऱ्‍या “घाऊक विक्री” प्रस्तावासंबंधी तक्रारी असल्या तरी ४,००० पेक्षा अधिक चर्चेस आधीच ह्‍या उत्पन्‍नाकडे वळाले आहेत. जॉन्सन असे उत्तर देतात: “येशूने जनसमुदायास खाऊ घातले तेव्हा त्याने पहिल्या फास्ट फूड भोजनाची तरतूद केली.”

प्रवासी कबूतरे

नव वैज्ञानिक (इंग्रजी) हे नियतकालिक अहवाल देते, की लंडनमधील कबूतरे, रोज ये-जा करणाऱ्‍या प्रवाशांसह भुयारी मार्गाने जाणाऱ्‍या गाड्यांतून फुकट प्रवास करत असल्याचे कित्येक कालावधीपासून निरीक्षण्यात आले आहे. या व्यतिरिक्‍त काही लोक असाही दावा करतात, की कोणत्या स्टेशनवर उतरायचे हे देखील या पाखरांना ठाऊक असते. नियतकालिकाने लोकांना आपले अनुभव विचारल्यानंतर, पुष्कळ वाचकांनी पिसे असलेल्या या प्रवाशांच्या संदर्भातले आपले वैयक्‍तिक अनुभव लिहून पाठवले. उदाहरणार्थ, एका मनुष्याने लिहिले: “सन १९७४-७६ दरम्यान, फिकट लालसर रंगाचे एक कबूतर मला नियमितपणे दिसायचे; ते पॅडिंगटनला गाडीत चढायचे आणि पुढच्या स्टेशनला उडून जायचे.” दुसऱ्‍या एका इसमाने खूप पूर्वी म्हणजे १९६५ साली असेच एक असाधारण दृश्‍य निरीक्षिले. असे दिसून येते जणू, ह्‍या कबूतरांचा, सुमारे ३० वर्षांपासून लंडनच्या वाहतुकीने फुकटचा प्रवास चालला आहे!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा