ग्राह्य उपायांच्या शोधात
केवळ मोटारगाड्या प्रदूषण निर्माण करत नाहीत. खासगी घरे, औद्योगिक कारखाने व विद्युत केंद्रे देखील यासाठी जबाबदार आहेत. तरीही, विश्वव्यापी प्रदूषण निर्माण करण्यात मोटारगाड्यांचा भाग प्रचंड आहे.
खरे म्हणजे, ग्रह बचावण्याकरता ५००० दिवस असे म्हणण्याचे धाडस करते: “या सर्व नुकसानींचा—विशेषतः, आपले हवामान कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन करत आहे त्या नुकसानीचा—जाब विचारण्यात आला तर, कदाचित मोटारी कधीच बनवल्या जाणार नाहीत.” तथापि, ते मान्य करते: “पण ही अशी निवड आहे जिचा मोटार उत्पादक, रस्ता बांधकाम उद्योग, तसेच सरकारी अभिकरणे किंवा खासगी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात जीवन अवलंबून असलेली सामान्य जनता देखील विचार करण्यास तयार नाही.”
मनुष्याला चंद्रावर पाठवलेल्या तंत्रज्ञानास प्रदूषणमुक्त मोटार उत्पन्न करता यायला नको का? करणे हे बोलण्याइतके सोपे कधीच नसते, म्हणून प्रदूषणमुक्त मोटार तयार करण्यामधील अडथळ्यांवर मात करेपर्यंत इतर ग्राह्य उपाय मिळवण्याचा शोध चालू राहतो.
दूषकांमध्ये कपात करणे
१९६० च्या दशकात संयुक्त संस्थानांनी दूषकांच्या उत्सर्जनावर प्रतिबंध घालण्यासाठी मोटारगाड्यांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असणारा कायदा संमत केला. तेव्हापासून इतर देशांनी व सरकारांनी देखील तसेच केले आहे.
शिशाचा अंश नसलेले पेट्रोल लागणाऱ्या कॅटॅलिटीक कनव्हर्टरचा आता हानीकारक दूषके गाळण्यासाठी सर्वत्र वापर केला जात आहे. सन १९७६ व १९८० च्या दरम्यान मोटारचालक मोठ्या प्रमाणात शिशाचा अंश नसलेले पेट्रोल वापरू लागले तेव्हा, अमेरिकन लोकांच्या रक्तातील शिशाचे प्रमाण एक-तृतीयांशाने घटले. हे हिताचे ठरले, कारण अधिक शिसे असल्याने चेता संस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि शिकण्याची क्षमता खुंटू शकते. तथापि, हे दुःखाचे आहे की, विकसित जगातील अनेक देशांत शिशाच्या प्रमाणात घट झाली असली, तरी कमी विकसनशील देशांबद्दल असेच म्हटले जाऊ शकत नाही.
कॅटॅलिटीक कनव्हर्टर्सचे यश समाधानकारक आहे, पण त्यांचा उपयोग अद्यापही वादग्रस्त आहे. शिसे घालण्याचे बंद करण्यात आले तेव्हापासून कार्यक्षमता कमी झाल्याने पेट्रोलमधील हायड्रोकार्बन संमिश्रण बदलण्यात आले. यामुळे इतर कारसिनोजेन्सच्या उत्सर्जनांची वाढ झाली आहे ज्यांच्या उत्सर्जनाचे प्रमाण कॅटॅलिटीक कनव्हर्टर्स कमी करत नाहीत.
शिवाय, कॅटॅलिटीक कनव्हर्टर्ससाठी प्लॅटिनम उपयोगात आणावे लागते. ब्रिटनमधील इम्पीरियल कॉलेजचे प्राध्यापक, इयन थॉर्टन यांच्या मते, रस्त्यावरील धुळीमधील प्लॅटिनमचे प्रमाण वाढले आहे हा एक दुष्परिणाम ठरला आहे. “प्लॅटिनमचे द्रवणशील प्रकार अन्नसाखळीत प्रवेश करू शकतात” या शक्यतेचा इशारा त्यांनी दिला.
“उत्तर अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया व अनेक युरोपीय राष्ट्रांमध्ये कॅटॅलिटीक कनव्हर्टर्समुळे” कितीही यश मिळाले असले तरीही ग्रह बचावण्याकरता ५००० दिवस वास्तविकपणे असे कबूल करते, “जगभरातील मोटारींच्या संख्येत झालेल्या प्रचंड वाढीने वायूच्या गुणवत्तेत वाढ करण्यास फायदेकारक ठरणाऱ्या घटकांना पूर्णपणे रद्द केले आहे.”
गती कमी करणे
मोटारींच्या उत्सर्जनांमध्ये कपात करण्याची दुसरी पद्धत म्हणजे वाहन हळू चालवणे. पण, संयुक्त संस्थानांमध्ये काही राज्यांनी अलीकडेच वेगमर्यादा वाढवली आहे. जर्मनीत, प्रतिबंध घालणे अप्रिय गोष्ट आहे. ताशी १५० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने दीर्घपल्ल्यापर्यंत उचित गतीने सहजगत्या प्रवास करता येईल अशा शक्तिशाली मोटारी बनवण्याची क्षमता असणाऱ्या जोरावर विक्री करणारे मोटार उत्पादक त्याचप्रमाणे पुष्कळ चालक देखील स्वभावतः याच्या विरोधात आहेत. तथापि, असे दिसते की, अधिकाधिक जर्मन लोक आता गती प्रतिबंधकांचा स्वीकार केवळ वातावरणीय कारणांसाठी नव्हे, तर सुरक्षिततेसाठी देखील करण्यास तयार आहेत.
काही राष्ट्रांमध्ये, प्रदूषण अयोग्य थरांना पोहंचते तेव्हा चालकांकडून वाहन हळू चालवण्याची—किंवा कदाचित पूर्णतः न चालवण्याचीच अपेक्षा केली जाते. सन १९९५ च्या मतनोंदणीत असे प्रकट झाले, की ओझोनची पातळी अतिशय जास्त वाढली तर ८० टक्के जर्मन लोक वेगमर्यादांचे लागूकरण करण्यास तयार होतील. अथेन्स व रोम या शहरांसह जगभरातील अनेक शहरांनी, विशिष्ट परिस्थितीत वाहन चालवण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी आधीच पावले उचलली आहेत. इतर तेच करण्याचा विचार करत आहेत.
सायकली वापरणे
वाहतूक कमी करण्यासाठी, काही शहरांनी बस प्रवासाच्या खास दरांत कपात केली आहे. इतर शहरांमध्ये, जे चालक आपल्या मोटारी उपलब्ध जागेत उभ्या करण्यासाठी अल्प शुल्क देतात त्यांना बसचा प्रवास मोफत असतो. इतर शहरांनी बस व टॅक्सीसारख्या वाहतुकीत वाढ करण्याकरता त्यांच्यासाठी खास मार्ग राबवले आहेत.
या समस्येवर मात करण्याचा नवा मार्ग अलीकडेच युरोपीय (इंग्रजी) यामध्ये निदर्शनास आला: “१९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात नेदरलंडमध्ये झालेल्या मोहिमेने प्रेरित होऊन, युक्तिवादी डेन्सने चारचाकी वाहनांऐवजी दुचाकींचा वापर करण्याचा लोकांना आग्रह करून हवेतील प्रदूषण व वाहतुकीची कोंडी कमी करण्याची एक योजना केली आहे.” सबंध कोपनहॅगनच्या मार्गांवर विविध ठिकाणी सायकली ठेवण्यात आल्या आहेत. एका यंत्रात नाणे टाकल्यावर एक सायकल वापरायला मिळते. सायकल सोयीस्कर ठिकाणी पुन्हा नेऊन ठेवल्यावर इसार म्हणून दिलेले पैसे पुन्हा मिळवता येतात. ही योजना व्यावहारिक ठरेल का व ती टिकून राहील का हे वेळच सांगेल.
मोटारीऐवजी सायकलींचा उपयोग करण्याचे उत्तेजन देण्याकरता, काही जर्मन शहरे एक-मार्गी रस्त्यांवरून विरुद्ध दिशेने सायकल चालवण्यास अनुमती देतात! शहरातील सुमारे एक-तृतीयांश प्रवास व ग्रामीण भागातील एक-तृतीयांशापेक्षा अधिक प्रवास तीन किलोमीटरपेक्षा कमी अंतराचा असल्यामुळे, अनेक नागरिक पुष्कळसा प्रवास पायी किंवा सायकलीने सहजगत्या करू शकतात. यामुळे प्रदूषणाला अटकाव घालण्यास मदत होईल; त्याच वेळी, चालकांना आवश्यक तो व्यायाम देखील मिळेल.
पुनर्रचना करणे
प्रदूषण-मुक्त मोटारी बनवण्याचे कार्य चालू आहे. बॅटरींवर चालणाऱ्या विद्युत मोटारी उत्पन्न करण्यात आल्या आहेत, पण त्यांची गती व कार्य करण्याचा अवधी मर्यादित आहे. हेच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारींच्या बाबतीतही खरे आहे.
इंधन म्हणून हायड्रोजनचा उपयोग करण्याच्या शक्यतेचा शोध लावला जात आहे. हायड्रोजन बहुतेक दूषकांचे उत्सर्जन न करताच जळते परंतु, त्याची किंमत जबर आहे.
मोटारीचा पुनर्शोध लावण्याची गरज ओळखून, अमेरिकेचे राष्ट्रपती क्लिंटन यांनी १९९३ मध्ये अशी घोषणा केली की, सरकार व अमेरिकेचा मोटार उद्योग भविष्यातील मोटारीची निर्मिती करण्यात सहकार्य देईल. त्यांनी असे म्हटले: “आपल्या राष्ट्राने प्रयत्न केलेले तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाकांक्षी साहस करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.” त्यांनी ज्याविषयी सांगितले ते, “२१ व्या शतकासाठी पूर्णतः कार्यक्षम व परिस्थितीकीच्या अनुकूल असलेले वाहन निर्माण करणे” शक्य असेल किंवा नसेल हे अद्याप पाहायचे आहे. योजनेनुसार, एका दशकाच्या आत एक नमुना तयार करायचा आहे—परंतु त्याची किंमत प्रचंड असेल.
काही मोटारींचे उत्पादक अशा नमुन्यांवर कार्य करत आहेत जे पेट्रोल व वीजेच्या संयोगावर चालतात. जर्मनीत—भल्या मोठ्या किंमतीत—उपलब्ध असलेली एक विद्युत स्पोर्टस् मोटार आहे जी नऊ सेकंदांमध्ये गतिमान होऊन उभ्या असलेल्या जागेपासून ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने जाते व १८० चा उच्च वेग गाठू शकते. पण, २०० किलोमीटरनंतर, ती थांबते व त्यानंतर तीन तासांपर्यंत तिच्या बॅटरीझ पुन्हा जागृत होईपर्यंत ती चालत नाही. यावरील संशोधन चालू आहे व पुढील प्रगतीची अपेक्षा केली जात आहे.
केवळ समस्येचा एक भाग
विषारी उत्सर्जनांपासून सुटका कशी मिळवावी हा केवळ समस्येचा एक भाग आहे. मोटारीमुळे ध्वनी प्रदूषण देखील होते, याचा गजबजलेल्या रस्त्याच्या जवळ राहणाऱ्या कोणालाही चांगलाच अनुभव असेल. नित्य वाहतुकीच्या आवाजामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो त्यामुळे, हा देखील समस्येचा प्राथमिक भाग असून तो सोडवला पाहिजे.
पुष्कळ खेड्यांचे नैसर्गिक सौंदर्य कित्येक मैलांपर्यंत असलेल्या कुरूप महामार्गांमुळे तसेच बेढब व्यापाराची ठिकाणे व त्यांच्या कडेने असलेल्या जाहिरात फलकांमुळे खराब होते हे देखील निसर्गाचे चाहते प्रत्ययास आणून देतील. पण मोटारींच्या संख्येत वाढ होते त्याचप्रमाणे रस्त्यांची गरज देखील वाढते.
काही मोटारी, त्यांच्या मालकांची सेवा करताना अनेक वर्षे प्रदूषण करून “नाश पावल्यावरही” प्रदूषणाचे प्रकार चालूच ठेवतात. लोकांनी टाकून दिलेल्या मोटारी ज्या खराब दिसतात त्यांची इतकी मोठी समस्या बनली आहे की, खेड्याजवळ त्यांची अनुचितपणे गर्दी होऊ नये म्हणून काही ठिकाणी कायदा काढावा लागला आहे. आदर्श मोटारगाडी, सहज पुन्हा प्रक्रिया करता येणाऱ्या मालाने तयार केलेली गाडी कधी निर्माण केली जाईल का? असे वाहन निर्माण करण्यात येण्याचे काही चिन्ह दिसत नाही.
“अनेक जर्मन लोक वातावरणाविषयी अतिशय चिंताग्रस्त आहेत” अशी एका अलीकडील वृत्तपत्रात टिपणी करण्यात आली आहे व पुढे असे म्हणण्यात आले आहे, “परंतु फारच कमी त्यानुसार वागतात.” एका सरकारी अधिकाऱ्याचा असा उल्लेख आहे: “स्वतः अपराधी असल्याचा कोणीच विचार करत नाही, तसेच जबाबदार ठरण्यासही कोणी इच्छुक नाही.” होय, “स्वार्थी” आणि “शांतताद्वेषी” माणसे असणाऱ्या दुनियेत समस्या सोडवणे कठीणच आहे.—२ तीमथ्य ३:१-३.
तरीही, ग्राह्य उपायांचा शोध चालूच आहे. प्रदूषण आणि मोटारगाडीवर उत्कृष्ट उपाय कधी सापडेल का?
[७ पानांवरील चित्र]
सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग केल्याने, इतरांसोबत मोटारीची सहभागिता केल्याने किंवा सायकल वापरल्याने प्रदूषण कमी होईल का?