वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १/८ पृ. ८-१०
  • खरोखर भवितव्य काय राखून आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरोखर भवितव्य काय राखून आहे
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पूर्तता न होणे
  • बाह्‍य अंतरिक्षामध्ये वसाहत?
  • मानवी कुटुंबाचे भवितव्य
  • खरा वैज्ञानिक शोध
  • आजच्या विज्ञान कथांवर एक नजर
    सावध राहा!—१९९६
  • विज्ञान कथा लोकप्रियतेकडे तिची वाटचाल
    सावध राहा!—१९९६
  • विश्‍वास आणि तुमचे भविष्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • श्रेष्ठ ज्ञानाचा अप्रतिम उगम
    जीवनाचा काय उद्देश आहे?
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९६
g96 १/८ पृ. ८-१०

खरोखर भवितव्य काय राखून आहे

अनेक विज्ञान-कथा रसिकांचे जिज्ञासू मन असते, त्यांना मानवी समाजात बदल व्हावा अशी मनसा आणि भवितव्याबद्दल खूप आवड असते. बायबलमध्ये भवितव्याबद्दल सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण मानवाच्या भविष्याबद्दल बायबलचा दृष्टिकोन आणि विज्ञान-कथा लेखकांच्या कल्पना यांमध्ये काहीही साम्य नाही.

भवितव्य कसे असेल याविषयी विज्ञान कथा अनेक विविध दृष्टिकोन सादर करतात. परंतु, यांतील कोणत्याही एका दृष्टिकोनासाठी तुम्ही आपले जीवन धोक्यात घालाल का? तुमच्या निवडीसाठी तुम्ही कशाचा आधार घ्याल? ही दृश्‍ये, किंवा एका मागोमाग प्रक्षेपित केलेल्या घटना सर्वच खऱ्‍या असू शकत नाहीत. खरे म्हणजे, त्या सर्वांमध्ये अनुमान—कल्पना—असल्यामुळे, त्यांच्यातील एक तरी घटना सत्य आहे असे तुम्ही आत्मविश्‍वासाने सांगू शकता का? त्यांच्यातील एकही सत्य नसेल अशी अधिक संभवना आहे.

पूर्तता न होणे

आधीच, अनेक विज्ञान कथांच्या घटनांची पूर्तता होत नाही. कशा प्रकारे? येथे पृथ्वीवर विज्ञान, उत्तम संस्कृतीकडे कसे घेऊन जाऊ शकते या विषयावरील घटनांची पूर्तता झालेली नाही. सुधारलेली संस्कृती तर दूरच, पण आजची वास्तविकता याच्या अगदी विरुद्ध आहे. कॉर्ल मिखाएल ऑर्मर हा जर्मन लेखक असे निरीक्षण करतो: “भवितव्याने आम्हाला अस्वस्थ केले आहे.” “आण्विक मृत्यूचे जागतिक धोके, वातावरणातील अरिष्टे, उपासमार, दारिद्र्‌य, ऊर्जा धोक्यात असण्याचा समय [आणि] राज्य प्रवर्तित दहशतवाद” यांकडे तो अंगुली दर्शवतो.

दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे तर, अनेक विज्ञान-कथा गोष्टींमध्ये वर्णन केल्याप्रमाणे पृथ्वी आणि मानवी कुटुंबाचे भवितव्य पूर्ततेप्रत प्रगती करत नाही. त्याउलट, पृथ्वीवरील परिस्थिती खालावत आहे तशी मानवी अवस्था विरुद्ध दिशेने जात आहे. वैज्ञानिक किंवा तांत्रिक प्रगती झालेली असतानाही, संपूर्ण जगभरात मानवी समाज अधिकाधिक गुन्हेगारी, हिंसा, दारिद्र्‌य, जातीय द्वेष आणि कुटुंबांचे मोडकळीस येणे यांचा अनुभव घेत आहे.

काही वैज्ञानिक प्रयत्नांनी मानवांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. याची काही उदाहरणे विचारात घ्या: हवा, पाणी आणि अन्‍न यांतील रासायनिक प्रदूषण; भारतात भोपाळमधील दुर्घटना, जेथे एका औद्योगिक कारखान्यातील दुर्घटनेने विषारी वायूची गळती झाल्यामुळे २,००० लोकांचा मृत्यू झाला व सुमारे २,००,००० लोक जखमी झाले; युक्रेनमध्ये चर्नोबल येथील नाभिकीय ऊर्जा प्लँट वितळल्यामुळे अनेकजण मरण पावले आणि विस्तारीत क्षेत्रामध्ये कर्करोग व इतर आरोग्य समस्यांमध्ये वाढ झाली.

बाह्‍य अंतरिक्षामध्ये वसाहत?

भवितव्याबद्दलच्या अनेक विज्ञान-कथा, जीवनातील त्रास आणि पृथ्वीवरील मानवी योजनांचे अपयश यांच्यापासून बचावाचा आणखी दुसरा मार्ग सादर करतात. ते रसिकाला बाह्‍य अंतरिक्षातील काल्पनिक देखाव्यांमध्ये पाठवतात. दुसऱ्‍या ग्रहांवर आणि विश्‍वाच्या इतर भागांत वसाहत करण्यासाठी मानवांचे आंतर-आकाशगंगांतील अंतरिक्ष यान वापरणे हे सर्वसामान्य विषय आहेत. यामुळे, “मानवजातीचे भवितव्य अंतरिक्षाच्या शोधावर अवलंबून आहे,” असे ज्या व्यक्‍तीने न्यूयॉर्कच्या एका वृत्तपत्राच्या संपादकाला लिहिले त्यासारखे वाटण्यास अनेकजण प्रवृत्त होतात.

पृथ्वीजवळ अंतरिक्ष यानांच्या उड्डाणामुळे आणि अंतरिक्षाचा वेध घेण्यासाठी साधने पाठवल्यामुळे अंतरिक्षाचा खरा शोध चालू राहतो. पण, बाह्‍य अंतरिक्षात वसती करण्याविषयी काय? मानव विस्तारीत अंतरिक्ष उड्डाण करतील याविषयी बोलले जात असले, तरी चंद्रावर किंवा कोणत्याही जवळपासच्या ग्रहांवर वसाहत करण्याबद्दल सध्या कोणत्याही निश्‍चित व्यवहार्य योजना नाहीत—तर इतर आकाशगंगांचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. खरोखर, मानवांच्या प्रयत्नांनी बाह्‍य अंतरिक्षावर वसाहत करणे हा निकट भवितव्यातील पर्याय नाही. तसेच विविध राष्ट्रांचे चालू अंतराळसंबंधित कार्यक्रम इतके खर्चीक आहेत की त्यामध्ये कपात केली जात आहे किंवा त्यांना अस्वीकृत केले जात आहे.

वास्तविकता अशी आहे की, मानवजातीचे भवितव्य, तुमचे भवितव्य, मानवांनी चालना दिलेल्या अंतरिक्षाच्या चमत्कारिक घटनांमध्ये मुळीच नाही. तुमचे भवितव्य येथे पृथ्वीवरच आहे. तसेच ते भवितव्य वैज्ञानिक, मानवी सरकार किंवा हस्तलिखितांचे लेखक यांच्याकरवी ठरवले जाणार नाही. आपण त्याविषयी इतके निश्‍चित का असू शकतो?

कारण पृथ्वीचा निर्माणकर्ता, यहोवा देव भवितव्य ठरवील. तसेच कोणतेही विज्ञान-कथा दृश्‍य बायबलमध्ये सादर केलेल्या अभिवचनांशी स्पर्धा करू शकत नाही. त्या पुस्तकात—देवाने मानवजातीला दिलेले त्याचे प्रेरित वचन—यामध्ये तो आपल्याला मानवांसाठी काय भवितव्य असेल याबद्दल सांगतो. (२ तीमथ्य ३:१६, १७; २ पेत्र २:२०, २१) ते काय म्हणते?

मानवी कुटुंबाचे भवितव्य

देवाचे वचन, येशू ख्रिस्ताच्या अधिकारातील नवीन सरकारद्वारे मानवी समाजाचे पूर्णपणे नवीनीकरण करण्याच्या निर्माणकर्त्याच्या उद्देशाला स्पष्ट करते. बायबलमध्ये त्या स्वर्गीय सरकारला देवाचे राज्य असे म्हटले आहे.—मत्तय ६:९, १०.

त्या राज्याविषयी दानीएल २:४४ येथील प्रेरित भविष्यवाणी अशी घोषणा करते: “त्या राजांच्या [आज अस्तित्वात असलेल्या] अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व [सद्य-दिवसातील] राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”

देवाच्या सामर्थ्यशाली कार्यकारी शक्‍तीच्या प्रेरणेने, प्रेषित पेत्राने देखील पृथ्वीवर देवाच्या राज्यामधील भवितव्यातील जीवनाविषयी लिहिले. तो म्हणाला: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश [देवाचे स्वर्गीय राज्य] व नवी पृथ्वी [त्या राज्याच्या अधिपत्याखालील नवा मानवी समाज] ह्‍यांची [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.”—२ पेत्र ३:१३.

देवाच्या स्वर्गीय राज्याच्या अधिपत्याखाली पृथ्वीवर राहण्याचा विशेषाधिकार असणाऱ्‍यांचे जीवन कसे असेल? निर्माणकर्त्याचे अभिवचन असे आहे: “‘[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील ह्‍यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.’ तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: ‘पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो.’ तो म्हणाला, ‘लिही, कारण ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.’”—प्रकटीकरण २१:४, ५.

निर्माणकर्ता ज्या भवितव्याचे अभिवचन देतो ते एक अद्‌भुत भवितव्य आहे. विज्ञान-कथा लेखक किंवा वैज्ञानिक यांच्या अनैसर्गिक, विलक्षण प्राणी आणि परिसरांनी वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कोणत्याही काल्पनिक दृश्‍यांपासून हे पूर्णपणे वेगळे आहे. खरे ख्रिस्ती, भवितव्याबद्दल देवाच्या निश्‍चित अभिवचनांवर भरवसा ठेवतात. अर्थात, ते यापेक्षाही अधिक करतात. त्यासाठी ते आपला जीवही देण्यास तयार असतात.

ते इतक्या आत्मविश्‍वासाने असे का करू शकतात? कारण देवाच्या वचनातून त्यांना हे माहीत आहे की, “या आशेची निराशा होत नाही” कारण ‘देव खोटे बोलू शकत नाही.’ वास्तविकतेत, “खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.” (रोमकर ५:५; तीत १:२; इब्रीयांस ६:१८) यहोशवा, या देवाच्या एका सेवकाने पुष्कळ काळाआधी सांगितल्याप्रमाणे: “आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यातली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.”—यहोशवा २३:१४.

पुष्कळशा विज्ञान कथा या दुष्ट जुन्या व्यवस्थीकरणाच्या कल्पनांना प्रतिबिंबित करतात. ते कसे? विज्ञान कथा, तथाकथित ज्ञानप्रसाराच्या काळात सुरू झाल्या जेव्हा अनेक व्यक्‍तींनी पारंपारिक अधिकार नाकारला आणि मनुष्य आपले भवितव्य स्वतः निर्माण करू शकतो असा विश्‍वास बाळगला. समाजाच्या बहुतांश त्रासासाठी त्यांनी योग्यपणे जागतिक धर्माला दोष दिला, पण मग देवाचे अस्तित्व तसेच उद्देश यांबद्दलचे सत्य त्यांनी भिरकावून लावले. ज्या प्रकारे सर्व काही घडत होते त्यांनी ते निराश झाले आणि म्हणून त्यांनी दुसऱ्‍या कल्पनांचा आधार घेतला.

तथापि, मानवी कल्पना, कितीही चांगल्या रीतीने विचार करून योजलेल्या असल्या तरी त्यांचे क्षेत्र मर्यादित असते. आपला निर्माणकर्ता म्हणतो: “आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.”—यशया ५५:९.

खरा वैज्ञानिक शोध

देवाच्या नवीन जगात, मानवजातीची ज्ञानाकरता असलेली तृष्णा काही अंशी खऱ्‍या वैज्ञानिक तपासणीकरवी भागवली जाईल. नवीन देखाव्यांचा शोध लावण्याची गरज नसेल कारण हितकारक आणि सत्य मार्गाने वास्तविकता मनास आकर्षित करील आणि शिकवील.

प्रख्यात वैज्ञानिक आयझॅक न्यूटन याने जेव्हा स्वतःची तुलना “समुद्र किनाऱ्‍यावर खेळणाऱ्‍या अशा मुलाशी केली . . . [ज्याच्यासमोर] सत्याचा महासागर अज्ञात होता,” तेव्हा त्याला जसे वाटले ते अनेकजणांना समजेल. निःसंशये, आपल्या नवीन जगात देव विश्‍वासू मानवांना एका मागोमाग एक उद्दीपित करणारे शोध प्रकट करील.

होय, त्यावेळी वैज्ञानिक संशोधन पूर्णतः सत्यावर आधारलेले असेल कारण यहोवा ‘सत्यस्वरूप देव आहे.’ तो आपल्याला मानवाच्या पार्थिव वातावरणातून तसेच प्राणी राज्यातून देखील शिकून घेण्यासाठी आमंत्रण देतो. (स्तोत्र ३१:५; ईयोब १२:७-९) सत्यस्वरूप देवाने मार्गदर्शित केलेला प्रामाणिक वैज्ञानिक प्रयत्न देवाच्या नवीन व्यवस्थीकरणाचे आकर्षक वैशिष्ट्य नक्कीच असेल. मग सर्व नवीन शोध, अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा शोध व मानवांच्या जीवनातील आणि राहणीमानाच्या दर्जातील आश्‍चर्यकारक सुधारणुकीचे श्रेय कोणा मानवाला नव्हे तर विश्‍वाचा निर्माणकर्ता, यहोवा देव याला दिले जाईल.

वेगाने समीप येत असलेल्या त्या नवीन जगात, सर्व आज्ञाधारक मानव देवाची प्रेमळ काळजी आणि मार्गदर्शन यासाठी त्याचे गौरव करतील. ते अत्यानंदाने त्याची सेवा करतील आणि प्रकटीकरण ४:११ मध्ये वर्णिल्याप्रमाणे त्याला असे म्हणतील: “हे प्रभो, [यहोवा] आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”

[९ पानांवरील चित्र]

मानवजातीचे भवितव्य, येथे पृथ्वीवर आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा