वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ७/८ पृ. २९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्त्रियांकरता अधिक कामाचा भार
  • “टीबी टाईम बॉम्ब”
  • खूप मोठे, अतिशय दुर्गंधीचे फूल
  • वेदनेशिवाय झोपी जाणे
  • १९९५ मध्ये “आणखी एक लीप वर्ष”
  • सूर्यप्रकाश मनोधैर्य वाढवतो
  • पाण्याबद्दल दक्ष असणारे जग
  • बायबल काळातील जेरुसलेम पुरातत्त्वविद्या काय प्रकट करते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
सावध राहा!—१९९६
g96 ७/८ पृ. २९

जगावरील दृष्टिक्षेप

स्त्रियांकरता अधिक कामाचा भार

पुरुष व स्त्रिया घरातील काम एकसारखेच वाटून घेतात का? आकडेवारीच्या जर्मन संघ कार्यालयाने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार तसे होत नाही. नॉरबेट श्‍वार्टस व डीटर शाफर या अर्थशास्त्रज्ञांनी, ७,२०० घराण्यांना, घरातील काम करण्यात ते किती वेळ खर्च करतात त्याचे पृथक्करण करून नोंद करण्यास सांगितले. भांडी घासणे, बाजारहाट करणे, आजारी नातेवाईकांची काळजी घेणे व मोटारीची दुरुस्ती करणे अशी कामे त्या सर्वेक्षणात समाविष्ट होती. “स्त्रियांना नोकरी असली किंवा नसली तरीही त्या पुरुषांइतके बिन पगाराचे काम करण्यात दुप्पट वेळ घालवतात,” असा अहवाल सुड्यूटशे झेटुंग देते.

“टीबी टाईम बॉम्ब”

अनेक औषधांना न जुमानणारे क्षयाचे (टीबी) नवीन प्रकार, भारतात प्रत्येक आठवड्याला १०,००० लोकांचे जीव घेत आहेत, असे वृत्त इंडियन एक्सप्रेस हे वृत्तपत्रक देते. जागतिक आरोग्य संघटनेच्या क्रेग क्लुट यांच्यानुसार, भारत “टीबी टाईम बॉम्बवर आहे.” जगभरात, १.७५ अरब लोक क्षयरोगाच्या जिवाणूने संसर्गित आहेत. नस्तर (इंग्रजी) या ब्रिटीश वैद्यकीय नियतकालिकाद्वारे संचालित केलेल्या सभेकरता ४० देशांतून एकत्र जमलेला तज्ज्ञांचा गट असे म्हणतो की, औषध कंपन्या, बाजारात नवीन औषधे आणण्याकरता पैसे गुंतवण्यास इच्छुक नाहीत कारण बहुतांश घटना गरीब विकसनशील देशांमध्ये आढळतात.

खूप मोठे, अतिशय दुर्गंधीचे फूल

जगातील सर्वात मोठे फूल खरोखरच विलक्षण सृष्टी आहे. त्याचे नाव रॅफलसिया असून ते अंदाजे बसच्या टायरइतक्या आकाराचे आहे व गर्भधारणेपासून जन्मापर्यंत मानवाला वाढण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ त्यास फुलण्यास लागतो. तसेच, केवळ आकारामुळे ते फूल पुष्पगुच्छासाठी योग्य नाही असे नाही. त्याची दुर्गंधी येते. माश्‍यांना आकर्षित करण्यासाठी परागण होण्याची जरूरी असते, रॅफलसियाचा वास सडणाऱ्‍या मांसासारखा आहे. गतकाळात, रॅफलसिया जेथे उगते त्या मलेशियातील आर्द्र जंगलांमध्ये राहणाऱ्‍या गावकऱ्‍यांनी त्यास सैतानाची वाटी असे संबोधले व नजरेस पडताच त्यास छाटून टाकले आहे. तथापि, दक्षिण चीन सकाळचे टपाल (इंग्रजी) याच्यानुसार, मलेशियातील किनाबालुच्या राष्ट्र उद्यानाने शास्त्रज्ञांना या दुर्मिळ फुलाचा पुढील अभ्यास करता यावा म्हणून त्याचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली आहेत. स्थानीय गावकरी आता, पर्यटकांना रॅफलसियाची छायाचित्रे घेण्याकरता त्यांना जंगलात मार्ग दाखवून जादा पैसा कमावत आहेत. यात शंका नाही, की अधिकांश जण सुज्ञतेचे अंतर ठेवतात.

वेदनेशिवाय झोपी जाणे

वैद्यकीय परवानगीशिवाय घेतलेल्या विशिष्ट वेदनाशामकांमुळे निद्रानाश होऊ शकतो, असा अहवाल टफ्ट्‌स विद्यापीठाचे आहार व पोषण पत्रक (इंग्रजी) देते. “त्याचे कारण हे आहे की, काही उत्कृष्ट प्रतीच्या वेदनाशामकांमध्ये कॉफीच्या एका कपएवढे अथवा त्यापेक्षाही अधिक कॅफेन असते.” कॅफेन—एक सौम्य उद्दीपक—बहुधा ॲस्प्रिन व इतर वेदनाशामकांमध्ये त्यांची उपयुक्‍तता वाढवण्यासाठी घातले जाते. खरे म्हणजे, काही प्रसिद्ध ब्रॅन्ड्‌सच्या दोन गोळ्यांच्या डोसमध्ये १३० मिलिग्रॅम इतके कॅफेन असू शकते. कॉफीच्या “सामान्य कपमध्ये असलेल्या ८५ मिलिग्रॅमपेक्षा हे जास्तच” आहे. यासाठी ते वृत्तपत्रक, “कार्यकारी पदार्थांच्या” वेदनाशामकाच्या लेबलमध्ये कॅफेन आहे का ते तपासण्याची शिफारस करते.

१९९५ मध्ये “आणखी एक लीप वर्ष”

असे दिसते की, पृथ्वीचे परिभ्रमण हे सर्वात विश्‍वसनीय समयलेखक नाही. द न्यूयॉर्क टाईम्स याच्यानुसार शास्त्रज्ञांकडे समय ठेवण्याची अधिक अचूक पद्धत आहे—सेसियम अणू. आण्विक घड्याळाचे केंद्रस्थान म्हणून त्याचा उपयोग होत असून, सेसियम अणू अचूकतेने प्रती सेकंदाला ९,१९,२६,३१,७७० वेळा कंपन पावतो. या प्रमाणात, आण्विक घड्याळात ३,७०,००० वर्षांमध्ये अंदाजे केवळ एका सेकंदाची चूक होते असे अभिमानाने सांगितले जाते. तुलना केल्यास, पृथ्वीचे परिभ्रमण सुमारे दहा लाख पटीने कमी अचूकतेचे आहे ज्यामुळे ठराविक वेळेला “आणखी एक लीप वर्ष” जोडावे लागते. समयलेखकांच्या आंतरराष्ट्रीय मंडळाने अशा ‘आणखी एका लीप वर्षाची’ भर १९९५ च्या शेवटास घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे “आपल्या ग्रहाचे परिभ्रमण आणि वेळेची प्रगती” एकाच वेळी घडवून आणणे शक्य झाले आहे. पण, या संशोधनाचे श्रेय शास्त्रज्ञ आपल्याकडे घेऊ शकत नाहीत. टाईम्स म्हणते की खरे पाहता, “घड्याळाच्या मूलकणांची हालचाल लहान प्रमाणात, ग्रह संस्थेच्या प्रचंड व्यवस्थेची नक्कल आहे.”

सूर्यप्रकाश मनोधैर्य वाढवतो

द वॉल स्ट्रीट जर्नल असे वृत्त देते की, एखाद्या इमारतीत अधिक नैसर्गिक प्रकाश येऊ दिल्यामुळे, “उत्पादकता वाढते” आणि “गैरहजेरीचे प्रमाण कमी होते.” कामाच्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहंचेल अशा तऱ्‍हेने केलेली इमारतीची रचना, ऊर्जेचा साठा करण्याचा मार्ग म्हणून सुरू केली असून, त्यामुळे मूलतः, कामगारांच्या मनोधैर्यात अधिक सुधारणा होण्याचा नफा मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहे. उदाहरणार्थ, लॉकहीड कॉर्पोरेशन या भल्या मोठ्या कंपनीने सनीवेल, कॅलिफोर्निया येथे नवीन कार्यालय बांधले तेव्हा, त्याच्या ऊर्जा-उपयुक्‍त रचनेमुळे “संपूर्ण ऊर्जेवरील निम्मा खर्च कमी झाला.” परंतु, लॉकहीडने अशी अपेक्षा केली नव्हती की, तिच्या कामगारांना त्यांचे नवीन परिसर इतके आवडेल की १५ टक्क्यांनी “गैरहजेरीत घट” होईल. इमारतीत अधिक सूर्यप्रकाश येऊ देण्याचे फायदे फुटकळ व्यापाऱ्‍यांच्या नजरेतूनही चुकलेले नाहीत. कृत्रिम प्रकाशाऐवजी नैसर्गिक प्रकाश असणाऱ्‍या दुकानांमधील विक्री “लक्षणीयरित्या अधिक” झाली असे एका विक्रेत्याला आढळले.

पाण्याबद्दल दक्ष असणारे जग

“पुढील शतकातील युद्धे पाण्यावरून होतील,” असा इशारा वर्ल्ड बँकेचे वातावरण उपाध्यक्ष इश्‍माएल सरागिल्दीन देतात. सरागिल्दीन यांच्या मते, ८० राष्ट्रांमध्ये आधीच आरोग्य व अर्थशास्त्रांना धोका संभावणारी पाण्याची टंचाई आहे. पण, पृथ्वीवर पुरेसे पाणी नसण्याची समस्या नाही. “गोड्या पाण्याचे एकूण प्रमाण मानवी जनसंख्येच्या सर्व कल्पनीय गरजांपेक्षा फार जास्त आहे,” असे हायड्रोलॉजीस्ट रॉबर्ट ऑम्ब्रोजी म्हणतात. बहुतांश संकटप्रसंग पाण्याच्या हलगर्जीपणाने केलेल्या व्यवस्थापनामुळे उद्‌भवतात. सिंचनात वापरण्यात येणारे निम्मे पाणी भूमीत जाते किंवा त्याचे बाष्पीभवन होते. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थांमधील ३० ते ५० टक्के व काहीवेळा त्याहूनही अधिक पाण्याची गळती होते. “पाणी हा हवेसारखा मोफत ठेवा नव्हे तर तेलाप्रमाणे मौल्यवान ठेवा समजून वापरले जावे अशी वेळ येत आहे,” असे अर्थशास्त्रज्ञ (इंग्रजी) म्हणते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा