“ती किती उत्कृष्ट ठरली आहेत!”
“मी नेहमीच टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके वाचण्याचा आनंद घेतला आहे, परंतु अलीकडील वर्षांत ती इतकी उत्कृष्ट आहेत, की त्यांचे वर्णन करण्यासाठी विशेषण शोधणे कठीण आहे. सावध राहा! नियतकालिकाच्या ऑक्टोबर २२ आणि नोव्हेंबर ८, १९९४ च्या अंकांत, “जेव्हा धर्म युद्धात सहभागी होतो तेव्हा” आणि “सारायेवो—१९१४ ते १९९४ पर्यंत,” या शीर्षकाखाली जी माहिती देण्यात आली होती त्याबद्दल मला गुणग्राहकता व्यक्त करावी असे वाटत होते. बोस्निया-सर्बिया-क्रोएशियाचे मुलकी युद्ध, एक बिकट आणि भयंकर परिस्थिती असली तरी क्रोएशियाचा रहिवासी असल्यामुळे त्या परिस्थितीबद्दल मला गाढ भावना आहेत. तुम्ही ज्याप्रकारे त्या संघर्षाच्या इतिहासाचा आणि १०५४ या वर्षापासूनच्या त्याच्या मूळ उगमांचा शोध केला, याविषयी मला विशेषतः रसिकता वाटली. या लेखाने, ह्या राष्ट्रीय गटांत अधिक विभाजन व द्वेष उत्पन्न करण्यात, धर्माच्या भूमिकेवर आणि धर्माच्या कठोर प्रयत्नांवर प्रकाश पाडला आहे. दुर्दैवाने, स्वाभाविकपणे चांगले असणाऱ्या या लोकांत, आज जगाला फक्त वाईटच दिसत आहे. एक अनाकलनीय परिस्थिती समजण्याजोगी केल्याबद्दल तुमची आभारी आहे. [स्वाक्षरित] एम. के.”
काळजीपूर्वक संशोधन करण्यात व सत्य अहवाल देण्यात सावध राहा! नियतकालिकाने नावलौकिक मिळविला आहे. परंतु, पृथ्वीला देवाच्या राज्य आधिपत्याखाली आणण्याच्या त्याच्या अभिवचनावर आधारित, हे नियतकालिक एका शांतिमय भवितव्याची आशा देणारे देखील आहे.
तुम्हाला हे नियतकालिक नियमितपणे वाचायचे असल्यास, कृपया तुमच्या क्षेत्रातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा किंवा या अंकातील पृष्ठ ५ वर दिलेल्या उचित पत्त्यावर लिहा.
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Right: Culver Pictures