वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • साक्षरता व आरोग्य
  • निरर्थक परिषद
  • सहानुभूती शिकणे
  • गोगलगायींचे आक्रमण
  • चीनची लोकसंख्या १.२ अरबपर्यंत पोहंचते
  • युवक भविष्याबद्दल नैराश्‍यपूर्ण
  • “स्मरणशक्‍ती” असलेल्या वनस्पती
  • पाठदुखीला तोंड देणे
  • त्रासदायक विषाणू
  • नवीन जाती
  • जगाची आरोग्य स्थिती—वाढती तफावत
    सावध राहा!—१९९५
सावध राहा!—१९९६
g96 १/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

साक्षरता व आरोग्य

युनेस्को (संयुक्‍त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना) ने दिलेल्या आकडेवार माहितीनुसार साक्षरतेचे अधिक प्रमाण, अपेक्षित आयुर्मर्यादा वाढविण्यास हातभार लावू शकते. युनेस्को सोर्सेस (इंग्रजी) हे मासिक असे निरीक्षिते, “ज्या लोकांनी लिहिणेवाचणे शिकले आहे ते लोक स्वच्छता व आरोग्याच्या काळजीबद्दल अधिक दक्ष असतात; ते फारसे दैववादी नसतात आणि आजारी पडल्यास ते डॉक्टरांची मदत घेतील, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.” तथापि, साक्षरता ही अपेक्षित आयुर्मर्यादेला प्रभावित करणाऱ्‍या गोष्टींपैकी केवळ एक गोष्ट आहे. “वैद्यकीय उपचाराची सुलभता, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व सामाजिक वातावरण” सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

निरर्थक परिषद

“सामाजिक विकासासाठी विश्‍व परिषद” हे शीर्षक असलेल्या संयुक्‍त राष्ट्रांद्वारे आयोजित संमेलनास उपस्थित राहण्यासाठी जगभरातून सुमारे २०,००० प्रतिनिधी मार्च ६-१२, १९९५ या काळात कोपनहेगन, डेन्मार्क येथे एकत्रित झाले. त्यांचा एकत्रित होण्याचा उद्देश्‍य? विकसनशील देशांतील दारिद्र्‌य, बेकारी व विशिष्ट जातीचे वगळले जाणे या गोष्टी संपुष्टात आणणे. तथापि, एक प्रमुख अडखळण—आर्थिक आधाराचा अभाव—याची ओळख पटण्यास फारसा वेळ लागला नाही. असे दिसते की अनेक गरीब देश, श्रीमंत देशांच्या कर्जात इतके बुडलेले आहेत की त्यांचे व्याज भरण्याची देखील त्यांची ऐपत नाही. यजमान देश डेन्मार्कने, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून श्रीमंत राष्ट्रांनी अतिशय गरीब देशांचे कर्ज माफ केले पाहिजे असा प्रस्ताव मांडला. तथापि, एक समस्या आहे. गरीब देशांचे पुष्कळसे कर्ज शस्त्रे खरेदी केल्यामुळे आहे. यास्तव, एका संयुक्‍त राष्ट्र सल्लागाराने स्पष्ट केल्याप्रमाणे जर कर्ज माफ केले तर ते नक्कीच आणखी बंदुका विकत घेण्यासाठी या संधीचा फायदा उचलतील.

सहानुभूती शिकणे

इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता शिकून आत्मसात केली जाते, असे लहान मुलांमध्ये असलेल्या सहानुभूतीविषयी अभ्यास करणाऱ्‍या संशोधकांनी सुचविले आहे. “अत्याचारास बळी पडलेली मुले, इतर मुलांना होत असलेल्या दुःखाला सहानुभूतीने प्रतिसाद देत नाहीत हे दाखविण्यात आले आहे,” असे मॅनहॅट्‌न येथील कॅन्सस राज्य विद्यापीठाचे, डॉ. मार्क. ए. बार्नेट्ट यांचे उद्‌गार द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात उद्धृत करण्यात आले आहेत. “ते दुःखात असलेल्या मुलाकडे पाहूनसुद्धा काहीही करणार नाहीत किंवा ते त्या मुलाजवळ जाऊन आरडाओरड करून त्यास ढकलतील.” याउलट, “ज्या मुलाच्या स्वतःच्या भावनिक गरजांची काळजी घेण्यात येते ते मूल इतरांच्या भावनांप्रती अधिक संवेदनक्षम असते,” असे ते पुढे म्हणतात. तथापि, भावनिक सुरक्षितता पुरविण्यासोबतच पालकांनी त्यांच्या मुलांना सहानुभूती कशी व्यक्‍त करावी हेसुद्धा दाखवावे. डॉ. बार्नेट्ट म्हणतात त्याप्रमाणे, सहानुभूतिपूर्ण पालक सहसा सहानुभूतिपूर्ण मुलांचे संगोपन करतात.

गोगलगायींचे आक्रमण

सहा वर्षांपूर्वी, जिवंत अशा दक्षिण अमेरिकन सोनेरी गोगलगायी, खाद्य पदार्थ म्हणून व्हिएतनामला आयात करण्यात येण्याआधी, वैज्ञानिकांनी ताकीद दिली की जर चुकून गोगलगायी निसटल्या तर त्या फार त्रासदायक ठरतील. वैज्ञानिकांचे म्हणणे खरे असल्याचे काळाने सिद्ध केलेले दिसते. काही गोगलगायी खरोखरच निसटल्या व त्यांना भात खाण्याची आवड आहे हे त्यांनी लवकरच दाखवून दिले. यानंतर, सरकारने गोगलगायींवर बंदी आणली, परंतु अनेक लहानसहान उद्योगांनी त्यांना वाढवणे व खाद्यान्‍न म्हणून विकणे सुरूच ठेवले. दि असोसिएटेड प्रेस अहवाल देते, की अधिकृत व्हिएतनाम न्यूज अनुसार, हे इवलेशे केवळ आठ जीव, एका दिवसात भातखाचराचे ११ चौरस फुट फस्त करू शकतात! अहवालानुसार गोगलगायींनी भाताचे ७७,००० एकर क्षेत्र नष्ट केले आहे व देशातील भाताची शेती करणाऱ्‍या सर्वात उत्पादनशील प्रदेशात त्या पसरल्या आहेत. गोगलगायींची केवळ एक मादी एका वर्षात साधारण चार कोटी अंडी देऊ शकते.

चीनची लोकसंख्या १.२ अरबपर्यंत पोहंचते

या वर्षाच्या सुरवातीला, चीनच्या लोकसंख्येने १.२ अरब ही मर्यादा गाठली असा अहवाल चायना टुडे या नियतकालिकाने दिला. सन १९७० च्या दशकात सुरू करण्यात आलेला राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम नसता, तर लोकसंख्येत ही वाढ नऊ वर्षांपूर्वीच झाली असती. तथापि, सध्याच्या गतीनेच वाढ होत गेली तर पुढील शतकाच्या सुरवातीला चीनची लोकसंख्या १.३ अरबपर्यंत पोहंचेल. भौगोलिकरित्या जगातील सर्वांत मोठ्या देशांपैकी चीन एक असून देखील त्याचे धान्य, मांस व अंडी यांचे दरडोई उत्पादन, त्यापेक्षा अधिक विकसित देशांच्या उत्पादनापेक्षा कमी आहे. तसेच, लागवडीखाली आणलेली एकूण जमीन लोकसंख्या व अधिक वहिवाटीमुळे घटत चालली आहे असे चायना टूडे ने म्हटले.

युवक भविष्याबद्दल नैराश्‍यपूर्ण

ऑस्ट्रेलियास एके काळी “भाग्यवान देश” म्हटले जात असे, पण ऑस्ट्रेलियन तरुणांची वाढती संख्या कदाचित आज त्या मताला दुजोरा देणार नाही. १५ ते १९ वयोगटांतील तरुणांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासावर अहवाल देताना, द ऑस्ट्रेलियन या वृत्तपत्राला असे दिसून आले की त्यांना “ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक भवितव्याविषयी ‘भयंकर’ पूर्वदृष्टी” होती. सरकारी, कॅथलिक व खासगी शाळांमध्ये, ९ व्या १० व्या व ११ व्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली होती. “अहवालानुसार, प्राप्त झालेली माहिती ‘चांगलेच स्पष्टपणे’ सूचित करते की १५ व १६-वर्षीय मुलांची सध्याची पिढी ‘भविष्याबद्दल उत्सुक नाही’—कारण समाज दिवसेंदिवस अधिक हिंसक होत चालला आहे व बेकारीचे प्रमाण वाढलेलेच असेल असे ते समजतात,” असे वृत्तपत्राने म्हटले. आजपासून दहा वर्षांनंतर त्यांचे जीवन कसे असेल याचे वर्णन करण्यास सांगितले असता, “अधिकांश मुलाखत देणाऱ्‍यांनी ढासळणारी अर्थ व्यवस्था व एक असा समाज ज्यात वैयक्‍तिकांना त्यांच्या आर्थिक भवितव्यावर फारसे नियंत्रण नाही, या गोष्टींचा उल्लेख केला.”

“स्मरणशक्‍ती” असलेल्या वनस्पती

हल्ला करण्यात येतो तेव्हा, अनेक वनस्पती त्यांच्या हल्लेखोरांचा प्रतिकार करण्यासाठी रसायने उत्पन्‍न करतात. नव वैज्ञानिक (इंग्रजी) नियतकालिक अहवाल देते, की काही वनस्पती तर हल्ला “स्मरणात” ठेवतात, ज्यामुळे पुन्हा हल्ला झाल्यास ते फार लवकर प्रतिकारात्मक विषारी पदार्थ उत्पन्‍न करणे सुरू करू शकतात. तंबाखूचे पान चावणारे सुरवंट, मुळांपर्यंत जाणारे जॅस्मॉनिक आम्ल निर्माण करण्यास चालना देते. यामुळे निकोटीनचे उत्पादन सुरू होते, जे पुन्हा पानापर्यंत जाऊन खाणाऱ्‍यासाठी ते नकोसे करते. ज्या वनस्पतींच्या मुळांना या आम्लाच्या संपर्कात आणण्यात आले त्या वनस्पतींनी हल्ल्यास अधिक लवकर प्रतिक्रिया दाखवली. “यावरून सूचित होते की वनस्पतींना खरोखरच स्मरणशक्‍ती असते” असे बफ्फेलो येथील न्यूयॉर्क राज्य विद्यापीठाचे ईयन बॉल्डविन यांनी म्हटले.

पाठदुखीला तोंड देणे

जगभरातील ९० टक्के लोकांच्या जीवनांत कधी न कधी होणारे पाठीच्या खालील भागाचे दुखणे हे कॅनडाच्या द मेडिकल पोस्ट अनुसार “मानवप्राण्यांना प्रभावित करणारी सर्वात वारंवार घडणारी स्थिती” आहे. तथापि, नेहमीच महागडा वैद्यकीय हस्तक्षेप जरूरी नसेल. डॉ. गार्थ रस्सेल, हे ऑर्थोपेडिस्ट असे म्हणतात की, “(सहसा शारीरिक कार्यानंतर लगेच होणाऱ्‍या) आकस्मिक किंवा तीव्र दाहक पाठदुखीच्या ९०% केसेसमध्ये केवळ स्नायूंची तीव्र आकुंचने समाविष्ट असतात व दोन ते तीन दिवस पूर्ण विश्रांती घेतल्याने गुण येतो.” यानंतर, डॉ. रस्सेल “सोपे व्यायाम व रोजच्या कार्यहालचाली पूर्ववत सुरू करण्याचा” सल्ला देतात.

त्रासदायक विषाणू

यू.एस.न्यूज ॲन्ड वर्ल्ड रिपोर्ट मधील एका लेखानुसार, “नवीन पीडा तसेच जुन्या रोगांनी सुद्धा थैमान घातले आहे.” का बरे? नॉइये झ्युरकर झीतुंग या स्विस वृत्तपत्राने स्पष्ट केले, की अनेक कारणांमुळे, रोगांप्रती मानवांची संवेदनशीलता वाढली आहे. यात आंतरराष्ट्रीय प्रवासात वाढ हे कारण समाविष्ट आहे जे प्रतिकारशक्‍ती नसलेल्या समुदायांत रोगांची सुरवात करण्यास कारणीभूत ठरते. यासोबतच, जसे यू.एस.न्यूज निरीक्षिते, “सीडीसी (अटलांटा, जॉर्जिया येथील रोग नियंत्रण केंद्रे) येथील लोकांना धाक आहे तो सामान्य सूक्ष्मजंतूंचा, जे एका काळी सूक्ष्म-जंतू-नाशकांनी सहज नाश करण्यात येत होते, त्यांनी आता नवीन व अत्याधिक शक्‍तिशाली औषधांवर सुद्धा मात करणे सुरू केले आहे.”

नवीन जाती

वनस्पतींच्या नवीन जाती शोधून काढण्यासाठी, ब्रिटिश व ब्राझीलियन वनस्पतीशास्त्रज्ञ २० पेक्षा अधिक वर्षांपासून ईशान्य ब्राझील येथील एकाच पर्वतावर कसून शोध करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी, केवळ १७१ चौरस किलोमीटरच्या अंतरात उगवणाऱ्‍या, पूर्वी अज्ञात असलेल्या १३१ वर्गांचा आश्‍चर्यकारकपणे शोध लावला आहे. फोल्यॉ डी साओन पाउलो या वृत्तपत्राने या ठिकाणास “एदेन बाग” म्हटले व ते बाहिया या ब्राझीलियन राज्यातील १,९६० मीटर-उंच पीको डॉस ऑलमॉस येथे आहे. हे खरोखरच नवीन शोध आहेत का याची खात्री करण्यासाठी वनस्पतीशास्त्रज्ञांनी जवळजवळ ३,५०० वनस्पतींचे नमुने तपासले—व ते होते. इंग्लंडच्या रॉयल बोटॅनिक गार्डनचे सायमन मेयो यांनी वृत्तपत्रास सांगितले: “विसाव्या शतकाच्या समाप्तीस इतक्या वनस्पतींचा शोध लागणे कौतुकास्पद आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा