वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ४/८ पृ. २५-२७
  • देवाकडून मिळालेले समतोलपणाचे वरदान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाकडून मिळालेले समतोलपणाचे वरदान
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ती काय आहे? ती कशी कार्य करते?
  • प्रघाण संस्थेचे विकार
  • कारणे व उपचार
  • तुमची श्रवणशक्‍ती जतन करण्याजोगे वरदान
    सावध राहा!—१९९७
सावध राहा!—१९९६
g96 ४/८ पृ. २५-२७

देवाकडून मिळालेले समतोलपणाचे वरदान

“काही विशेष नाही, तुला सतत हलणाऱ्‍या जहाजात चालण्याची सवय झाली आहे व ही स्थिती काही दिवस राहू शकते,” असे माझ्या मित्रांनी मला सांगितले. तो १९९० चा ऑक्टोबर महिना होता व कॅरिबियनवर सात दिवसांच्या यात्रेनंतर मी एका पर्यटन जहाजातून उतरून नुकतेच जमिनीवर पाऊल ठेवले होते. तथापि, मी ज्याला काही दिवसांचाच अनुभव असेल असे समजत होतो तो आता कित्येक महिन्यांपासून तसाच आहे. जणू मी त्या जहाजातून कधी उतरलोच नाही. माझ्या प्रघाण संस्थेत अर्थात मेंदूत प्रमुख केंद्र असलेल्या समतोलपणा राखणाऱ्‍या अंतर्कर्णाच्या क्लिष्ट संस्थेत काहीतरी बिघाड झाला होता.

ती काय आहे? ती कशी कार्य करते?

तुमच्या समतोलपणाचे, मस्तिष्क स्तंभ म्हणण्यात आलेले नियमन केंद्र, तुमच्या मेंदूच्या खालील भागात आढळते. तुम्ही निरोगी असता तेव्हा तुम्ही तुमचा समतोलपणा राखू शकता कारण तुमचे डोळे, स्नायू व प्रघाण संस्थेकडून असंख्य आवेग ग्रहण करण्यात येतात.

तुमचे डोळे सतत, मस्तिष्क स्तंभाला सभोवती असलेल्या सृष्टीतील संवेदनांचे ज्ञान देतात. तुमच्या स्नायूंतील, अंतर्गत ग्राहके म्हणण्यात आलेली संवेदनाग्राहके, तुमच्या मेंदूला, तुम्ही ज्या प्रकारच्या पृष्ठभागावर चालत आहात किंवा ज्यास स्पर्श करत आहात त्याचे ज्ञान पुरवत असतात. तथापि, पृथ्वी व तिच्या गुरुत्वाकर्षण शक्‍तीच्या संदर्भात तुमच्या शरीराच्या अवकाशातील स्थितीबद्दल तुमच्या मेंदूला ज्ञान देणाऱ्‍या अंतर्गत मार्गदर्शन संस्थेची भूमिका मात्र तुमची प्रघाण संस्था पार पाडत असते.

प्रघाण संस्था, समतोलपणा राखण्याशी संबंधित असलेल्या पाच भागांनी बनलेली असते: तीन अर्धवर्तुळाकृती नलिका व दोन पिशव्या. अर्धवर्तुळाकृती नलिकांना उर्ध्व नलिका, पार्श्‍व (बाजुची) नलिका व पश्‍च (मागील) नलिका असे म्हणतात. दोन पिशव्यांना, गोणिका व लघुकोश असे म्हणतात.

खोलीच्या कोपऱ्‍यात, भिंती व जमीन एकमेकांस मिळतात त्याचप्रमाणे, अर्धवर्तुळाकृती नलिका प्रतालांत स्थित असून एकमेकांशी काटकोनात असतात. या नलिका, कवटीच्या शंखास्थी नामक कठीण अस्थींत लपलेले कुहर तयार करणारे मार्ग असतात. या अस्थिमय चक्रव्यूहात, कलामय सर्पिल कुहर नामक आणखी एक कुहर असते. प्रत्येक कलामय अर्धनलिकेच्या पुढील टोकावर एक फुगवटा असतो, त्यास कुंभिका म्हणतात. कलामय सर्पिल कुहरात असलेल्या खास द्रवाला अंतर्लसीका म्हणतात. कलेच्या बाहेर, वेगळे रासायनिक घटक असलेले आणखी एक द्रव असते, त्यास परिलसीका म्हणतात.

कुंभिका म्हटलेल्या नलिकेच्या फुगीर भागात, झुबक्यांच्या रूपात खास लोमकोशिका असतात. या लोमकोशिका, जिलेटीनसदृश पदार्थांच्या एका राशीत अर्थात घुमटात रोवलेल्या असतात. तुम्ही तुमच्या डोक्याची कोणत्याही दिशेने हालचाल करता तेव्हा, अंतर्लसीका द्रव अर्धवर्तुळाकृती नलिकांच्या हालचालींच्या मागेमागे राहतो; व यामुळे हा द्रव घुमटाला व त्यातील केसांच्या झुबक्यांना वाकवतो. केसांच्या झुबक्यांची हालचाल लोमकोशिकेच्या विद्युत गुणधर्मांत बदल घडवून आणते व परिणामतः चेतापेशींमार्फत मेंदूला संदेश पाठवले जातात. संदेश, केवळ या वैयक्‍तिक लोमकोशिकांपासून अपवाही चेतातंतूंद्वारे मेंदूलाच नव्हे, तर आवश्‍यकतेनुसार लोमकोशिकेस मोबदल्यातील माहिती पुरवण्यासाठी, अभिवाही चेतातंतूंद्वारे मेंदूमधुन परत प्रत्येक लोमकोशिकेकडे देखील संक्रमित होत असतात.

अर्धवर्तुळाकार नलिका तुमच्या डोक्याच्या कोनीय किंवा परिभ्रमणाच्या हालचालींचे परीक्षण करू शकतात जसे पुढे किंवा मागे वाकवणे, एका किंवा दुसऱ्‍या बाजुला करणे अथवा डावीकडे किंवा उजवीकडे फिरविणे.

याउलट गोणिका व लघुकोश, एका रेषेत होणारे गतिवर्धनाचे परीक्षण करू शकतात व म्हणूनच त्यांना गुरुत्वाकर्षण संवेदन ग्राहक म्हणतात. त्यांतसुद्धा, कुंभिका-शिखेत लोमकोशिका असतात. उदाहरणार्थ, लिफ्टने वर चढताना लघुकोशाद्वारे तुमच्या मेंदूला याचे ज्ञान होते व हे तुम्हाला वरती चढण्याच्या गतिवर्धनाची जाणीव करून देते. तुम्ही मोटार चालवत असता व अचानक वेग वाढवता तेव्हा प्रामुख्यत्वे, गोणिका, याचे परीक्षण करून प्रतिसाद देते. ती तुमच्या मेंदूला, वेगाने पुढे किंवा मागे जात असल्याची तुम्हाला जाणीव करून देण्याचे ज्ञान देते. मग तुमचा मेंदू या ज्ञानास इतर आवेगांसोबत जुळवून, तुमच्या दृश्‍य हालचालीच्या प्रतिक्रियेत तुम्ही तुमच्या डोळ्यांची व पायांची कशी हालचाल करावी यासारखे निर्णय घेतो. यामुळे तुम्हाला सभोवतालच्या स्थितीच्या संदर्भात तुमची अंगस्थिती समजण्यास मदत होते.

ही अद्‌भुत संस्था तिच्या रचनाकार, यहोवा देवाला सन्मान देणारी आहे. संशोधक वैज्ञानिकसुद्धा तिची रचना पाहून थक्क झाल्याशिवाय राहात नाही. जीवशास्त्र व शरीरविज्ञानाचे प्राध्यापक, ए. जे. हडस्पेथ यांनी सायंटिफिक अमेरिकन या नियतकालिकात असे लिहिले: “आणखी संशोधन कार्य, जीवशास्त्रीय उपकरणाच्या या लहान प्रतिकृतीच्या संवेदनक्षमता व गुंतागुंतीविषयी असलेल्या विस्मयाला, आणखीनच बळकटी देईल.”

प्रघाण संस्थेचे विकार

माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास, माझ्या अंतर्कर्ण विकाराचे ऑटोस्पॉन्जियॉसिस किंवा ऑटोस्क्लेरॉसिस असे निदान करण्यात आले. या अवस्थेत, व्यक्‍तीची प्रघाण संस्था ज्या अस्थीत असते ती अस्थी मऊ किंवा लवचिक होते. सामान्यतः ही अस्थी तुमच्या शरीरातील इतर अस्थींपेक्षाही फार कठीण असते. मऊ होताना, अंतर्कर्णाच्या द्रवात झिरपून त्याच्या रासायनिक घटकांत विघटन करणारे किंवा परिणामतः द्रवास विषारी करणारे एक एंझाईम उत्पन्‍न होते, असे समजले जाते. यामुळेच तुम्ही स्थिर उभे असता अथवा स्वस्थ पडलेले असता तरीसुद्धा सतत हालत असल्याचा विचित्र भास तुम्हाला होऊ शकतो.

यामुळे माझ्या पायाखालील रस्ता जणू लाटेसारखा, कधीकधी तर एका तृतीयांश मीटरइतक्या उंच लाटेसारखा वरखाली होत आहे असा मला भास होत असे. बिछान्यावर पडलेलो असता मला असे वाटे जणू मी, एक-मीटर उंच उसळणाऱ्‍या समुद्र लाटांच्या मधोमध एखाद्या मचव्यात पडलो आहे. हा भास, थोड्या वेळेपुरती घेरी येते तसा येऊन लगेच जात नसे, तर तो अनेक महिन्यांपर्यंत सबंध दिवस म्हणजे चोवीसही तास मला ग्रस्त करत असे. केवळ झोपेत असताना बेशुद्धावस्थेत थोडा आराम मिळत असे.

कारणे व उपचार

आनुवंशिक घटकाचा समावेश असण्याचा संभव असला तरीसुद्धा ऑटोस्पॉन्जियॉसिस/ऑटोस्क्लेरॉसिसचे कारण अद्याप कळलेले नाही. वैद्यकीय शास्त्राला या विकाराचा अभ्यास करणे कठीण गेले आहे कारण तो केवळ मानवांत पहायला मिळतो. प्राण्यांमध्ये आढळला तरी असे क्वचितच घडते. ऑटोस्पॉन्जियॉसिसमुळे कर्णनाद (कानात आवाज होणे), डोके जड असल्याचा भास होणे, घेरी येणे, शरीराचा तोल गेल्यासारखे वाटणे किंवा चक्कर येण्याचे वेगवेगळे प्रकार, ही विविध लक्षणे आढळू शकतात. याच विकारामुळे मध्यकर्णातील स्थापन्यास्थिका घट्ट बसून, परिणामतः संवहनी बहिरेपण येऊ शकते. ऑटोस्पॉन्जियॉसिस कर्णावर्तापर्यंत पोहंचल्यास, श्रवणचेतांचे कार्य भंग होऊन त्याची परिणती संवेदनी बहिरेपणात देखील होऊ शकते.

या विकारावर उपचार आहेत. काही प्रकारांत शस्त्रक्रिया करतात (जुलै ८, १९८८, पृष्ठ १९, सावध राहा! [इंग्रजी] पाहा); इतर उपचारांत कॅल्शियम व फ्लोराईड पूरक वापरून अस्थींत झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येतो. काही वेळेस आहारात साखर वर्ज्य करण्याचा सल्ला देण्यात येतो कारण अंतर्कर्णाला रक्‍तातील साखरेची अत्यंत गरज असते. वस्तुतः, मेंदूला उत्तेजित करण्यासाठी आवश्‍यक असते त्यापेक्षा तिप्पट साखरेची गरज अंतर्कर्णाला असते. निरोगी कान, रक्‍तातील साखरेच्या प्रमाणात होणारे चढ-उतार हाताळू शकतो; पण कानात काही बिघाड झाल्यास, हे चढ-उतार तुम्हाला गिरकांड्या खायला लावू शकतात. तुमचा अंतर्कर्ण योग्यपणे कार्य करत नसल्यास कॅफेन व मद्यसुद्धा तुम्हाला अपायकारक ठरतील. या लेखाच्या सुरवातीला उल्लेखिलेल्या पर्यटन जहाजाच्या प्रवासामुळेच हा विकार झाला असे नव्हे, तर तापमान, आर्द्रता व खाण्यापिण्याच्या सवयींत बदल झाल्यामुळे असमतोलास चालना मिळाली असावी.

तुमचा अंतर्कर्ण केवळ श्रवण करण्याचेच कार्य करत नाही, तर एका विलक्षण विस्मयकारक रितीने तो तुम्हाला तुमचा समतोलपणा राखण्यात साहाय्य करतो. त्याच्या रचनेने आम्हाला आमच्या निर्मात्याच्या हस्तकृतीविषयी विस्मय करण्यास प्रेरित करण्यास हवे व त्याच्या निर्मातापणाबद्दल असलेली आमची कदर तिने अधिक गाढ करण्यास हवी.—सौजन्याने.

[Diagrams/Picture on page 26]

(For fully formatted text, see publication)

तुमची अद्‌भुत प्रघाण संस्था

बाह्‍य दृष्य

ऊर्ध्व नलिका

लंबगोल रंध्र

कर्णावर्त

गोलाकार रंध्र

पार्श्‍व नलिका

पश्‍च नलिका

आंतरिक दृष्य

शंखास्थी

कलामय सर्पिल कुहर

कुंभिका-शिखा

लघुकोश

सरळ गती परीक्षक

कर्णावर्त

श्रवणेंद्रिय

कुंभिका

गोणिका

शिखा

समान्तर गती परीक्षक

कोनीय हालचाली मापते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा