वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ७/८ पृ. ८-९
  • आदर्श उपाय शोधणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आदर्श उपाय शोधणे
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ती संतुलन
  • ग्राह्‍य उपायांच्या शोधात
    सावध राहा!—१९९६
  • हवा
    सावध राहा!—२०२३
सावध राहा!—१९९६
g96 ७/८ पृ. ८-९

आदर्श उपाय शोधणे

देवाचे वचन, बायबल अशा एका समयाविषयी सांगते ज्यावेळी देवाच्या स्वर्गीय सरकारने मानवजातीच्या सर्व समस्यांचे निरसन केलेले असेल; ज्यामध्ये वाहनांद्वारे होणाऱ्‍या प्रदूषणाची सद्य समस्या देखील समाविष्ट आहे. ज्याकरता पुष्कळांना प्रार्थना करावयास शिकवले आहे ते मशीही राज्य, पूर्णतः प्रदूषण-मुक्‍त वाहन उत्पन्‍न करून आदर्श उपाय पुरवील का? किंवा पृथ्वीवरील सर्व मोटारगाड्या संपुष्टात आणून आदर्श उपाय साध्य केला जाईल का? बायबल आपल्याला याचे कोणतेही निश्‍चित उत्तर देत नसल्यामुळे, आपण केवळ थांबून राहण्याशिवाय काहीही करू शकत नाही.—मत्तय ६:९, १०.

परंतु, देवाच्या राज्याकरवी पुनर्स्थापित होणाऱ्‍या परादीसमध्ये देवाचे सरकार, प्रदूषणाला, निर्मितीचे सौंदर्य खराब करण्यास अनुमती देणार नाही याविषयी आपण खात्रीशीर असू शकतो.—यशया ३५:१, २, ७; ६५:१७-२५.

देवाच्या वचनानुरूप चालणाऱ्‍यांना आधीच प्रदूषण-मुक्‍त नवीन जगातील जीवनाकरता प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे, त्यांना आज मोटारगाड्यांच्या उपयोगाविषयी कसे वाटले पाहिजे? जून २२, १९८७ च्या सावध राहा! (इंग्रजी) या नियतकालिकात “आपल्या जंगलांना काय होत आहे?,” हा विषय हाताळण्यात आला होता. वाहनाच्या धूरातील वायू दूषके आणि संपुष्टात येणारी जंगले यांमध्ये संबंध आहे असे काही शास्त्रज्ञांना वाटते असा अहवाल त्यात दिला होता. यामुळे एका चिंताग्रस्त वाचकाने वॉचटावर संस्थेला लिहिले व ही वस्तुस्थिती लक्षात घेता ख्रिश्‍चनांनी मोटार चालवणे योग्य आहे का अशी विचारणा केली. असे केल्याने, यहोवाच्या सृष्टीबद्दल अनादर तर दाखवला जाणार नाही ना, असा त्याचा विचार होता.

त्याच्या पत्राचे उत्तर, काही अंशी पुढीलप्रमाणे देण्यात आले: “यहोवाचे साक्षीदार, सरकारी अधिकाऱ्‍यांनी प्रदूषणावर अटकाव करण्यास अधिनियमित केलेल्या वातावरणीय नियमांचे विश्‍वासूपणे पालन करतात. (रोमकर १३:१, ७; तीत ३:१) सरकाराकडून अपेक्षित आहेत त्यापेक्षा अधिक पावले उचलणे हे त्या व्यक्‍तीवर सोपवून दिले जाते. एखाद्याने येथूनपुढे मोटार न चालवण्याचा निर्णय घेतल्यास, ती त्याची खासगी बाब असेल. तथापि, काही लोकांना कसे वाटते हे सावध राहा! (इंग्रजी) लेखाने दाखवले व पृष्ठ ८ वर असे म्हटले: ‘अनेकजण हवा प्रदूषण कमी करण्यासाठी वाजवीपणे शक्य असेल तितकी व्यावहारिक पावले उचलत आहेत. ते वाहने हळू चालवतात, कमी प्रवास करतात, इतरांसोबत मोटारींची सहभागिता करण्याच्या व्यवस्थांमध्ये भरती करतात, शिसे नसलेले पेट्रोल वापरतात व सरकारने दिलेले प्रदूषण विरोधक कायदे पाळतात.’”

ख्रिस्ती संतुलन

या उत्तराने ख्रिस्ती संतुलन प्रकट केले. केवळ वाहनांमुळेच प्रदूषण होत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. विमाने व रेल्वे—खरे पाहता, वाहतुकीच्या सर्व आधुनिक माध्यमांमुळे—प्रदूषण होते. परंतु वाहतुकीचे हे प्रकार, प्रदूषण निर्माण करण्याच्या मूळ उद्देशाने बनवण्यात आले नव्हते. परिणामी प्रदूषण हा दुष्परिणाम आहे हे दुःखाचे आहे पण ते मर्यादित ज्ञान व अपरिपूर्ण मनोवृत्तींमुळे घडते.

जानेवारी १, १९९३ च्या टेहळणी बुरूज नियतकालिकाने, पृष्ठ ३१ वर या बाबीची चर्चा करून म्हटले: “यहोवाचे साक्षीदार या नात्याने आम्ही, आपल्या पार्थिव गृहावर आता परिणाम करणाऱ्‍या परिस्थितीकीच्या अनेक समस्यांबद्दल अतिशय चिंताग्रस्त आहोत. पृथ्वी ही परिपूर्ण मानवी कुटुंबाकरता एक शुद्ध, आरोग्यदायी घर म्हणून तयार करण्यात आली होती याची कदर बहुतांश लोकांपेक्षा आम्ही अधिक बाळगतो. (उत्पत्ति १:३१; २:१५-१७; यशया ४५:१८) . . . यास्तव, पृथ्वीचा नाश करण्याच्या मानवाच्या नित्य कार्यात अनावश्‍यकपणे भर घालण्याचे टाळण्यास संतुलित, वाजवी प्रयत्न करणे उचित आहे. तथापि, ‘वाजवी’ हा शब्द लक्षात घ्या. . . . देवाच्या लोकांनी परिस्थितीकीच्या बाबींबद्दल अजाण असू नये. यहोवाने त्याच्या प्राचीन लोकांकडून त्यांनी मल-विसर्जन करण्यासाठी पावले उचलावी अशी अपेक्षा केली होती, याचे परिस्थितीकीच्या त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्व होते. (अनुवाद २३:९-१४) तसेच पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांविषयी त्याचा काय दृष्टिकोन आहे हे आपल्याला ठाऊक असल्यामुळे, वातावरण स्वच्छ ठेवण्याकरता होता होईल तितके करण्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. . . . परंतु, या बाबतीत एखादा ख्रिस्ती कितपत प्रयत्न करील ही व्यक्‍तिगत बाब आहे, अर्थात कायदा तशी अपेक्षा करत असल्यास तो वेगळा प्रश्‍न आहे. . . . अपरिपूर्ण मानव सहजगत्या फाजील होण्याच्या पाशात सापडतात. . . . पृथ्वीवरून परिस्थितीकीच्या मोठ्या समस्या तसेच प्रदूषण काढून टाकण्याचे मानवी प्रयत्न पूर्णतः यशस्वी ठरणार नाहीत. निरनिराळ्या ठिकाणी थोडीबहुत प्रगती होत असेल, पण शेवटच्या एकमेव उपायासाठी देवाच्या हस्तक्षेपाची गरज आहे. या कारणास्तव, वरकरणी लक्षणे सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण ईश्‍वरी उपायावर आपले परिश्रम व साधनसंपत्ती केंद्रित करतो.”

ख्रिस्तीजन, जगभरात देव राज्याच्या संदेशाचा प्रचार करण्याची ईश्‍वरी कामगिरी त्यांना मिळाल्याचे लक्षात ठेवून बायबलची तत्त्वे पाळताना संतुलित असतात. (मत्तय २४:१४) याहून कोणतीही गोष्ट अधिक महत्त्वाची किंवा निकडीची नाही! वाहतुकीचे व दळणवळणाचे आधुनिक माध्यम ख्रिश्‍चनांना हे कर्तव्य पार पाडण्यास मदत करू शकत असल्यास, त्यांनी याचा उपयोग करावा याकरता त्यांच्याकडे रास्त कारण आहे. त्याचवेळी, ते अनुचितपणे किंवा मुद्दाम प्रदूषण करण्याचे टाळतात. अशाप्रकारे, ते मानवासमोर तसेच देवासमोर चांगला विवेक बाळगतात.

यास्तव, प्रदूषणाच्या व वाहनांच्या समस्येचे निरसन शेवटी कसे केले जाईल याची आपल्याला आज थोडीही कल्पना नसली तरी पण तिचे निरसन होईल हे आपल्याला ठाऊक आहे. खरे म्हणजे, आदर्श उपाय तर अगदी हाताशीच उभा आहे.

[९ पानांवरील चौकट]

प्रदूषणावर मात करणे

• शक्य असेल तेव्हा चालणे किंवा सायकलीने प्रवास करणे

• इतरांसोबत मोटारींची सहभागिता करण्यामध्ये भाग घेणे

• मोटार वाहनांची नियमितपणे सर्व्हिसिंग करणे

• शुद्ध-इंधनाबद्दल जाणीवपूर्वक असणे

• अनावश्‍यक प्रवास टाळणे

• साधारण पण एकसारख्या गतीने वाहन चालवणे

• शक्य व सुसाध्य असेल तेव्हा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे

• अगदी थोड्यावेळासाठी देखील वाटेत गाडी थांबवताना इंजिन चालू ठेवण्याऐवजी ते बंद करणे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा