वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ७/८ पृ. ३-५
  • वाहने नसलेले जग?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाहने नसलेले जग?
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जागतिक कोंडी
  • प्रदूषणाचा धोका
  • ग्राह्‍य उपायांच्या शोधात
    सावध राहा!—१९९६
  • विनाशकारी हवामान
    सावध राहा!—१९९८
  • आदर्श उपाय शोधणे
    सावध राहा!—१९९६
  • उच्च राहणीमानाच्या शोधात
    सावध राहा!—२०००
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९६
g96 ७/८ पृ. ३-५

वाहने नसलेले जग?

मोटार गाड्या नसलेल्या जगाची कल्पना तुम्ही करू शकता का? किंवा त्यांच्यासारखा गत शतकात लोकांच्या जीवनशैलीत अथवा वागणुकीत ज्यामुळे मूलभूतपणे बदल झाला आहे अशा एखाद्या नवीन शोधाविषयी तुम्ही सांगू शकता का? मोटारगाड्यांविना मोटेल, ड्राईव्ह-इन रेस्टॉरंट आणि ड्राईव्ह-इन थिएटर अस्तित्वात नसते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे बस, टॅक्सी, कार किंवा ट्रकशिवाय तुम्ही कामाला किंवा शाळेला कसे गेला असता? शेतकऱ्‍यांनी व उत्पादकांनी त्यांचा माल बाजारात कसा वाहिला असता?

“प्रत्येक सहांपैकी एक अमेरिकी व्यापार, मोटारगाड्यांचे उत्पादन, वितरण, सर्व्हिसिंग किंवा उपयोग यांवर अवलंबून आहे,” असे निरीक्षण द न्यू एन्सायक्लोपिडीया ब्रिटॅनिका करते, व पुढे म्हणते: “मोटारगाड्यांच्या कंपन्यांची विक्री व पावत्या, त्या देशातील एक-पंचमांशापेक्षा अधिक घाऊक व्यापारी उलाढालीचे व एक-चतुर्थांशापेक्षा अधिक फुटकळ व्यापाराचे प्रतिनिधीत्व करतात. इतर देशांच्या दृष्टीमध्ये हे प्रमाण काहीसे कमी आहे, परंतु जपान व पश्‍चिमी युरोपातील देश वेगाने अमेरिकेची पातळी गाठत आहेत.”

तथापि, मोटारगाड्यांरहित जग, उत्तम ठिकाण असेल असे काहींचे मत आहे. ते दोन कारणांमुळे असे म्हणतात.

जागतिक कोंडी

मोटारी उपयोगी असल्या, तरी वाहनतळ शोधण्याकरता तुम्ही खूप वेळापासून फेऱ्‍या मारत असल्यास, गजबजलेल्या ठिकाणी पुष्कळ मोटारी असणे उपयोगाचे नाही असे तुम्हाला कोणी सांगण्याची गरज नाही. किंवा तुम्ही कधी वाहतुकीच्या भयंकर कोंडीत सापडला असल्यास, गतिमान असण्याकरता बनवलेले परंतु जबरदस्तीने थांबवण्यात आलेल्या वाहनामध्ये कोंडून राहणे किती चीड आणणारे आहे याची तुम्हाला जाणीव असेलच.

सन १९५० मध्ये, एकट्या संयुक्‍त संस्थानांत प्रत्येक ४ व्यक्‍तींमागे १ मोटार होती. सन १९७४ पर्यंत, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, इटली, नेदरलंड आणि स्वीडन यांनी देखील ती पातळी गाठली होती. परंतु, तोपर्यंत अमेरिकेची आकडेवारी, जवळजवळ प्रत्येक २ व्यक्‍तींमागे १ मोटार इतकी वाढली होती. आता जर्मनी व लक्झेम्बर्ग येथे जवळजवळ, प्रत्येक २ रहिवाश्‍यांमागे १ मोटार गाडी आहे. बेल्जियम, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, इटली व नेदरलंड हे फार मागे नाहीत.

बहुतांश मोठी शहरे—ती जगामध्ये कोठेही असली तरी—भव्य वाहनतळांसारखीच दिसत आहेत. उदाहरणार्थ, स्वातंत्र्याच्या वेळी म्हणजेच १९४७ मध्ये भारताची राजधानी नवी दिल्ली येथे ११,००० इतक्या मोटारी व ट्रक होते. सन १९९३ या सालापर्यंत, ही संख्या २२,००,००० पेक्षा अधिक वाढली! प्रचंड मोठी वाढ—परंतु, टाईम नियतकालिकानुसार “ही संख्या या शतकाच्या अंतापर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा केली जात आहे.”

दरम्यान, पश्‍चिम युरोपप्रमाणे पूर्व युरोपमध्ये दरडोई केवळ एक-चतुर्थांश मोटारी असताना सुमारे ४० कोटी संभाव्य गिऱ्‍हाईक आहेत. काही वर्षांतच, आतापर्यंत ४० कोटी सायकली असलेल्या चीनची परिस्थिती बदलली असेल. सन १९९४ च्या अहवालानुसार, “मोटार उत्पादनामध्ये जलद वाढ करण्यासाठी सरकार योजना आखत आहे,” दर वर्षी होणारे १३ लाख मोटारींचे उत्पादन या शतकाच्या शेवटापर्यंत ३० लाख इतके होणार आहे.

प्रदूषणाचा धोका

“ब्रिटनमध्ये शुद्ध हवा राहिली नाही,” असे ऑक्टोबर २८, १९९४ चे दैनिक तार (इंग्रजी) या वृत्तपत्राने म्हटले. ही कदाचित अतिशयोक्‍ती असली, तरीही चिंता वाटण्याइतकी खरी आहे. ईस्ट एँग्लीया विद्यापीठाचे प्राध्यापक स्टुअर्ट पेनकेट यांनी असा इशारा दिला: “मोटार गाड्यांमुळे, आपल्या भोवतालच्या सबंध वातावरणाचे रसासनशास्त्रच बदलत आहे.”

ग्रह बचावण्याकरता ५००० दिवस (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते, कार्बन मोनोक्साईड प्रदूषणाची अधिक संहती, “शरीराला ऑक्सिजन पुरवत नाही, आकलन व विचारशक्‍तीला दुर्बल करते, परावर्तनक्रियेची गती कमी करते व गुंगी आणविते.” तसेच जागतिक आरोग्य संघटना म्हणते, “युरोप व उत्तर अमेरिकेतील निम्म्यापेक्षा अधिक शहरवासी कार्बन मोनोक्साईडचे अति जास्त प्रमाण असलेल्या वातावरणात राहतात.”

काही ठिकाणी, मोटारींच्या उत्सर्जनांमुळे दर वर्षी पुष्कळ लोक दगावतात—याशिवाय कोट्यवधी डॉलरचे वातावरणीय नुकसान होते, असा अंदाज केला जातो. जुलै १९९५ मध्ये एका दूरचित्रवाणीवरील वृत्तात सांगण्यात आले, की दर वर्षी सुमारे ११,००० ब्रिटनवासीय मोटारीने निर्माण केलेल्या हवेच्या प्रदूषणामुळे दगावतात.

सन १९९५ मध्ये, बर्लिन येथे संयुक्‍त राष्ट्र हवामान परिषद भरवण्यात आली होती. कोणतीतरी पावले उचलण्याची गरज आहे असे ११६ राष्ट्रांतील प्रतिनिधींनी मान्य केले. परंतु, विशिष्ट ध्येये ठेवणे व काही नियम प्रस्थापित करणे किंवा तंतोतंत कार्यक्रम योजण्याचे काम लांबवण्यात आल्यामुळे अनेकांची निराशा झाली.

ग्रह बचावण्याकरता ५००० दिवस या पुस्तकाने मागे १९९० मध्ये जे म्हटले ते लक्षात घेता, प्रगतीमधील ही कमतरता कदाचित अपेक्षित होती. त्यामध्ये दाखवून दिले होते की, “वातावरणीय नाशावर मात करण्याची पावले अर्थशास्त्राच्या कार्यहालचालींच्या आड आली नाहीत तरच स्वीकारणीय आहेत हे आधुनिक औद्योगिक समाजातील राजकीय व आर्थिक सत्तेचा प्रकार ठरवतो.”

यास्तव, टाईमने अलीकडेच “वातावरणात कार्बन डायऑक्साईड व इतर हरितगृह वायूंची वाढ झाल्यामुळे कालांतराने पृथ्वीचे तापमान वाढण्याच्या शक्यतेबद्दल इशारा दिला. अनेक शास्त्रज्ञांच्या मते याचा परिणाम म्हणून, अनावृष्टी, वितळणारी बर्फाच्छादने, वाढणारी समुद्राची पातळी, किनारपट्टीवरील पूर, अधिक जोरदार वादळे व हवामानातील इतर विपत्त्या घडतील.”

प्रदूषण समस्येची गंभीरता, काहीतरी करावे याची मागणी करते. पण काय?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा