वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १/८ पृ. १४-१५
  • हूला हवाईचे नृत्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हूला हवाईचे नृत्य
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मिशनऱ्‍यांचा प्रभाव
  • हूलाचे संजीवन
  • आजचे हूला
  • तुम्हाला माहीत नसणारे यार्देन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
सावध राहा!—१९९६
g96 १/८ पृ. १४-१५

हूला हवाईचे नृत्य

हवाईमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

हवाईचा उल्लेख केला न केला, की अनेकदा हूलाचे स्मरण होते. जरी अद्वितीयरितीने, हूला हवाईशी संबंधित असले तरी त्या नृत्यांचा उगम दक्षिण पॅसिफिकमधून होतो.

प्राचीन काळी हवाईमधील लोकांची लेखी भाषा नसल्यामुळे त्यांच्या इतिहासाचे व प्रथांचे कथन करण्यासाठी गीतांचा व मंत्रांचा उपयोग केला जात असे. कंबर, हात व पायांच्या हालचाली व त्याबरोबर चेहेऱ्‍यावरील आविर्भाव यांचा समावेश असलेल्या हूला बरोबर या मंत्रांची व गीतांची साथ असे.

सन १७७८ मध्ये, जेव्हा कॅप्टन कूक व त्याच्या लोकांचे आगमन झाले, त्यापूर्वी हूलाशी संबंधित असणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीचा पुरावा देणे शक्य नाही. हूलाबद्दल आज जी काही माहिती आहे ती मोठ्या प्रमाणात, १९ व्या शतकाच्या अखेरीस अस्तित्वात असलेल्या चालीरिती, गीते व मंत्र यांवर आधारित आहेत. आरंभीचे हूला कदाचित पवित्र विधी असू शकले असतील. तरीसुद्धा, सर्वच हूला उपासनेची कृत्ये किंवा धार्मिक सेवेचे भाग होते असा विचार केला जात नाही.

मिशनऱ्‍यांचा प्रभाव

१८ व्या आणि १९ व्या शतकांत, परराष्ट्रीय जहाजांवरील शोधक प्रवासी व खलाशी यांच्यासाठी हे हूला प्रदर्शित केले जात होते. हे शक्य आहे की किंमत देणाऱ्‍या गिऱ्‍हाईकांना, हे हूला लैंगिकतेत अगदी स्पष्ट असावे असे वाटत होते.

सन १८२० मध्ये, जेव्हा मिशनरी आले तेव्हा हूलाचे खंडन करण्याजोगे त्यांच्याकडे बळकट असे कारण होते. प्रमुखांची मंजुरी मिळवून त्यांनी हूला हे अधार्मिक आणि अश्‍लील—दियाबलाचे कार्य समजून त्यावर हल्ला केला. यापूर्वी देखील १८१९ मध्ये, राज्यकारभार पाहणारी व पहिला राजा कॉमेहॉमेहॉ याची विधवा, राणी कॉऑहुमॉनु, हिच्याद्वारे प्राचीन धार्मिक कार्यांमध्ये बदल करण्यात आले. यांमध्ये मूर्त्यांचा विध्वंस करणे आणि गुंतागुंतीच्या विधींचे निष्कासन करणे यांचा समावेश होता. अगणित नृत्य व मंत्र देखील कायमचे हरपले.

सन १८२५ मध्ये कॉऑहुमॉनुचा चर्चमध्ये स्वीकार करण्यात आला. १८३० मध्ये तिने हूलाच्या सार्वजनिक प्रदर्शनांचा निषेध करणारा जाहीरनामा काढला. १८३२ मध्ये तिच्या मृत्यूनंतर काही प्रमुखांनी ह्‍या जाहीरनाम्याकडे कानाडोळा केला. काही वर्षांसाठी, जेव्हा तिसरा तरुण राजा कॉमेहॉमेहॉ व त्याच्या साथीदारांनी नैतिक निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन केले तेव्हा पुन्हा एकदा, काही प्रमाणात हूला लोकप्रिय झाले. पण १८३५ मध्ये राजाने कबूल केले, की त्याचे मार्ग चुकीचे होते आणि ते राज्य कॅल्व्हिन पंथाच्या सत्तेखाली परतले.

हूलाचे संजीवन

राजा कॉलॉकॉऊऑच्या कारकिर्दीत (१८७४-९१), एक संजीवन झाले ज्यामध्ये सार्वजनिक प्रदर्शन करण्यासाठी हूलाला पुन्हा एकदा पूर्णपणे मान्यता मिळाली. अनेक महिन्यांचे प्रशिक्षण व खळबळ, यामध्ये सार्वजनिकरित्या प्रदर्शित होणारे मंत्र व हूला, १८८३ मध्ये, त्याच्या राज्याभिषेकाच्यावेळी कळसाला पोहंचले, काही तर खासपणे त्या प्रसंगासाठीच लिहिण्यात आले होते. १८९१ मध्ये त्याच्या मृत्यूच्या समयापर्यंत हूलाच्या पदन्यासांमध्ये आणि शरीराच्या हालचालींमध्ये पुष्कळ बदल होऊन त्याबरोबर चार तारांचे तंतुवाद्य, सारंगी आणि व्हायोलीन या वाद्यांना सादर करण्यात आले होते.

सन १८९३ मध्ये राजसत्ताक पद्धतीचा अंत झाल्यानंतर हूलाचा पुन्हा ऱ्‍हास झाला. तथापि, २० व्या शतकाच्या मध्यात, हूला पुन्हा सुप्रसिद्ध होऊ लागले. अधिक निरनिराळ्या प्रेक्षकांकरता अपीलकारक करण्यासाठी अनेक नवीन पद्धतींचे शोध घेण्यात आले होते. पुष्कळांना हवाई भाषा कळत नसल्यामुळे इंग्रजी शब्दांचा वापर केला गेला. आधुनिक हूला, नृत्यावरच—हात व पायांच्या हालचाली, कंबर हालवणे, व चेहेऱ्‍यावरील आविर्भाव यावर जास्त जोर देतात.

बेटांना भेट देणाऱ्‍या लोकांची संख्या जसजशी वाढत गेली तसतसे हूला अधिकाधिक प्रचलित झाले. मुख्य भूप्रदेशातून आलेले प्रवासी, त्यांनी शिकलेले हे नृत्य, आपल्यासोबत घेऊन गेले व हवाई नसलेल्या नर्तकांचा उपयोग करून हॉलिवूड चित्रपटांत ते प्रदर्शित करू लागले. १९३५ मध्ये, मिन्‍नी माउसने मिक्कीसाठी हूला नृत्य केले ज्यामध्ये त्याने आपले पोलादी गिटार वाजवले.

आजचे हूला

सन १९७० च्या दशकामध्ये “हवाईच्या पुनरुज्जीवनासोबत,” काही गायक, नर्तक आणि उत्कृष्ट शिक्षकांचे ज्ञान, हे पुरातन हूलाचे प्रकार पुन्हा सजीव करण्यासाठी आधार बनले होते. आज हूलाचे जुने नृत्य पुन्हा उत्पादन करणारे हूलाचे उत्कृष्ट शिक्षक आहेत, तर काही नवीनही निर्माण करणारे आहेत. या दोन्ही प्रकारात त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम, अमर्याद आणि मौजेच्या प्रदर्शनात झाला आहे.

हवाईच्या अनेक दैवतांशी असलेली त्यांची आध्यात्मिक जवळीक काहीअंशी आधुनिक काळापर्यंत आली आहे. प्रतिवर्षी, हवाईमधील हिलो येथे मेर्‌रीचा बादशाही उत्सव सुरू होण्यापूर्वी हूला प्रशाला, पेले नामक अग्नी व ज्वालामुखी पर्वतांच्या खळग्याकडे किंवा अलीकडील ज्वालामुखी रसाप्रवाहांच्या स्थानांकडे यात्रा करतात. ते गीते गातात, नृत्य करतात, आणि पुष्पांजली व रसदार फळे वाहतात आणि जिन दारूही वाहून स्पर्धेमधील त्यांच्या प्रयत्नांवर तिच्या आशीर्वादांकरता याचना करतात. जगभरातील गट तीन रात्रींच्या स्पर्धांमध्ये चढाओढ करतात, ज्याला हूलाचे ऑलिम्पिक्स्‌ असे ओळखले जाते.

हूला हा हवाईमधील सांस्कृतिक पुनर्जन्माचा एक मोठा भाग बनला आहे. यामध्ये सौम्य नृत्य, त्याबरोबर दैवते व देवतांचे आदर करणारे मंत्र आणि ज्या द्वीपसमूहांत काहीच धार्मिक महत्त्व नाही, त्यात दैनंदिन जीवनातले साधे आविर्भाव, यांचाही समावेश होतो.

काही प्रकारांचे हूला नृत्य करणे किंवा ते पाहणे या बाबतीत ख्रिश्‍चनांनी अत्यंत निवडक असले पाहिजे. त्यांनी याबाबतीत, ते नकळत एखाद्या देव किंवा दैवताचा सन्मान करत नाहीत याची खात्री बाळगावी. गीते किंवा मंत्र ऐकताना अथवा गाताना काळजी बाळगण्याची गरज आहे. यात अनेक गर्भित किंवा दुहेरी अर्थ असणारे शब्द असतात. हे जर लक्षात ठेवले तर एखादा प्रेक्षक किंवा भागीदार, मनोरंजनाचा एक हितकारक प्रकार या नात्याने हूलाच्या आनंदाचा उपभोग घेऊ शकेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा