वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १/८ पृ. २६-२९
  • घानातील “पारंपरिक विवाह”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घानातील “पारंपरिक विवाह”
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पालकत्वाची जबाबदारी
  • द्वार-ठोठावण्याचा समारंभ
  • विवाह समारंभ
  • कोकऱ्‍याच्या लग्नाविषयी आनंद करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • तुम्हाला माहीत होतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • आफ्रिकी संस्कृतीतील-वधूमूल्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • देवाच्या व मानवांच्या दृष्टीने आदरणीय लग्नसमारंभ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १/८ पृ. २६-२९

घानातील “पारंपरिक विवाह”

घानामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

विवाह—विश्‍वभरातून लाखो लोक प्रती वर्षी या बंधनात बांधले जातात. ते ज्या ठिकाणी राहतात तेथील विवाह परंपरेनुसार बहुधा ते असे करत असतात.

घानामध्ये विवाहाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ज्यास पारंपरिक विवाह असे संबोधले जाते तो आहे. यात, वराच्या कुटुंबाने वधुच्या कुटुंबास वधू-किंमत देण्याची पद्धत अंतर्भूत आहे. काही मोजक्यांचाच उल्लेख करायचा झाल्यास पारंपरिक विवाह हा आफ्रिकेतील बहुतेक भागांत व हाँग काँग, पापुआ-न्यू-गिनी, सॉलोमन बेटे यांसारख्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांमधून तसेच ईशान्य कोलंबिया आणि वायव्य व्हेनेझुएला येथील ग्वॉचीरो इंडिअन्समधून पार पाडला जातो.

वधू-किंमत देणे ही बायबल काळांत एक परंपरा होती. (उत्पत्ति ३४:११, १२; १ शमुवेल १८:२५) वधू-किंमत ही मुलीची मदत गमावल्याची आणि तिच्या शिक्षणासाठी तसेच तिची काळजी वाहण्यासाठी विवाहापूर्वी तिच्या पालकांनी देऊ केलेला वेळ, परिश्रम व खर्च यांची त्यांना दिलेली भरपाई आहे अशी प्राचीन तशीच अर्वाचीन समजूत आहे.

पालकत्वाची जबाबदारी

घानाच्या पुरोगामी काळात, तरुणांमधील संकेतभेटी तसेच प्रणयराधना ह्‍या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. समाजातील विवाहयोग्य तरुण मुलामुलींचे कसोशीने परीक्षण करून पालक आपल्या परिपक्व मुलांचा विवाह ठरवत असत. घानातील काही पालक अद्यापही हीच चाल अनुसरतात.

मुलाचे पालक विविध गोष्टींची पारख करतात जसे की, मुलीचे व्यक्‍तिमत्त्व; तिचा तसेच तिच्या कुटुंबाचा नावलौकिक; कुटुंबात कदाचित आनुवंशिकरित्या असलेले आजार; आणि यहोवाची साक्षीदार असल्यास तिची आध्यात्मिकता. यांचे समाधान झाल्यास, पालक औपचारिकरित्या मुलीच्या पालकांची भेट घेऊन विवाहाकरता मागणी घालतात.

आता मुलीचे पालक, मुलाच्या तसेच त्याच्या कुटुंबाच्या पार्श्‍वभूमीची चौकशी करतात. वर उल्लेखिलेल्या गोष्टींव्यतिरिक्‍त, पत्नीला पोसण्याची मुलाची क्षमता—तो नोकरीवर आहे की बेकार आहे? याचाही ते विचार करतात. मुलीच्या पालकांचे समाधान झाल्यास ते मुलाच्या पालकांना तसे कळवतात आणि मुलगा-मुलगी यास सहमत असल्यास त्यांचे पालक विवाहासंबंधीच्या विविध बाबी संयुक्‍तपणे ठरवतात.

काही पालक, अद्यापही आपल्या परिपक्व अपत्यांकरता विवाह सोबती शोधण्याची जबाबदारी का घेतात? भारतातील एक स्त्री जिचा विवाह तिच्या पालकांनीच ठरवला, असे वक्‍तव्य करते: “एखादी तरुण व्यक्‍ती इतका मोठा निर्णय कशी काय घेऊ शकेल? त्याऐवजी सर्वात सुज्ञ निवड करण्याचा हा निर्णय वयाने मोठ्या असणाऱ्‍या तसेच अनुभव असणाऱ्‍या व्यक्‍तींवर सोपवून देणे सर्वात उत्तम.” तिची विवेचने अनेक आफ्रिकी लोकांचीही मते ध्वनित करतात.

तथापि, घानामधील काळाला आता एक वेगळीच कलाटणी मिळत आहे. संकेतभेटी व प्रणयराधना या गोष्टी आता सर्वसामान्य बनत आहेत. जोडपे आपली उद्दिष्टे प्रणयराधनेतील आता एका योग्य क्षणी पालकांच्या कानावर घालतात. त्यांच्या पालकांच्या परस्परामधील बोलाचालीनंतर तसेच ती एक उत्तम जोडी असल्याचे समाधान त्यांना मिळाल्यास कुटुंबे द्वारावर अर्थात विवाहाच्या द्वार ठोठावणे हा घानाच्या विविध भाषांत सामान्यपणे ज्ञात असलेला औपचारिक समारंभ पार पाडण्याकरता पुढचे पाऊल उचलतात.

द्वार-ठोठावण्याचा समारंभ

जोडप्याचे पालक बैठकीची तारीख आणि तिचा उद्देश यांबद्दल कौटुंबिक सदस्यांना कळवतात. “कौटुंबिक सदस्य” ही संज्ञा, जोडप्यांचे काका, काकी, मामा, मामी, भावंडे, आजीआजोबा यांचा समावेश असलेल्या विस्तारित आफ्रिकी कुटुंबास सूचित करते. ठराविक दिवशी दोन्ही कुटुंबांचे प्रतिनिधी समारंभासाठी एकत्र येतात. वराची उपस्थिती पर्यायी असते. अशाच एका द्वार-ठोठावण्याच्या समारंभात जे काही घडले त्याचे संक्षिप्त वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

मुलीचा प्रतिनिधी (मुलीचा): [वराच्या प्रतिनिधीशी बोलताना] तुमचं इथं येण्याचं कारण आम्हास ठाऊक असलं तरी परंपरेमुळं तुम्हाला विचारणं भाग पडतं, की तुमचा इथं येण्याचा उद्देश काय आहे?

मुलाचा प्रतिनिधी (मुलाचा): आमचा मुलगा क्वॉझी तुमच्या घरावरून जात असता एक फूल त्याच्या नजरेत भरलं आणि ते घेण्याची अनुमती त्याला हवीय.

मुलीचा: [अज्ञानाचे सोंग करून] या घरात तर कोणतंही फूल नाही. तुम्ही स्वतः याची खात्री करू शकता.

मुलाचा: आमच्या मुलाच्या नजरेनं निश्‍चित धोका खाल्ला नाही. आम्ही पुन्हा एकदा खात्रीनं सांगतो, की ते सुंदर फूल याच घरात असून त्या फुलाचं नाव ऑफी असं आहे.

मुलीचा: अच्छा! तर तुम्ही एका मानवी फुलाविषयी बोलताय तर. होय, ऑफी इथं निश्‍चित राहते.

मुलाचा: आम्हाला द्वार ठोठायचय आणि क्वॉझीसोबत विवाह करण्याकरता ऑफीचा हात हवाय.

आता मुलाचे कुटुंब काही वस्तू सादर करतात जसे, की विविध पेये आणि काही रक्कम. जमातीनुसार सादर केलेल्या वस्तू आणि त्यांचे प्रमाण कमीजास्त असते. हा समारंभ, काहीसा पाश्‍चिमात्य रितीतील मागणी सारखा असतो आणि काही वेळा अंगठी घालण्याचीही मागणी केली जाते.

आता आणलेल्या चीजवस्तू स्वीकाराव्यात की नाही याबद्दल वधुचा प्रतिनिधी सर्व बघ्यांदेखत तिला विचारतो. तिच्या होकारात्मक उत्तराद्वारे विवाहाकरता तिच्या स्वेच्छेचे, उपस्थित असलेले सर्वजण साक्षी असतात. वधू-किंमत देण्याकरता तसेच विवाहाकरता दोन्ही कुटुंबांसाठी सोयीस्कर असेल अशी एक तारीख ठरवण्यात येते. अल्पोपहाराने मग समारंभाचा समारोप होतो.

विवाह समारंभ

द्वार-ठोठावण्याच्या समारंभास उपस्थित असणाऱ्‍या लोकांच्या संख्येपेक्षा वधू-किंमत देण्याकरता आणि विवाहाकरता मुलीच्या घरी अथवा एखाद्या निवडलेल्या प्रतिनिधीच्या घरी जमलेल्या लोकांची संख्या बहुधा अधिक असते. याचे कारण, पुष्कळ मित्रमंडळी आता उपस्थित असते.

वातावरण उल्हासी असते. वधुकरिता कोणकोणत्या गोष्टी आणल्या आहेत ते पाहण्यासाठी अविवाहित स्त्री-पुरुष उत्सुक असतात. परंतु, वधुचे कुटुंब, वधू-किंमत असलेल्या चीजवस्तू अपुऱ्‍या असल्याची तक्रार करते तेव्हा मात्र हे उल्हासी वातावरण तणावपूर्ण बनते. वधुचे कुटुंब निग्रही असल्याचे दिसते तेव्हा श्रोतेगणातील काही जण श्‍वास रोखून पाहत असतात. आता मुलाचा प्रवक्‍ता, वधुच्या कुटुंबाला गळ घालून त्यांना सहानुभूती दाखवायला सांगतो. मुलीचे कुटुंब पाझरते तेव्हा सगळ्यांच्याच मनांवरील दडपण दूर होते. वातावरण पुन्हा बदलते. आता ते उत्सवी होते आणि मग अल्पोपहार दिला जातो.

नंतर, वधुचा प्रवक्‍ता मेळाव्यास शांत करून सर्वांचे स्वागत करतो. तो वराच्या प्रतिनिधींना त्यांच्या उद्देशाची विचारपूस करतो. वराचा प्रवक्‍ता आपल्या येण्याचे कारण सांगून द्वार आधीच ठोठावले असल्याचे तसेच प्रवेश करण्याची परवानगीही प्राप्त झाली असल्याचे स्मरण मेळाव्यास करून देतो.

प्रत्येक कुटुंब प्रवक्‍ता, जमलेल्या मेळाव्यास, निकटच्या कौटुंबिक सदस्यांची ओळख करून देतो; यात विवाहात मुलीचा हात देणारा व विवाहात मुलाचा पाठीराखा असणारा यांचाही समावेश होतो. समारंभ पुढे चालू राहतो.

मुलीचा: [वराच्या प्रतिनिधींशी बोलताना] आम्ही मागितलेल्या चीजवस्तू कृपया सादर कराव्यात.

वधुचा प्रवक्‍ता वधू-किंमतीच्या चीजवस्तूंची यादी सांगतो जेणेकडून त्या सर्व वस्तू आल्या आहेत की नाही याची सगळे जण खात्री करू शकतील. वधुच्या कुटुंबाने आपली मागणी वाढवली असल्याचे वराच्या प्रतिनिधींना वाटले, तर विवाहाच्या आदल्या दिवशी ते हा वादविषय आपापसात मिटवतात. तथापि, जर का वधुचे कुटुंब निग्रही असल्याचे सिद्ध झाले तर मागितलेल्या अतिरिक्‍त वस्तूंमध्ये घट करण्याच्या जय्यत तयारीसह वराचे कुटुंब समारंभास हजर होते. व्यक्‍ती कोठेही राहत असो ठरवलेली वधू-किंमत—मग ती अधिक असो अथवा कमी असो—ती पूर्णपणे चुकती करायलाच हवी.

काही कुटुंबे अशा काही वस्तूंची मागणी करत असतात जसे की, कंठमाला, कर्णाभुषणे आणि अशी इतर स्त्री प्रसाधने. उत्तर घानात, वधू-किंमतीत मीठ, कोलाकवची फळे, गिनी फाउल, मेंढरे आणि गुरेढोरे यांचा देखील समावेश होऊ शकतो. वधू-किंमतीतून कधीही न वगळला जाणारा एक घटक अर्थात रोख रक्कम असायलाच पाहिजे.

वाटाघाटी चालू असता, वधू तेथे उपस्थित नसते परंतु ती जवळपासच कोठेतरी असून सगळे काही पाहत असते. वराची उपस्थिती पर्यायी असते. अशाप्रकारे दूर राहणारी एखादी व्यक्‍ती आपल्यावतीने विवाहाचा ठरवण्याचा अधिकार आपल्या पालकांवर सोपवू शकते. तथापि, येथे वर्णिलेल्या प्रसंगी मात्र वर उपस्थित असतो. आता त्याच्या कुटुंबाने मागणी करण्याची वेळ येते.

मुलाचा: आमच्याकडून अपेक्षिलेल्या सर्व अटी आम्ही पूर्ण केल्या आहेत परंतु अद्याप आम्ही आमची सून पाहिलेली नाही.

विवाह समारंभ हा संपूर्णत: गंभीर स्वरूपाचा व्यवहार नसतो; तो मौजमजा करण्याचाही प्रसंग असतो. आता मुलीचे कुटुंब वधुला पाहण्याच्या वराच्या कुटुंबाच्या मागणीला प्रतिसाद देते.

मुलीचे: वधू इथं उपस्थित असावी असं आम्हालाही वाटत होतं. परंतु दुर्दैवाची बाब अशी, की ती परदेशी गेलीय आणि तिला माघारी आणण्याकरता आमच्याजवळ पासपोर्ट अथवा व्हिझा उपलब्ध नाहीय.

याचा काय अर्थ होतो हे सगळेच जाणून असतात. तात्काल, वराचे कुटुंब एक ठराविक रक्कम सादर करते—वराला परवडेल अशी कोणतीही रक्कम—आणि काय चमत्कार! नकली पासपोर्ट आणि व्हिझा तयार होतो. आणि वधू आपल्या यात्रेवरून येते देखील!

यात आणखी रंगत आणण्याकरता काही जमाती, वधुच्या मैत्रिणींना तिची भूमिका करण्याची योजना आखतात. टाळ्यांचा गजर होत असता खरी वधू सामोरी येईपर्यंत तिची भूमिका करणाऱ्‍या प्रत्येकीला समुहाद्वारे पूर्णपणे नकार दिला जातो. मग, तिच्या वधू-किंमतीच्या चीजवस्तूंची पाहणी करण्यास तिच्या प्रवक्‍त्‌यामार्फत तिला बोलवले जाते. वराने जे काही आणले आहे ते स्वीकारावे की नाही याविषयी तिला विचारले जाते. उत्तरासाठी सर्वजण श्‍वास रोखून थांबलेले असता सर्वत्र नीरव शांतता पसरते. काही मुली बुजऱ्‍या असतात तर काही धीट असतात; बहुतेककरून उत्तर होकारार्थीच असते व त्यानंतर टाळ्यांचा गजर होतो.

वर हजर असल्यास वधुचे कुटुंब त्याला पाहण्याची मागणी करते. त्याच्याच एका मित्रामार्फत त्याची भूमिका साकारण्याची योजना आखली असल्यास ती मौज अधिकाधिक वाढत जाते. त्याचा मित्र आता थाटात उभा राहतो परंतु त्याच्याविरुद्ध आरडाओरड करून त्याला तत्काळ खाली बसवण्यात येते.

वधुचे पालक जावयास पाहण्याची मागणी करतात. आता खरा वर चेहऱ्‍यावर स्मितहास्य झळकत उभा राहतो. वधुचे कुटुंब तिला आपल्या पतीस भेटण्याची अनुमती देते; आणि वधू-किंमतीत अंगठीचा समावेश असल्यास तो ती अंगठी तिच्या बोटात घालतो. अंगठीची ही प्रथा पाश्‍चिमात्य देशांतून आत्मसात केलेली आहे. नंतर वधुसुद्धा त्याच्या बोटात अंगठी घालते. सबंध वातावरण अभिनंदन आणि उल्हास यांनी भरून जाते. सोयीसाठी तसेच काटकसरीसाठी सध्या काही जण द्वार-ठोठावण्याचा समारंभ आणि विवाह एकाच दिवशी ठेवतात.

आता दोन्ही कुटुंबांतील अनुभवी सदस्य नवविवाहितांना, मृत्यूपर्यंत विलग न होऊन ते आपला विवाह कशाप्रकारे यशस्वी करू शकतात यावर सल्ला देतात. दिवसाचा शेवट आनंदाने करण्यासाठी अल्पोपहार दिला जातो.

विवाह समारंभ पार पाडला जातो! घानामध्ये त्या दिवसापासून ते जाडपे कायदेशीररित्या विवाहित असल्याचे समाजात मानले जाते. काही कारणास्तव मुलीच्या कुटुंबातील कोणी मुख्य सदस्य या समारंभास उपस्थित राहू शकले नसतील तर विवाह समारंभ पूर्ण झाला असल्याची खात्री पटवण्याकरता दिलेल्या पेयांमधूनच काही पेये त्यांना पाठवली जातात. वधू-वर यहोवाचे साक्षीदार असल्यास, एक बायबल आधारित भाषण देण्याची व त्यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते.

घानामधील काही जोडपी विवाह समारंभाची पाश्‍चात्त्य पद्धत अनुसरतात जिला तेथे नोंदणी विवाह किंवा कायदेशीर विवाह संबोधले जाते. जोपर्यंत जोडपे विवाहास योग्य अशा वयाचे आहेत तोपर्यंत पालकांच्या संमतीने अथवा त्याशिवाय हा विवाह पार पाडला जाऊ शकतो. पारंपरिक विवाहामध्ये पालकांची संमती आवश्‍यक असते.

नोंदणी विवाहात जोडपे विवाह शपथा घेतात. परंतु, पारंपरिक विवाहांमध्ये शपथा अंतर्भूत नसतात. सरकार मागणी करते, की सर्व पारंपरिक विवाह कायदेशीररित्या नोंदविली जावीत आणि यहोवाचे साक्षीदार याचे पालन करतात. (रोमकर १३:१) त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.

पुरातन काळापासून सध्या घाना म्हटलेले गोल्ड कोस्ट हे ब्रिटिशांची वसाहत होईपर्यंत पारंपरिक विवाह हा देशातील विवाहाचा एकमेव प्रकार होता. नंतर, मग ब्रिटिशांनी येथील आपल्या नागरिकांकरिता पाश्‍चात्त्य पद्धत प्रस्तुत केली. या देशातील रहिवाशांना देखील अशाप्रकारचा विवाह जोडण्याची अनुमती देण्यात आली आणि कित्येक वर्षांपासून पाश्‍चिमात्य पद्धतीचा विवाह आणि पारंपरिक विवाह एकजुटीने अस्तित्वात राहिले आहेत. घानामध्ये विवाहाच्या ह्‍या दोन्ही प्रकारांना कायदेशीर मान्यता असल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांना ते स्वीकारहार्य आहेत. आपल्या आवडीनुसार कोणत्या प्रकाराची निवड करावी हे वैयक्‍तिकांवर अवलंबून असते.

काही आफ्रिकी देशांत, जोडपी कायदेशीरित्या विवाहित असल्याचे समजले जाण्यापूर्वी पारंपरिक विवाहांची कायदेशीर नोंद करणे आवश्‍यक असते. तथापि, वर वर्णिल्यानुसार घानामध्ये पारंपरिक विवाह हे कायदेशीर नोंद केल्याशिवाय देखील विधीग्राह्‍य असतात; पारंपरिक विवाहाचा समारोप झाल्यानंतर जोडपी कायदेशीररित्या विवाहबद्ध असल्याचे मानले जाते. कालांतराने, केवळ नोंदणी अहवालाकरिता पारंपरिक विवाह कायदेशीररित्या नोंदविला जातो.

विवाह, खरोखर देवाकडून मानवजातीला दिलेले एक वरदान आहे जे, देवदूतांना देखील दिले गेले नव्हते. (लूक २०:३४-३६) ह्‍या बहुमोल नातेसंबंधाचा आद्य प्रवर्तक, यहोवा देव त्याच्या गौरवाप्रीत्यर्थ हा नातेसंबंध निश्‍चित जतन करण्यायोग्य आहे.

[२९ पानांवरील चित्र]

एकमेकांना अंगठ्या घालत असताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा