वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ४/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९६
सावध राहा!—१९९६
g96 ४/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

झोप “तुमच्या शरीराला झोपेची गरज का आहे.” (जून ८, १९९५) या लेखाबद्दल मी तुमची आभारी आहे. त्याने जणू माझे डोळेच उघडले, असे मी म्हणायला हवे. एक वैद्यकीय विद्यार्थी या नात्याने मी माझ्या झोपेचे बहुमूल्य तास माझा अभ्यास पूर्ण करण्यात घालवत असते. त्या लेखात उल्लेखिलेल्या काही परिणामांचा मी अनुभव घेतला आहे. झोपेच्या चांगल्या सवयी विकसित करण्याचा मी प्रयत्न करीन.

एल. एच., त्रिनिदाद

आजीआजोबा “तुम्ही आजीआजोबांना महत्त्व देता का?” (सावध राहा! जुलै-सप्टेंबर, १९९५) ही मालिका वाचल्यानंतर माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. माझ्या सासूसासऱ्‍यांबरोबर माझे पटत नसल्यामुळे मी त्रास सहन करत होते, त्यामुळे तुमचा लेख अगदी योग्यच वेळी आला. ते ज्यास पात्र होते त्या योग्य आदराने मी त्यांच्याशी व्यवहार करत नव्हते याची जाणीव त्या लेखाने मला करून दिली. मी आवश्‍यक ते बदल करण्याची सुरवात केली व आता आम्ही सगळे आनंदी आहोत.

ए. टी., कॅनडा

ज्यावेळी आम्हाला माझ्या वडिलांना शुश्रूषा गृहात ठेवावे लागले तेव्हा आठवड्यातून तीन वेळा त्यांना भेट देण्याचे आम्ही ठरवले होते. आज दोन वर्ष झाले तरी आम्ही त्या वचनाशी जडून आहोत. कुटुंबाबद्दलची रोजची क्षुल्लक माहिती त्यांच्याकरता किती महत्त्वाची आहे! ह्‍या नित्यक्रमाशी जडून राहण्यासाठी एका खंबीर निर्धाराची आवश्‍यकता असली तरी नातवंडे आणि आजीआजोबा या दोघांनाही त्यापासून फायदा होतो.

पी. एल., अमेरिका

ते लेख पंथ किंवा धर्म यावर केंद्रित नसून निःपक्षपाती होते आणि मी एक कॅथलिक असल्यामुळे या गोष्टीनी प्रभावित झाले. प्रत्यक्षपणे दुर्लक्षित झालेल्या गरजेवर तुम्ही धैर्याने प्रकाश टाकला आहे.

ए. बी., कोस्टा रिका

श्‍वासाची दुर्गंधी “तुम्ही श्‍वासाच्या दुर्गंधीबद्दल काय करू शकता?” (सावध राहा! जुलै-सप्टेंबर, १९९५) या माहितीपर लेखासाठी मी तुमचे आभार मानले पाहिजे. नेमकी तीच माझी समस्या होती! श्‍वासाची दुर्गंधी असल्यास आपण खिन्‍न होतो हे खरे आहे. मी दंतवैद्यास दोन वेळा भेट दिली तरी तो दुर्गंध नाहीसा झाला नाही. लेखात दिलेल्या सूचनांचा मी अवलंब केला व त्या यशस्वी ठरल्या. कृपया संबंध पृथ्वीवर असणाऱ्‍या लोकांची अशीच मदत करत राहा.

आर. ओ. आय., नायजेरिया

भारतातील स्त्रिया “२१ व्या शतकात वाटचाल करणाऱ्‍या—भारतातील स्त्रिया” (जुलै २२, १९९५) हा लेख मला आवडला. भारताची संस्कृती माझ्या देशापेक्षा अतिशय भिन्‍न असल्यामुळे मला भारत नेहमीच मनोरंजक वाटतो. भारतीय स्त्रियांना केवळ देवाच्या राज्यामार्फतच खरी मुक्‍ती मिळेल हे तुमच्या लेखाने दाखवले. मी माझी दृष्टी अशा काळाकडे लावून आहे जेव्हा स्वतःच्या पतींचा आदर करणाऱ्‍या सगळ्या स्त्रियांना त्यांच्या पतींकडून प्रेम व आदर मिळेल.

डब्लू. एस., ब्रिटिश कोलंबिया

रजोनिवृत्तिकाल आम्ही, विशेषतः स्त्रीरोगांवरील औषधे उत्पादन करणारी एक औषधोत्पादक कंपनी चालवत आहोत. “अधिक चांगली समज मिळविणे” (फेब्रुवारी २२, १९९५) या शीर्षकाखाली रजोनिवृत्तिकालाबद्दल दिलेला लेख आम्हाला सर्वात चित्तवेधक वाटला आणि हा विषय तुम्ही हाताळला याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. तथापि, “एस्ट्रोजन पुनःस्थापन उपचारपद्धतीबद्दल काय?” यात “हॉर्मोन पुनःस्थापना उपचारपद्धतीच्या पद्धतशीर योजनेत प्रोजेस्टरोनची भर पडल्यामुळे . . . हृदयाविकारावरील एस्ट्रोजनच्या हितकारक परिणामांबरोबर ते प्रतिक्रिया करते,” असे म्हटले आहे. हे नेहमीच योग्य नव्हे, खासकरून प्राकृतिक प्रोजेस्टिनविषयी.

डॉ. टी. डब्लू. आणि जे. के., जर्मनी

आम्हाला अद्ययावत माहिती दिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत. प्रोजेस्टिन हे, एचडीएलचे किंवा “उत्तम” प्रकारच्या कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करू शकतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे जुन्या उगमांनी जरी सूचित केले असले तरी अगदी अलीकडचे संशोधन वेगळी माहिती देतात. “जामाच्या” जानेवारी १८, १९९५ च्या लेखात अहवाल देणाऱ्‍या अलीकडील अभ्यासाने असा दावा केला, की “फक्‍त एस्ट्रोजन किंवा त्याच्या बरोबरीने प्रोजेस्टिन असल्यास ते [“उत्तम” कोलेस्ट्रोलचे प्रमाण] वाढवते.” हॉर्मोनच्या सर्व उपचारपद्धतींचे दीर्घकालिक परिणाम पूर्णपणे समजले जाण्याआधी आणखी संशोधन करण्याची गरज असेल, यात काही संशय नाही.—संपादक.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा