वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 ७/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उत्तम लिहिता आणि वाचता येणारी मुले
  • बायबलमध्ये फेरफार करणे
  • मासेमारी धोक्यात
  • पक्ष्याच्या घरट्याच्या सूपची वाढती किंमत
  • क्षय विरोधी संग्रामात पराजित होणे
  • प्रशंसा तणावास विरोध करते
  • अकाली वार्धक्य टाळा
  • शरीराला छिद्र पाडणे आरोग्यास जोखीम
  • कारावास होण्याच्या दरांमध्ये वाढ
  • विद्यापीठे धोक्यात
  • एडस्‌—मला काही धोका आहे का?
    सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
  • अंग टोचणे उचित आहे का?
    सावध राहा!—२०००
  • “मानव इतिहासातील सर्वात भयानक साथ”
    सावध राहा!—२००३
  • जगाची आरोग्य स्थिती—वाढती तफावत
    सावध राहा!—१९९५
सावध राहा!—१९९५
g95 ७/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

उत्तम लिहिता आणि वाचता येणारी मुले

“युवकांना वाचून दाखवल्यामुळे त्यांचे लेखन कौशल्य वाढते,” असा अहवाल ग्लोब ॲन्ड मेल कॅनेडियन वृत्तपत्र देते. कॅनडामधील ऑन्टॅरिओ, प्रशिक्षण सेवाकार्य याद्वारे अलीकडेच आयोजित केलेल्या परीक्षांनुसार, ज्या विद्यार्थ्यांनी आम्ही मोठे होत असताना आम्हाला नेहमी गोष्टी वाचून दाखवल्या जात होत्या असे म्हटले त्यांनी, ज्यांना क्वचित कधी किंवा कधीच पुस्तके वाचून दाखवली नाहीत अशा विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षांमध्ये उत्तम यश संपादन केले. ग्लोब वृत्तपत्र पुढे म्हणते, “उत्तम वाचन असणाऱ्‍या विद्यार्थ्यांचे लिखाण देखील उत्तम होते” आणि “शाळेच्या पाठ्यपुस्तकांशिवाय अवांतर वाचन करणाऱ्‍या विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन दोन्ही उत्तमप्रकारे केले.” ऑन्टेरिओ शिक्षक संघाच्या अध्यक्षांनी सांगितल्यानुसार, परीक्षांच्या निकालांनी हे प्रकट केले की, “वयाच्या १४ वर्षापर्यंत वाचन किंवा वाचनाचा सराव न करणारे विद्यार्थी त्यांच्या पुढील वयोमानात वाचन करणार नाहीत.”

बायबलमध्ये फेरफार करणे

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने बायबलमध्ये अभूतपूर्व बदल करून बायबलचे नवीन भाषांतर तयार केले. “लोकांची मर्जी” मिळविण्याच्या या प्रयत्नात या भाषांतराने लिंगभेद, वंशभेद किंवा यहुदी विरोधवादासह कलंकित वर्णन करणाऱ्‍या विधानांना गाळून टाकले आहे. उदाहरणार्थ, या भाषांतराने देवाला “माता-पिता” असे संबोधले आहे. या भाषांतरामध्ये येशू “मनुष्याचा पुत्र” होणार नाही तर केवळ एक “मानव” होईल. यहुदी लोकांद्वारे येशू ख्रिस्ताला मारण्यात आल्याचा उल्लेख या भाषांतरामध्ये नाही. देवाचा “उजवा हात” याऐवजी “सामर्थ्यशाली हात” असे वापरले जाईल तेव्हा डावखुऱ्‍या लोकांच्या विरोधात असणारा कलुषितपणा काढून टाकण्यात येईल, द संडे टाईम्स हे वृत्तपत्र म्हणते.

मासेमारी धोक्यात

वेगवेगळ्या राष्ट्रांमधील मासेमारी करणारी जहाजे त्यांच्या किनाऱ्‍यांलगत असणाऱ्‍या खास मालकीच्या समुद्र पट्ट्याकरता आणि मासेमारीमुळे होणाऱ्‍या लाभाकरता वाद घालत असल्यामुळे वर्ल्डवॉच इन्स्टिट्युट याप्रकारची चेतावणी देते की, मासेमारी करण्यात अगदी कळस झाला असून सध्या पृथ्वीवरील अनेक भागांमध्ये मासेमारीमध्ये वास्तविक रीत्या मंदी होत आहे. पर्यावरणाचे प्रदूषण गोलार्धाव्याप्त समुद्री जीवनाचा ऱ्‍हास होण्याचे प्रमुख कारण आहे हे कबूल करताना हा अहवाल म्हणतो, व्यापार विषयक मासेमारी करणाऱ्‍या उद्योगाद्वारे होणाऱ्‍या प्रमाणापेक्षा जास्त मासेमारीमुळे अटलांटिक आणि प्रशांत महासागर तसेच काळा समुद्र आणि भूमध्य सागर यातील मासे कमी झाले आहेत. एजन्स फ्रान्स-प्रेस, वार्ता सेवा सांगते की, वर्ल्डवॉच याच्या अहवालानुसार काही भागांमध्ये पकड ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. समुद्री संपत्तीच्या बाबतीत होणारा निष्काळजीपणा यापुढे असाच कायम राहिल्यास मासेमारी करणारे अक्षरशः लाखो कोळी बेकार होतील.

पक्ष्याच्या घरट्याच्या सूपची वाढती किंमत

हाँग काँग आणि इतर आशियाई शहरांतील रेस्टॉरंटमधील आवडता पदार्थ म्हणजे, खाता येण्याजोगे एका पक्ष्याचे घरटे असून या घरट्याचे सूप तयार करून ते सादर केले जाते. इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्युन यानुसार अनेक चिनी लोक अन्‍नाच्या स्वरूपात तयार केलेल्या या घरट्याकडे केवळ मिष्टान्‍न म्हणूनच नव्हे तर शक्‍तिवर्धक म्हणून देखील त्याकडे पाहतात. संरक्षण गटांनी केलेल्या अंदाजानुसार सन १९९२ मध्ये स्विफ्ट पक्ष्यांच्या पिलांच्या १ करोड ७० लाख घरट्यांचा वापर केवळ हाँग काँग शहरातच करण्यात आला. मोठ्या प्रमाणात या घरट्यांचा वापर केल्यामुळे या घरट्यांच्या घाऊक विक्रीमध्ये एका किलोग्रॅमकरता ५०० डॉलर एवढी किंमत मोजण्याचा उच्चांक झाला आहे आणि उत्तम-दर्जा असलेली घरटी विकत घेण्यासाठी वरील किंमतीच्या आठपट किंमत मोजावी लागते. ही घरटी तयार करणाऱ्‍या स्विफ्ट पक्ष्यांच्या पिलांची किंमत तर त्याहीपेक्षा अधिक आहे. घरटी काढताना त्यातील अंडी त्याचप्रमाणे पिलांच्या होणाऱ्‍या नाशामुळे काही प्रमाणात स्विफ्ट पक्ष्यांच्या पिलांची संख्या कमी झाली आहे तर काही पक्षी लोप पावले आहेत.

क्षय विरोधी संग्रामात पराजित होणे

ला पिटियॉ-सॉलपॉट्रेयर हॉस्पिटल, पॅरिस येथील सूक्ष्म-अतिसूक्ष्मजन्तू शास्त्रातील विभागाचे प्रमुख प्रोफेसर झॉक ग्रोसेट यांच्या मते रोगाच्या विरोधातील युद्धांतर्गत क्षयाच्या विरोधातील संग्रामामध्ये “जगव्याप्त प्रमाणात पूर्णपणे अपयश आले आहे.” रोग्यावर औषधोपचार न केल्यास क्षयामुळे होणारा मृत्युदर हा सुमारे ५० टक्के आहे. प्रोफेसर ग्रोसेट यांनी हे दाखवून दिले की, क्षय रोगामुळे पीडित असणाऱ्‍या निम्म्या रोग्यांसाठी रोगपरीक्षा आणि औषधोपचार उपलब्ध नाहीत; तांत्रिक रीत्या विकसनशील राष्ट्रांना याचा खरा धोका आहे, कारण या ठिकाणी सूक्ष्म-जंतूनाशके विनामूल्य उपलब्ध असतात; परंतु एकूण रोग्यांपैकी केवळ निम्मे जणच पूर्णपणे बरे होईपर्यंत उपचार घेणे चालू ठेवतात. “उर्वरित निम्मे लोक उपचार घेत नाहीत किंवा अगदी अनियमितपणे उपचार घेतात परिणामी मृत्युदरात (उपचार केलेल्यांपैकी २५ टक्के) वाढ होते व त्याचप्रमाणे ट्युबरकल बॅसिलस नावाच्या सूक्ष्मजंतूमध्ये वाढ होते ज्यामुळे जंतू नाशके निकामी ठरतात.”

प्रशंसा तणावास विरोध करते

जर्मनीमध्ये दर वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे २,००,००० लोक मृत्युमुखी पडतात. याचे प्रमुख कारण काय आहे? जर्मनीमध्ये काम करताना “पूर्ण वचनबद्धता आणि कायमस्वरूपी तणाव,” यांची आवश्‍यकता असल्यामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमुख कारण “तणाव” असल्याचा अहवाल सुड्युटस्खे झिटुंग वृत्तपत्र देते. कामाच्या ठिकाणी असणाऱ्‍या तणावामुळे आजारपण येते आणि परिणामी कामावर न येणाच्या प्रमाणामध्ये वाढ होते त्याचप्रमाणे तणावामुळे शीण देखील येऊ शकतो. पन्‍नास टक्के परिचारिकांना तणावामुळे होणाऱ्‍या परिणामांना तोंड द्यावे लागते आणि ३ पैकी १ शिक्षक स्वैच्छिक निवृत्ती स्विकारतो, पुष्कळ शिक्षक “मानसिक तणावामुळे” निवृत्ती घेतात. कामाच्या ठिकाणी असणारा तणाव कसा दूर करता येईल, यावर आरोग्य विमा विभागाचे सहकर्मी अभ्यास करत आहेत. सामान्य उत्पादन असलेल्या शेकडो कंपन्यांमध्ये लागू केलेल्या एका अभ्यासक्रमानुसार या गोष्टीस कारणीभूत वाटणारा प्रमुख घटक म्हणजे: कामगारांच्या केलेल्या पाहणीनुसार ४४ टक्के कामगारांची त्यांच्या कामाच्या ठिकाणी केव्हाही प्रशंसा करण्यात आली नव्हती.

अकाली वार्धक्य टाळा

“अनेक लोक घर मुलांसाठी अनुकूल करतात. तर मग, वृद्ध लोकांसाठी अनुकूल का करू नये?” अशा प्रकारचा प्रश्‍न ब्राझील येथील साओ पावलो विद्यापीठाचे वार्धक्य शास्त्राचे शास्त्रज्ञ विल्सन जॅकोब फिल्यो करतात. वृद्धांकरता सुरक्षित घरकूल असणे आवश्‍यक आहे आणि त्याशिवाय ते असेही सुचवितात की, कोलमडून पडण्याचा धोका टाळण्यासाठी वृद्ध लोकांनी त्यांच्या स्नायुंना बळकट करण्यास्तव कसरत करावी. दीर्घायुषी होण्याचे प्रमुख शत्रू कोणते आहेत? साओ पावलो विद्यापीठाचे प्लॅस्टीक सर्जन रोझेरयो इझार निव्हज यांच्या मते, “कोणतेही काम न करता बसल्या जागी वेळ घालविणे, असंतुलित आहार (विशेषतः अधिक चरबीयुक्‍त आहार), धूम्रपान, मद्याचा अतिरेकी वापर, तणाव, अपर्याप्त निद्रा,” या सर्व गोष्टी दिर्घायुषाचे शत्रू होत. जॉर्नल डा टार्ड वर्णन करते की, प्रचंड तणाव रोगप्रतिबंधक शक्‍तीला दुर्बळ करतो, “या दुर्बळ रोगप्रतिबंधक शक्‍तीचा संबंध विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याशी तसेच वार्धक्याशी देखील आहे.” डॉ. निव्हज पुढे असा दावा करतात: “जीवनात कोणताही रस न घेणे, हे अकाली वार्धक्य येण्याचे प्रमुख कारण आहे.”

शरीराला छिद्र पाडणे आरोग्यास जोखीम

“अनेक लोक त्यांच्या शरीराच्या अशा अवयवांस छिद्रे पाडतात ज्या अवयवांस काही वर्षांपूर्वी छिद्रे पाडली जात नसत,” अशा प्रकारचे व्यक्‍तव्य कॅनडामधील कॅलगरी पर्यावरण आरोग्य सेवा संस्थेचे दिग्दर्शक जॉन पेल्टन करतात. द वॅनकोव्हर सन या वृत्तपत्रानुसार, यामध्ये भुवया, ओठ, जिव्हा आणि नाभी या अवयवांचा समावेश होतो. नादिष्टपणामध्ये वाढ झाल्यास त्यामळे एड्‌स आणि हिपॅटायटिस बी आणि सी होऊ शकतो, या धास्तीमुळे अल्बर्टा आरोग्य येथील पर्यावरण आरोग्य सेवा या संस्थेला शरीराला छिद्रे पाडण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शनांचा परिचय करून देण्याची चालना मिळाली. पुढे हा अहवाल म्हणतो, “नवीन दर्जे कालांतराने अनियंत्रित व्यक्‍तिगत सेवांच्या पूर्ण पल्ल्यास व्यापून टाकतील जसे की, डाग देणे, लेपाच्या साहाय्याने शरीरावरील केस काढणे, गोंदणे, इलेक्ट्रोलायसिस त्याचप्रमाणे सेंसरी डेप्रायवेशन,” आणि नियमांच्या बाह्‍यरेषेवर जनता आरोग्य अधिकारी व एका खास उद्योगाद्वारे पुनर्विचार करण्यात येईल. लोकांच्या शरीराला छिद्रे पाडण्यासाठी कान टोचण्याच्या साहित्याचा वापर करणाऱ्‍यांपैकी एकजण मान्य करतो: “रोग संक्रमण झाल्यामुळे लोकांना इस्पितळात जाताना आम्ही पाहिले आहे. वास्तविकपणे, शरीराला छिद्रे पाडणे फारच भयप्रद आहे.”

कारावास होण्याच्या दरांमध्ये वाढ

जगभरामध्ये गुन्हेगारी वाढते तसतसे लोकांना कारावास होण्याच्या दरामध्ये वाढ होते. रशियामध्ये प्रती १,००,००० लोकांपैकी ५५८ लोकांना कारावासाची शिक्षा होते. हा रशियातील लोकांना कारावास होण्याचा दर आहे, दुसरा क्रमांक अमेरिकेचा असून या देशातील लोकांना कारावास होण्याचा दर प्रती १,००,००० लोकांस ५१९ इतका आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ३६८, सिंगापूर २२९ आणि कॅनडा ११६, असा या देशांतील लोकांना कारावास होण्याचा दर आहे. भूतपूर्व सोविएत संघ राज्याच्या विभाजनामुळे रशियामध्ये हत्याकांड तसेच इतर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून लोकांना कारावास होण्याचा दर अमेरिकेच्याही पुढे गेला आहे; अमेरिकेचा गुन्हेगारीचा दर सर्वात अधिक होता. अमेरिकेतील एक सषष्ठांश या दराने, अनेक युरोपिय राष्ट्रे लोकांना कारावासाची शिक्षा का देतात? “याचे एक कारण म्हणजे, सर्व राष्ट्रांमध्ये सर्वसाधारण गुन्हेगारीचे दर काही प्रमाणात भिन्‍न आहेत; अमेरिका, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांमध्ये हिंसाचार अगदी सहजपणे आढळतो,” असे यू.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट म्हणते. “कारण कोणतेही असो, लोकांना कारावास होण्याच्या दरांच्या विभिन्‍नतेत वाढ होण्याची शक्यता आहे.”

विद्यापीठे धोक्यात

“आफ्रिकेतील दुर्लक्षित विद्यापीठे कोसळण्याच्या बेतात आहेत,” जॉन्सबर्गचे वीकेन्डस्टार अहवाल देते. द्रव्यनिधीच्या अभावामुळे तेथे आवश्‍यकतेपेक्षा कमी संगणक आहेत आणि काही बाबतीत तर दूरध्वनींचा प्रवाह खंडित करण्यात आला आहे. एका विद्यापीठामध्ये ३५,००० विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली; परंतु सुरवातीला केवळ ५,००० विद्यार्थ्यांकरताच त्या विद्यापीठाची योजना करण्यात आली होती. युगांडा येथील भूतपूर्व प्रतिष्ठीत विद्यापीठामध्ये अध्यापकांच्या फक्‍त निम्म्या जागा भरल्या गेल्या आहेत. या विद्यापीठातील अध्यापकाचे मासिक वेतन सुमारे १९ डॉलर इतके आहे. अध्यापकांनी किंवा विद्यार्थ्यांनी केलेल्या संपामुळे काही विद्यापीठे तर कित्येक महिने बंद आहेत. “आफ्रिकेतील विद्यालयीन आत्मघाताची वाईट स्थिती अधिक वाईट होत आहे,” असे केनियाच्या प्राध्यापकाने परीक्षण केले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा