पृष्ठ दोन
सहिष्णुता—जगाने याबाबतीत कहर केला आहे का? ३-९
सहिष्णुतेकरता समतोलाची आवश्यकता असते आणि समतोल राखणे तितके साधेसोपे नव्हे. घड्याळाच्या लंबकासारखे आपण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झुलत असतो. काही वेळा आपण खूपच कमी सहिष्णुता दर्शवितो तर काही वेळा अतिरेक करतो.
फ्लोरिडातील एव्हरग्लेड्स—अरण्याचा आक्रोश १३
चिंतातूर पर्यावरण तज्ज्ञ, एव्हरग्लेड्स नष्ट होत असल्याचा इशारा देत आहेत. ह्या विलक्षण ‘गवताळ नदीचा’ बचाव करता येईल का?
पृथ्वी अग्नीने भस्म होईल काय? १८
पृथ्वी अग्नीने भस्म होईल अशी शिकवण कित्येक शतकांपासून अनेक धर्मांनी दिली आहे. परंतु, याबद्दल बायबलचा दृष्टिकोन काय आहे?