त्या उपद्रवी माश्या तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त उपयोगी?
आपल्यातील बहुतेक जण, माश्या एकतर उपद्रवी किंवा समाजासाठी पूर्णपणे धोका असल्याचे समजत असतात. पण माश्या त्रासदायक असल्या तरी, आपण विचार करू शकतो त्यापेक्षा जास्त त्या उपयोगी आहेत, असे जीवनशास्त्रवेत्त्यांना संशोधनाद्वारे समजत आहे.
माश्यांच्या अनेक जाती, दिवसातील बहुतेक वेळ फुलांना व फास्ट फूड स्थानकांना भेट देत असतात जे त्यांच्या किटक ग्राहकांना मधुरस व परागकण या दोन्ही गोष्टी देतात. काही माश्या ज्या परागकणामधून पोषक पदार्थांचा अर्क काढू शकतात, त्या आपली अंडी तयार करण्यासाठी या अति उर्जा देणाऱ्या अन्नावर अवलंबून असतात, जी नक्कीच एक क्षुल्लक कामगिरी नाही.
एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असता या माश्या, त्यांच्या शरीराला चिकटणारे चिकट परागकण अपरिहार्यपणे उचलत असतात. जीवनशास्त्रवेत्त्यांनी परीक्षण केल्याप्रमाणे एका माशीच्या शरीरावर १,२०० परागकण होते! माश्यांच्या परागसिंचन करण्याच्या ह्या कार्यावर आणखी संशोधन केल्याने, काही फुले त्यांच्या उत्तरजिवित्वासाठी त्यांच्यावर अवलंबून असल्याचे शास्त्रज्ञांना समजले आहे.
नैसर्गिक इतिहास (इंग्रजी) हे नियतकालिक, उत्तर अमेरिकेतील कोलोरॅडो येथे केलेल्या प्रयोगांच्या मालिकेचे वर्णन करते. माश्यांसारख्या असणाऱ्या सामान्य मसकॉइड माश्यांची त्वरित ओळख पटण्यासाठी त्यांच्यावर भडक रंग शिंपडण्यात आले होते. त्यांच्या दैनिक कार्यहालचालींचे परीक्षण केल्यानंतर, काही रानटी फुलांकरता ह्या माश्या, मधमाश्यांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण परागसिंचन आणि त्यांपेक्षा अधिक भ्रमण करणाऱ्या आहेत असे समजल्यावर संशोधकांना आश्चर्य वाटले.
माश्यांची कामगिरी किती महत्त्वपूर्ण आहे? किटकांनी फुलांपाशी जाऊ नये यासाठी ती फुले जाळीने आच्छादिलेली होती. माश्यांद्वारे ज्यांचे परागसिंचन केले होते त्या जवळच्या फलद्रूप फुलांच्या अगदी भिन्नतेत या फुलांनी कोणतेही बीज उत्पन्न केले नव्हते. जरी काही रानटी अंबाडी वनस्पती किंवा रानटी फुलझाडासारख्या काही जातींवर मधमाश्यांनी परागसिंचन केले होते तरी समुद्रसपाटीपासून काही उंचीवर माश्यांनी आपले ९० टक्क्यांपेक्षा अधिक कार्य पूर्ण केले होते.
संशोधकांपैकी कॅरल केअरनझ आणि डेविड ईनॉयूए या दोघांनी काय निष्कर्ष काढला? “कोलोरॅडो रॉकीसमधील अनेक रानटी फुलांकरता ह्या माश्या, मधमाश्यांना, फुलपाखरांना आणि हमिंगबर्ड म्हटलेल्या पक्षांना मागे टाकतात . . . अनेक लोकांना ज्यांची थोडीफार किळस वाटते अशा किटकांशिवाय, डोंगराळ भागातल्या कुरणातील भेट आनंददायी करणारी अनेक रानटी फुले, परागसिंचनामार्फत बिजेची वाढ करण्यात अपयशी ठरतील.” तर मग, माश्या नक्कीच उपयोगी आहेत यात काहीच संशय नाही!