वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १/८ पृ. ५-८
  • आजच्या विज्ञान कथांवर एक नजर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आजच्या विज्ञान कथांवर एक नजर
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विज्ञान कथा—मोठा व्यापार
  • विज्ञान कथा “मोठ्या पडद्यावर” यशस्वी ठरते
  • संतुलनाची गरज
  • विज्ञान कथा लोकप्रियतेकडे तिची वाटचाल
    सावध राहा!—१९९६
  • खरोखर भवितव्य काय राखून आहे
    सावध राहा!—१९९६
  • तुम्हाला आठवते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • बायबलमधल्या माहितीवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९६
g96 १/८ पृ. ५-८

आजच्या विज्ञान कथांवर एक नजर

मोटार गाड्या, दूरध्वनी, संगणक—१३० पेक्षा अधिक वर्षांआधी कोणी यांचा नवीन शोध लागेल असे पूर्वदृश्‍य संभवतः पाहिले असेल का? विज्ञान कथांचा (एसएफ) लेखक जुल्स वर्न याने पाहिले! हे आश्‍चर्यकारक वैज्ञानिक ज्ञान, अलीकडेच शोध लागलेल्या विसाव्या शतकातील पॅरिस (इंग्रजी) हे शीर्षक असलेल्या जुल्स वर्नच्या कादंबरीच्या हस्तलिखितामध्ये आढळले होते. पूर्वी प्रकाशित न झालेल्या या कादंबरीत, वर्नने एका विलक्षण यंत्राचेही वर्णन केले होते जे आधुनिक फॅक्स यंत्राशी आश्‍चर्यकारकपणे जुळते!a

तरीसुद्धा, सर्वात चाणाक्ष विज्ञान-कथा लेखक देखील खरे संदेष्टे होण्यास आत्यंतिक प्रमाणात अपयशी ठरतात. उदाहरणार्थ, पृथ्वीच्या मध्यभागाकडे प्रवास (इंग्रजी) ही जुल्स वर्नची कादंबरी वाचण्यास फारच मनोवेधक आहे परंतु, असा प्रवास करणे शक्य नाही हे शास्त्रज्ञांना आता ठाऊक झाले आहे. तसेच काहींनी आधी सुचवल्याप्रमाणे, २००१ साली, लोक गुरू किंवा इतर ग्रहांवर जातील याची देखील शक्यता दिसत नाही.

विज्ञान-कथा लेखक, घडलेल्या अनेक आश्‍चर्यकारक वैज्ञानिक विकासांचे प्रतिपादन करण्यासही अपयशी ठरले आहेत. अटलांटिक मासिक (इंग्रजी) यातील एका लेखात विज्ञान-कथा लेखक थॉमस एम. डीश असे कबूल करतात: “सायबरनेटीक [संगणक] युग . . . , हरितगृह प्रभाव किंवा ओझोन थराचा नाश वा एडस्‌ यांची कल्पना करण्यात एसएफ अपयशी ठरले आहे हे लक्षात घ्या. शक्‍तीचे नवीन भूराजकारणीय असंतुलन याचा विचार करा. या सर्व गोष्टी ध्यानात घ्या, आणि मग एसएफने यांच्याविषयी काय म्हटले हे विचारा. बहुतेक करून, एक शब्दही नाही.”

विज्ञान कथा—मोठा व्यापार

अर्थात, रसिकांकरता विज्ञान कथा वास्तविक विज्ञान नव्हे तर मनोरंजन आहे. तरीपण, या बाबतीतही त्याच्या मूल्याबद्दल शंका बाळगणारे असे काही लोक आहेत. या शतकाच्या सुरवातीला विज्ञान-कथा विशेषांक असलेल्या स्वस्त नियतकालिकांच्या प्रकाशनामुळे विज्ञान कथांना हलक्या प्रतीचे साहित्य समजले जाण्याचे नावलौकिक मिळाले. यातील पहिले, आश्‍चर्यजनक कथा (इंग्रजी) हे नियतकालिक १९२६ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले. त्याचे प्रस्थापक, ह्‍यूगो गर्न्सबॅक यांना असा शब्द शोधून काढण्याचे श्रेय दिले जाते ज्यातून “विज्ञान कथा” ही संज्ञा अस्तित्वात आली. या चित्तथरारक धाडसाच्या कथांना काहीच वाङ्‌मयीन मोल नाही असे अनेकांना वाटले.

दुसऱ्‍या महायुद्धानंतर, विज्ञान कथांकडे गांभिर्याने लक्ष दिले जाऊ लागले. विज्ञानाने त्या युद्धात जी नाट्यमय भूमिका बजावली त्यामुळे विज्ञानाला नवीन प्रतिष्ठा दिली जाऊ लागली. विज्ञान-कथा लेखकांची प्रतिपादने अधिक विश्‍वसनीय वाटू लागली. त्यामुळे विज्ञान कथांची व्यंगचित्र पुस्तके, नियतकालिके आणि कागदी बांधणीची पुस्तके यांचे अधिकाधिक प्रकाशन होऊ लागले. पुठ्ठा बांधणीच्या विज्ञान कथेच्या पुस्तकांच्या असंख्य प्रती छापण्यात येऊ लागल्या. परंतु, विज्ञान कथा, लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात तसे, साहित्याचा दर्जा—आणि वैज्ञानिक अचूकता—यांचा बहुधा त्याग केला जातो. विज्ञान-कथा लेखक, रॉबर्ट ए. हाईनलाईन असा शोक व्यक्‍त करतात, की आता “वाचण्याजोगे काहीही आणि मर्यादित मनोरंजन असलेले देखील” प्रकाशित केले जाते, व यामध्ये “कम दर्जाच्या पुष्कळ काल्पनिक कादंबऱ्‍यांचा समावेश” होतो. अर्सला के. लगीन ही लेखिका यात भर घालून अशी म्हणते, “दुय्यम दर्जाचा मालही” छापला जातो.

अशा टिकांव्यतिरिक्‍त, विज्ञान कथेला वैज्ञानिकांकडून नव्हे तर चलचित्रपट व्यवसायाकडून उल्लेखनीयरित्या उत्तेजन मिळाल्यामुळे ती लोकप्रियतेच्या नवीन शिखरांपर्यंत पोहंचली आहे.

विज्ञान कथा “मोठ्या पडद्यावर” यशस्वी ठरते

सन १९०२ मध्ये जॉर्ज मेलयेसने अ ट्रीप टू द मून हा चित्रपट तयार केल्यापासून विज्ञान कथा अस्तित्वात आहेत. चित्रपट दर्शकांची नंतरची तरुण पिढी फ्लॅश गॉर्डन याने मोहित झाली. परंतु, मनुष्य चंद्रावर पोहंचण्याच्या एक वर्ष आधी म्हणजे १९६८ मध्ये, २००१: अ स्पेस ओडीस्सी याला कलात्मक मान्यता मिळाली आणि तो व्यापारी दृष्ट्या देखील यशस्वी ठरला. मग, हॉलीवूड, विज्ञान-कथा चित्रपटांसाठी प्रचंड पैसा पुरवू लागले.

१९७० च्या दशकातील उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकाच्या सुरवातीला एलीयन, स्टार वॉर्स, ब्लेड रनर, आणि इटी: द एक्स्ट्राटेरेस्ट्रीएल अशा चित्रपटांनी अमेरिकेतील बॉक्स ऑफिसचा निम्मा पैसा मिळवला होता. अर्थात, विज्ञान कथांनी सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे ज्युरासिक पार्क हा सादर केला. त्या चित्रपटानंतर सुमारे १,००० ज्युरासिक पार्क उत्पादनांचा भडिमार झाला. दूरचित्रवाणी देखील याचे अनुसरण करू लागली आहे यात काही आश्‍चर्य नाही. स्टार ट्रेक ही लोकप्रिय मालिका बाह्‍य अंतरिक्षाविषयी बरेच कार्यक्रम तयार करण्यास कारणीभूत झाली.

परंतु, लोकप्रियतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काही विज्ञान-कथा लेखकांनी विज्ञान कथेला थोडेफार मूल्य देणाऱ्‍या दर्जासोबत हातमिळवणी केली आहे, असे पुष्कळांना वाटते. कॉर्ल मिखाएल ऑर्मर हे जर्मन लेखक असा दावा करतात की, ‘विज्ञान कथा आता त्यामधील साहित्याने नव्हे तर बाजार तंत्रांनी ओळखला जाणारा केवळ एक लोकप्रिय व्यापारी शिक्का आहे’. इतरजण दुःखाने असे म्हणतात, की आजच्या विज्ञान-कथा चित्रपटांचे खरे “नायक” व्यक्‍ती नसून स्पेशियल इफेक्टस्‌ आहेत. एक टीकाकार असेही म्हणतो, की विज्ञान कथा “त्यांच्या पुष्कळ रूपांमध्ये तिरस्करणीय व दयनीय आहेत.”

उदाहरणार्थ, अनेक तथाकथित विज्ञान-कथा चित्रपट खरे म्हणजे विज्ञान किंवा भवितव्याबद्दल नसतात. भवितव्याची दृश्‍ये काहीवेळेस हुबेहूब वर्णनात्मक हिंसेकरता केवळ पार्श्‍वभूमी म्हणून वापरली जातात. नॉर्मन स्पिनरॅड या लेखकाने निरीक्षिले, की आजच्या अनेक विज्ञान-कथा गोष्टींमध्ये, एखाद्यावर “गोळी झाडली जाते, त्याला भोसकले जाते, त्याचे बाष्प केले जाते, प्रकाश किरणांच्या हत्याराने जखमी केले किंवा ठार मारले जाते, नखांनी ओरबडले जाते, गिळंकृत केले जाते किंवा स्फोटकाने चिंधड्या उडवल्या जातात.” अनेक चित्रपटांमध्ये ही हिंसात्मक अशांतता थरारक तपशीलात दाखवली जाते!

अनेक विज्ञान-काल्पनिक पुस्तकांमध्ये व चित्रपटांमध्ये सादर केले जाणारे अलौकिक घटक चिंतेचे आणखी दुसरे क्षेत्र आहे. अशा कथा केवळ चांगले आणि वाईट यांमधील रूपकात्मक युद्ध असल्याची समज लोक बाळगत असतील, परंतु यातील काही साहित्य रूपकात्मक वर्णनाच्या पलीकडे जाऊन भूतविद्येच्या प्रकाराला चालना देते असे दिसते.

संतुलनाची गरज

अर्थात, बायबल, काल्पनिक मनोरंजनाचे खरे पाहता खंडन करत नाही. योथामच्या झाडांच्या दृष्टान्तात, निर्जीव झाडे एकमेकांशी बोलत असल्याचे—कट रचत असल्याचे आणि योजना करत असल्याचे देखील दाखवले आहे. (शास्ते ९:७-१५) संदेष्टा यशयाने, पुष्कळ काळापासून मृत असलेले राष्ट्रीय अधिपती कबरेत संभाषण करत असल्याचे चित्र रेखाटले तेव्हा त्यानेही अशाच प्रकारे काल्पनिक साधनाचा उपयोग केला. (यशया १४:९-११) येशूच्या दाखल्यांमध्येही असे घटक होते जे प्रत्यक्षात घडू शकत नाहीत. (लूक १६:२३-३१) अशा काल्पनिक साधनांनी मनोरंजनाचेच नव्हे तर सूचना देण्याचे आणि शिकवण्याचे कार्यही साधले.

आज काही लेखक शिकवण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी भविष्याच्या दृश्‍याचा कदाचित योग्यपणे उपयोग करतील. तथापि, दक्ष ख्रिस्ती वाचक हे लक्षात ठेवतात, की बायबल आपल्याला शुद्ध आणि हितकारक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास आर्जवते. (फिलिप्पैकर ४:८) ते आपल्याला अशी आठवणही करून देते: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) काही विज्ञान-कथा चित्रपट किंवा पुस्तके, बायबलशी सुसंगत नसलेल्या उत्क्रांतीवाद, मानवी अमरत्व आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांना किंवा तत्त्वज्ञानाला चालना देण्याचे माध्यम ठरतात. बायबल आपल्याला “तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा” यांना बळी न पडण्याचा इशारा देते. (कलस्सैकर २:८) म्हणून, इतर मनोरंजनाच्या प्रकारांप्रमाणेच विज्ञान कथांची बाब येते तेव्हा सावध असणे उचित आहे. आपण काय वाचतो किंवा काय पाहतो याबद्दल निवडक असले पाहिजे.—इफिसकर ५:१०.

आधी उल्लेखल्याप्रमाणे, अनेक लोकप्रिय चित्रपट हिंसक आहेत. ज्या यहोवाविषयी “त्याला आततायी माणसाचा वीट येतो,” असे म्हटले आहे त्याला, आपण अकारण रक्‍तपात पाहिल्यामुळे संतुष्टता मिळेल का? (स्तोत्र ११:५) तसेच भूतविद्येचे शास्त्रवचनात खंडन केल्यामुळे, जादूटोणा किंवा चेटूक अशा गोष्टी सादर करणारी पुस्तके किंवा चित्रपटांच्या बाबतीत ख्रिश्‍चनांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे. (अनुवाद १८:१०) हेही जाणून घ्या की, जरी एखादी प्रौढ व्यक्‍ती सहजगत्या काल्पनिकता आणि वास्तविकता यात भेद करू शकत असली, तरी तसा भेद सर्वच मुलांना करता येत नाही. त्यामुळे, आपली मुले जे वाचतात आणि पाहतात त्याद्वारे त्यांच्यावर कसा परिणाम होतो याविषयी निरीक्षण करावेसे पालकांना वाटेल.b

काहीजण असा निर्णय घेतील की, त्यांना इतर प्रकारचे वाचन आणि मनोरंजन करणे ठीक वाटते. परंतु, याबाबतीत अशा लोकांना इतरांबद्दल न्याय करण्याची किंवा व्यक्‍तिगत निवडींविषयी वादविषय करण्याची गरज नाही.—रोमकर १४:४.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, जे ख्रिस्ती अधूनमधून करमणुकीसाठी विविध प्रकारच्या कथांचा आनंद लुटण्याचे निवडतात त्यांनी शलमोनाचा हा इशारा लक्षात ठेवणे चांगले आहे: “ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणविते.” (उपदेशक १२:१२) आजच्या जगात अनेकजण विज्ञान-कथा पुस्तके आणि चित्रपटांना वेळ देण्याच्या बाबतीत स्पष्टपणे अतिरेक करत आहेत. विज्ञान-कथा क्लब आणि अधिवेशने यांची भरभराट झाली आहे. टाईम नियतकालिकानुसार पाच खंडातील स्टार ट्रेक च्या रसिकांनी, स्टार ट्रेक टीव्ही मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये सादर केलेली क्लिंगोन ही काल्पनिक भाषा शिकण्यासाठी स्वतःला वाहिले आहे. अशा प्रकारची अतिरेकी वागणूक १ पेत्र १:१३ मधील, ‘सावध राहा [“संतुलित असा,” तळटीप NW]’ या बायबलच्या सल्ल्याच्या एकवाक्यतेत मुळीच नाही.

सर्वात अनुकूल परिस्थितीतही, विज्ञान कथा, भवितव्यात काय राखले आहे हे जाणण्याची मानवाची उत्कंठा पूर्ण करू शकत नाहीत. ज्यांना खरोखर भवितव्याविषयी जाणून घ्यावयाचे आहे त्यांनी निश्‍चित उगमाकडे वळले पाहिजे. याची चर्चा आम्ही आमच्या पुढील लेखात करू.

[तळटीपा]

a वर्नच्या शब्दांत त्याचे वर्णन “दूरवरील अंतरावर कोणतेही लिखाण, सही किंवा नमुना याची हुबेहूब नक्कल पाठवणाऱ्‍या छायाचित्रणाची तार,” असे केले आहे.—न्यूजवीक, ऑक्टोबर १०, १९९४.

b “तुमच्या मुलाने काय वाचावे?” हा मार्च २२, १९७८ सावध राहा! (इंग्रजी) अंकातील लेख पाहा.

[७ पानांवरील चित्र]

पालकांनी त्यांच्या मुलांच्या करमणुकीवर लक्ष ठेवले पाहिजे

[७ पानांवरील चित्र]

विज्ञान कथांची बाब येते तेव्हा ख्रिश्‍चनांनी निवडक असावे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा