वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 ७/८ पृ. २७
  • भेक किंवा बेडूक काय फरक आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भेक किंवा बेडूक काय फरक आहे?
  • सावध राहा!—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • पहिल्या तीन पीडा
    बायबलमधून शिकू या!
सावध राहा!—१९९५
g95 ७/८ पृ. २७

भेक किंवा बेडूक काय फरक आहे?

अनेक शतकांपासून भेक आणि बेडकांची अपकीर्ती सर्वत्र पसरली आहे. “त्यांच्यामुळे त्वचेवर पुटकुळ्या निर्माण होतात.” “चेटकिणी लोकांना भेक किंवा बेडकांमध्ये परावर्तीत करू शकतात.” राजकुमारीने कुरूप बेडकाचे चुंबन घेतल्यानंतर त्याचे रूपांतर सुंदर राजकुमारामध्ये होते; ही दंतकथा कदाचित आपल्यांपैकी अनेकांनी ऐकली असेल. तथापि, “सिसेम स्ट्रीट” आणि “मपेट शो,” या दूरदर्शनवरील मुलांच्या कार्यक्रमांतील करमेट नामक बेडकाची लोकप्रियता वाढत असल्यामुळे बेडकांना अधिकच अनुकूल रीत्या प्रतिक्रिया मिळत आहे. भेक आणि बेडूक यातील वास्तविकता काय आहे? ते एकमेकांपासून भिन्‍न कसे आहेत?

पुटकुळ्या विषाणूमुळे येतात भेकांमुळे नव्हे—याविषयीचा गैरसमज दूर करू या. आणि दंतकथा ह्‍या—केवळ दंतकथा, काल्पनिक कथा व मिथ्या आहेत. चेटकिणी अस्तित्वात असल्या तरी त्या एखाद्या व्यक्‍तीचे बेडकामध्ये किंवा भेकामध्ये रूपांतर करू शकत नाहीत.

बेडूक आणि भेक जगातील अनेक भागांमध्ये आढळतात; परंतु ॲन्टार्क्टिकामध्ये बेडूक तर आर्क्टिकमध्ये भेक आढळत नाहीत. बेडकांच्या आणि भेकांच्या सुमारे ३,८०० जाती असून त्यापैकी ३०० पेक्षा अधिक भेक आहेत. तर मग, आपण बेडूक आणि भेक यातील फरक कसा दाखवू शकतो? याचे उत्तर द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया देतो: “वास्तविक बेडकांपेक्षा भेकांचा आकार रूंद आणि सपाट असून त्यांची त्वचा बेडकांच्या त्वचेपेक्षा अधिक गडद आणि शुष्क असते. वास्तविक भेकांच्या त्वचेवर सामान्यपणे गुठळ्या आढळतात. बेडकांची त्वचा मात्र मऊ असते. वास्तविक भेक जमिनीवर राहतात; परंतु बेडकांच्या बाबतीत हे खरे नाही. प्रौढ भेक केवळ अंडी घालण्याकरता पाण्यात जातात.” बेडकांचे सामान्य वास्तव्य पाण्याच्या आसपास असते; तुमची चाहूल लागताच पाण्यात उडी घेण्याच्या तयारीत ते असतात. बहुतेक सर्व बेडकांना त्यांच्या तोंडाच्या फक्‍त वरील जबड्यातच दात असतात. भेकांना मात्र दात नसतात. त्यामुळे बेडूक आणि भेक त्यांचे भक्ष्य चर्वण न करता मुखगुहेत ढकलतात.

अनेक बेडूक आणि भेक तीव्र विष तयार करतात. कोस्टा रिका येथील लालसर रंग असणारा बाण बेडूक (डेन्ड्रोबॅटस प्युमिलो) याचे एक उदाहरण होय. काही बेडकांच्या विषांमुळे एखाद्याचा सहज मृत्यू होऊ शकतो. जीवशास्त्र, (इंग्रजी) हे पुस्तक असा अहवाल देते: “विषुववृत्तामधील अनेक जमाती अनेकदा त्यांच्याकडील बाणांच्या टोकांना विषारी करण्याकरता बाणांची टोके या बेडकांवर रगडतात.” प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये बेडकांची तुलना ‘अशुद्ध आत्म्यांसह’ करण्यात आली आहे. याचे कारण काय आहे? कारण मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे बेडकांचा भोजनाकरता उपयोग अशुद्ध मानला जात असे. भेकांचा उल्लेख बायबलमध्ये केलेला नाही.—प्रकटीकरण १६:१३; लेवीय ११:१२.

[२७ पानांवरील चित्रं]

उजवीकडे: भेक. खाली: बेडूक

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा