वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १/८ पृ. २०-२२
  • उडणारे खडक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उडणारे खडक
  • सावध राहा!—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • आपले मौल्यवान वातावरण
    सावध राहा!—१९९५
  • एका अंतरिक्षीय दुर्घटनेत जगाचा नाश?
    सावध राहा!—१९९९
  • आपली एकमेव सौरमाला कशी अस्तित्वात आली?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
सावध राहा!—१९९६
g96 १/८ पृ. २०-२२

उडणारे खडक

एका निरभ्र रात्री आकाशातून तेजस्वी उल्का पडल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? कदाचित तुम्हाला लवकरच असे दिसून येईल. वैज्ञानिकांनुसार, निसर्गाचे हे अग्नी आविष्कार प्रत्येक दिवशी सुमारे २०,००,००,००० वेळा पृथ्वीच्या आकाशात त्यांची खूण मागे सोडतात!

त्या काय आहेत? ते केवळ दगड किंवा धातूच्या पदार्थांचे लहान तुकडे असतात ज्यांना उल्काभ म्हणतात व ज्या पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर अतिप्रखर उष्णतेने तेजोमय होतात. पृथ्वीवरून दिसणारी एक चमकती रेषा उमटवीत त्या आकाशात काही मार्ग आक्रमतात त्यास उल्का म्हणतात.

बहुतेक उल्काभ पृथ्वीवर पोहंचेपर्यंत संपूर्ण जळून जातात, परंतु काही त्या अतिउष्णतेतून वाचून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पोहंचतात. यांना अशनी म्हणतात. काही वैज्ञानिक असा अंदाज करतात की, प्रत्येक दिवशी या उडत्या खडकाचे सुमारे १,००० टन पृथ्वीवर जमा होतात.a

विशेषतः, या उडत्या खडकांचा आकार तुलनात्मकरित्या लहान असल्यामुळे अशा टक्करांचा मानवांना क्वचितच धोका संभावतो. खरे म्हणजे, बहुतेक उल्का वाळूच्या कणापेक्षा अधिक आकाराच्या नसलेल्या अशनींमुळे निर्माण होतात. (“बाह्‍य अंतरिक्षातील खडक” ही पेटी पाहा.) परंतु, अवकाशात उडणाऱ्‍या हजारो मोठ्या खडकांविषयी काय? सेरीझ या नावाच्या एकाचे उदाहरण घ्या, ज्याचा व्यास सुमारे १,००० किलोमीटर एवढा आहे! तसेच ३० पेक्षा असे अधिक खडक आहेत ज्यांचा व्यास १९० किलोमीटर पेक्षा जास्त आहे. हे मोठे खडक खरे म्हणजे लहान ग्रह आहेत. वैज्ञानिक त्यांना लघुग्रह म्हणतात.

यातील एक लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळल्यास काय होईल? या संभाव्य धोक्यामुळेच वैज्ञानिक लघुग्रहांचा अभ्यास करत आहेत. बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान भ्रमण करत असले, तरी खगोलशास्त्रज्ञांनी मागोवा घेतलेल्या काही लघुग्रहांनी प्रत्यक्षात पृथ्वीचीही कक्षा ओलांडली आहे. धडक होण्याचा धोका, फ्लॅगस्टाफ, अरिझोना, अमेरिकेजवळील मिटिअर क्रेटरसारख्या (बॅरिंजर क्रेटर म्हणूनही ओळखला जाणारा) मोठ्या विवरांच्या अस्तित्वामुळे अधिक वाढतो. डायनॉसॉर लोप पावण्याचा एक सिद्धान्त असा आहे की, एका मोठ्या आघाताने वातावरणात बदल केला आणि त्यामुळे पृथ्वीवरचे हवामान विस्तारीत काळापर्यंत थंड झाले ज्यातून डायनॉसॉर वाचू शकले नाहीत.

आज अशा प्रकारची विपत्तीकारक टक्कर कदाचित मानवजातीचा नाश करू शकेल. परंतु, बायबल असे दाखवून देते की, “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ३७:२९.

[तळटीपा]

a अंदाज वेगवेगळे असतात.

[२० पानांवरील चौकट]

व्हिडिओ टेपवर एक अग्निगोल

काही उल्का असाधारणपणे तेजस्वी आणि मोठ्या असतात. त्यांना अग्निगोल म्हणतात. ऑक्टोबर ९, १९९२ रोजी, वरील छायाचित्रात दाखवलेला अग्निगोल अमेरिकेच्या अनेक राज्यांवर आकाशात एक रेषा उमटवीत गेला. तो अग्निगोल पहिल्यांदा पश्‍चिम व्हर्जिनियावर आणि त्यानंतर सुमारे ७०० किलोमीटरच्या प्रदेशावर पाहण्यात आला. त्याचा एक तुकडा जो जवळजवळ १२ किलोग्रॅमचा होता पीकस्कील, न्यूयॉर्क येथे उभ्या केलेल्या कारवर पडला.

हा उल्काभ घसटून वातावरणात शिरल्यामुळे एक तेजस्वी अग्निगोल निर्माण झाला जो ४० पेक्षा अधिक सेकंदांपर्यंत दिसला, ही या घटनेतील विलक्षण गोष्ट आहे. यामुळे त्यास व्हिडिओवर मुद्रण करण्याची अभूतपूर्व संधी प्राप्त झाली व हे १४ वेगळ्या कोनांतून करण्यात आले. निसर्ग (इंग्रजी) या नियतकालिकानुसार, “अशनी ज्यातून प्राप्त झाला आहे त्या अग्निगोलाची ही पहिली चलचित्रे आहेत.”

या अग्निगोलाचे किमान ७० तुकडे झाले जे तुकडे काही व्हिडिओ टेपमध्ये चकाकणाऱ्‍या व्यक्‍तिगत प्रेक्षपणास्त्रांसारखे दिसतात. या घटनेमुळे केवळ एकच अशनी आढळला असला, तरी एकापेक्षा अधिक तुकडे पृथ्वीच्या वातावरणात शिरून जमिनीवर कोसळले असतील असा विश्‍वास शास्त्रज्ञ बाळगतात. पूर्वी २० टन वजन असलेल्या मोठ्या उल्काभाचा तेवढाच भाग उरलेला असावा.

[२१ पानांवरील चौकट]

बाह्‍य अंतरिक्षातील खडक

लघुग्रह: प्लेनेटोईट किंवा लहान ग्रह असे देखील म्हटले जाते. हे अति लहान ग्रह सूर्याभोवती कक्षेत फिरत असतात. अनेकांचे ओबडधोबड आकार असल्यामुळे ते एकेकाळी मोठ्या घन पदार्थांचे तुकडे असावेत हे दिसून येत असेल.

उल्काभ: अवकाशात तरंगणारा किंवा वातावरणात पडणारा धातू किंवा दगडाच्या पदार्थाचा तुलनात्मक लहान तुकडा. काही वैज्ञानिक असा विचार करतात की, बहुतेक उल्काभ, लघुग्रहांचे तुकडे आहेत जे टक्कर झाल्यामुळे किंवा लोप पावलेल्या धूमकेतूंच्या दगडी अवशेषांनी निर्माण होतात.

उल्का: उल्काभ पृथ्वीच्या वातावरणात शिरतो तेव्हा, हवेच्या घर्षणाने अतिशय उष्णता आणि तेजस्वी चकाकणे निर्माण होते. या तप्त तेजस्वी वायूंची रेषा क्षणभर आकाशात तेजोरेषेसारखी दिसते. या तेजोरेषेला उल्का म्हणतात. अनेकजण त्याला तुटणारा तारा किंवा पडणारा तारा असेही म्हणतात. बहुतांश उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या १०० किलोमीटर वर असल्यास पहिल्यांदा दिसून येतात.

अशनी: काहीवेळेस एखादा उल्काभ इतका मोठा असतो की आपल्या वातावरणात प्रवेश करताना तो पूर्णतया जळत नाही, आणि पृथ्वीमध्ये शिरतो. अशा उल्काभासाठी अशनी ही संज्ञा वापरली जाते. काही अतिशय मोठे किंवा वजनदार असू शकतात. नामिबिया, आफ्रिकामधील एक अशनी ६० टनपेक्षा अधिक वजनाचा आहे. ग्रीनलंड, मेक्सिको आणि अमेरिकेत १५ किंवा त्यापेक्षा अधिक टन वजनाचे इतर मोठे अशनी आढळले आहेत.

[२१ पानांवरील चौकट/चित्र]

इडा आणि त्याचा लहान चंद्र

इडा नामक एका लघुग्रहाचे छायाचित्र घेत असताना, गॅलीलेओ या अंतरिक्ष यानाला गुरूकडे जात असताना एक अनपेक्षित शोध लागला—लघुग्रहाभोवती परिभ्रमण करत असलेल्या चंद्राचे पहिले लिखित उदाहरण. आकाश आणि दूरदर्शक (इंग्रजी) यात वृत्त दिल्याप्रमाणे, वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे, की डॅकटल नामक अंडाकृती चंद्राचे आकारमान १.६ बाय १.२ किलोमीटर आहे. त्याची कक्षा ५६ बाय २१ किलोमीटर आकारमानाच्या इडा लघुग्रहाच्या मध्यापासून सुमारे १०० किलोमीटर इतके आहे. त्यांचे तांबूस रंगांचे घटक सुचवतात की, इडा आणि तिचे लहानसे चंद्र हे दोन्ही, जे एकाच मोठ्या खडकाचे तुकडे असल्याचा विचार केला जातो व ज्यांचा अवकाशात टक्कर झाल्याने चूरा झाला होता त्या करोनीस लघुग्रहांच्या कुलातील भाग आहेत.

[चित्राचे श्रेय]

NASA photo/JPL

[२२ पानांवरील चित्रं]

फ्लॅगस्टाफ, अरिझोना, अमेरिका येथील मिटिअर क्रेटरचा व्यास, १,२०० मीटर आणि त्याची खोली २०० मीटर इतकी आहे

[चित्राचे श्रेय]

Photo by D. J. Roddy and K. Zell, U.S. Geological Survey

[२० पानांवरील चित्राचे श्रेय]

Sara Eichmiller Ruck

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा