वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १/८ पृ. ३१
  • ह्‍या कुडूला विस्मरण झाले नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ह्‍या कुडूला विस्मरण झाले नाही
  • सावध राहा!—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • एड्‌स—साथीचा अंत दिसत नाही
    सावध राहा!—१९९८
  • माझी ओळख काय आहे?
    तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं
सावध राहा!—१९९७
g97 १/८ पृ. ३१

ह्‍या कुडूला विस्मरण झाले नाही

दक्षिण आफ्रिकेतील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

देखणी नागमोडी शिंगे आणि मोठमोठाले कान असलेला डौलदार नर कुडू, अँटिलोपच्या जातीतलाच एक आहे. वयात आल्यावर त्याची खांद्यापर्यंतची उंची सुमारे १५० मीटर इतकी असते. मादीला, बहुधा शिंगे नसतात तरी देखील आपल्या मोठमोठाल्या कानांमुळे ती पटकन ओळखली जाते. कुडू हा बुजरा प्राणी असून नेहमी सतर्क असतो आणि आश्रयाकरता धूम ठोकण्यासही सदैव तत्पर असतो. यास्तव, झिंबाब्वेमधील कॅरनच्या बाबतीत जे घडले ते विलक्षण आहे.

आफ्रिकी वन्यजीवन (इंग्रजी) या नियतकालिकाने दिलेल्या अहवालानुसार, तारेच्या कुंपणात अडकलेल्या एका लहान मादी कुडूच्या पाडसाची सुटका करून त्याला कॅरनच्या स्वाधीन करण्यात आले जिने काही सप्ताहांपर्यंत त्याला बाटलीने दूध पाजले. त्याची चांगली वाढ होऊ लागली आणि कॅरन व तिचे कुटुंब राहत होते तेथील दुग्धालयाच्या आवारात राहून बहुतेकवेळा मुले व कुत्री यांच्याबरोबर ते खेळत असे. तथापि, हळूहळू ते जंगलाकडे जाऊ लागले आणि जवळजवळ वयात आलेली ही मादी कुडू मळ्यापासून दिसेनाशी झाली.

सुमारे दोन वर्षांनंतर, कॅरन मळ्याजवळून आपल्या कारमधून जात असता एक गाभण असलेली कुडू, आपली मोटारगाडी जवळ आल्यावरही पळाली नाही हे पाहून कॅरन हरकून गेली. ती तिच्यापाशी जाऊ लागली तरी देखील तिने तेथून पळ काढला नाही. एव्हाना तिला हे समजले होते, की हा तोच प्राणी असावा ज्याला तिने बाटलीने दूध पाजले होते म्हणून सावकाश त्याच्या जवळ जाऊन ती हळू आवाजात त्याच्याशी बोलू लागली. कुडूने देखील तिला ओळखले होते कारण ती आपले डोके खाली लवून कॅरेनला स्पर्श करत होती व कॅरनलाही तिने कुरवाळू देले!

काही महिन्यांनंतर ही कुडू पुन्हा रस्त्यावर दिसली—मात्र यावेळी एका लहानशा पाडशासह. कॅरनला वाटले जणू ती आई मोठ्या अभिमानाने त्या पाडसाचा परिचय करून देत होती आणि पुन्हा एकवार तिने तिला प्रेम करू दिले. काही आठवड्यांनी पुन्हा अशीच एक घटना घडली जेव्हा असे दिसत होते जणू ती कुडू खरोखर कॅरनचीच वाट पाहत होती.

आणखी काही महिने उलटले आणि काही शेतमजुरांनी, गळ्यात फांस अडकलेली हिच कुडू पाहिल्याची माहिती दिली. तो फांस काढण्यासाठी ते कुडूजवळ जाऊ लागले तशी ती पळून गेली होती. म्हणून मग कॅरन तिला हाक मारत झुडपांमध्ये शोधू लागली. लागलीच ती तिच्या समोर येऊन उभी राहिली. कुडूला अतिशय आवडणारा थोडासा ब्रेडदेखील कॅरनने विचारपूर्वक आणला होता आणि हा आवडता पदार्थ तिला चारत असता कॅरनच्या पतीने, त्या कुडूच्या गळ्यात अडकलेला त्रासदायक फांस कापून टाकला.

मानव आणि प्राणी यांमध्ये दीर्घकाल टिकून राहिलेल्या या सुस्पष्ट बंधनामुळे ह्‍या कुटुंबास एक आगळाच आनंद मिळाला.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा