वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • मी हे विचार कसे काढून टाकू शकतो?
    सावध राहा!—१९९५
  • “मी यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९५
सावध राहा!—१९९६
g96 १/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

दिरंगाईपणा “दिरंगाईपणा—काळचोर” (एप्रिल-जून १९९५) हा लेख व्यवहार्य व विनोदी शैलीत लिहिलेला होता. तो वाचत असताना, मी स्वतःवरच हसत होतो कारण मला दिरंगाई करण्याची फारच वाईट सवय आहे.

एफ. बी. एच., ब्राझील

मी माझ्या जीवनातील अधिक काळ दिरंगाईपणाच्या जुन्या व्याधीने ग्रस्त होते व यामुळे ही माहिती माझ्यासाठी समयोचित होती. ती फार चांगल्याप्रकारे लिहिण्यात आली होती व मी ही माहिती, माझ्या वेळेचे नियोजन करण्यासाठी उपयोगात आणण्याच्या विचारात आहे. मला वेगवेगळ्या लेखांसाठी अनेकदा आभार व्यक्‍त करणारे पत्र लिहावेसे वाटत होते पण मी ते कधीच करू शकले नाही. शेवटी आता मी ते साध्य केले आहे!

एम. एच., अमेरिका

मी अंक चाळत असताना त्या लेखाकडे माझे लक्ष गेले. उरलेला लेख नंतर वाचेन या विचाराने, मी प्रस्तावना वाचली. पण सुरवातीचे शब्द होते: “थांबा! हा लेख वाचण्याचे थांबवू नका!” मला आता जाणवते की दिरंगाईपणामुळे मी माझा वेळ वाया जाऊ घालवला आहे.

ए. ई., इटली

मी शिंपी आहे व दिरंगाईपणा माझा जीवनक्रम बनला आहे. याद्या तयार करणे, योग्य वेळी सुपूर्त करणे व व्यत्ययांना विचारात घेऊन नियोजन करणे यांकडे मी दुर्लक्ष केले. पण आता तुम्ही सुचविलेल्या गोष्टी उपयोगात आणण्यास मी शिकलो आहे व मी त्याचे लाभ उपभोगत आहे.

एस. एन., नायजेरिया

शेवटले दिवस पूर्ण-वेळेची सेविका या नात्याने, मी आपल्या नियतकालिकांसाठी तुमचे आभार मानू इच्छिते. एप्रिल २२, १९९५ (इंग्रजी) अंकातील “हे शेवटले दिवस आहेत का?,” या लेखांची श्रृंखला वाचत असताना, ‘हे लेख किती उघड, प्रत्यक्ष व स्पष्टीकृत आहेत!’ असा मी स्वतःशीच विचार केला. रचना, उत्कृष्ट छायाचित्रण व मथळ्यांनी विषय स्पष्ट केला व लेखांना वाचण्यास व समजण्यास सोपे बनवले. असे साहित्य आमच्या शेजाऱ्‍यांना सादर करणे आनंददायक होते!

जे. बी., अमेरिका

नागीण “नागीण—वेदनेला तोंड देणे” (एप्रिल २२, १९९५ इंग्रजी) हा तुमचा लेख मी वाचला. तीन दिवसांनी माझ्या त्वचेवर पुरळ आली जी जवळजवळ तुमच्या लेखात नागीणचे वर्णन केले होते त्यासारखीच होती. मी डॉक्टरांकडे गेले व मला नागीण झाली असावी असे मला वाटते हे मी त्यांना सांगितले. माझ्या अंदाजाप्रमाणे, त्यांनी माझी प्रशंसा केली—माझे निदान बरोबर होते! रोगाच्या सुरवातीलाच त्याच्याबद्दल कळाल्यामुळे, नागीणच्या अधिकांश रुग्णांना होतात त्या वेदनांपासून मी बचावेन असे ते म्हणाले. तुमच्या लेखाबद्दल आभारी आहे!

के. बी., अमेरिका

मात्रेश्‍का “मात्रेश्‍का—किती सुंदर बाहुली!” (एप्रिल २२, १९९५ इंग्रजी) या लेखाबद्दल आभारी आहे. वाचत असताना, त्याच्या लिहिण्याच्या पद्धतीने मी प्रभावित झाले. त्यातील चित्रे सुंदर आहेत! मी लहान होते तेव्हापासून मला या बाहुलीने मोहित केलेले होते पण तिच्या उगमाबद्दल मला काहीच माहीत नव्हते. आता मला एक आणून देण्यासाठी कुणाला तरी गळ घालावी लागेल!

एम. टी., इटली

समलैंगिकता मी सेवा-सेवक व एक पायनियर, पूर्ण वेळेचा सुवार्तिक या नात्याने सेवा करतो. “तरुण लोक विचारतात . . ” यातील समलैंगिकतेविषयी लेख जणू माझ्यासाठीच लिहिलेले आहेत! (फेब्रुवारी ८, फेब्रुवारी २२ व मार्च २२ १९९५ इंग्रजी) सुरवातीच्या व मध्य किशोरावस्थेत, मी समलैंगिकतेत अधिकाधिक गुंतत गेलो. मी ते थांबविले, परंतु तेव्हापासून या भावनांशी झुंज देणे मला कठीण गेले आहे. तथापि, या लेखांच्या मदतीने मी शेवटी माझ्या भावनांना समजू शकतो व झुंज देत राहण्यासाठी मला मदत मिळाली आहे!

नाव राखून ठेवले आहे, डेन्मार्क

बालपणापासून मी लैंगिक अत्याचार सहन केला. माझ्याबद्दल कधीही प्रेम किंवा ममता दाखवण्यात आली नव्हती. मी समलैंगिकता आचरित होतो; पण जर तरुण लोकांना समलैंगिक प्रवृत्तींमुळे येणाऱ्‍या लांच्छन, दुःख, खिन्‍नपणा व नैराश्‍याची जाणीव असती तर ते यापासून दूर पळतील. अनेक जण या विषयावर बोलण्याचे टाळतात, पण तुम्ही त्यास स्पष्ट पद्धतीने हाताळले. असे विषय प्रकाशित केल्याबद्दल मी तुमचे अंतःकरणापासून आभार मानतो.

नाव राखून ठेवले आहे, ब्राझिल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा