वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 ७/८ पृ. ५-७
  • काही समस्या कोणत्या आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काही समस्या कोणत्या आहेत?
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संभाषणात खंड पडतो तेव्हा
  • तुमच्या उदाहरणामुळे फरक होऊ शकतो
  • “आमच्या जीवनाला एक प्रकारचा जिवंतपणा”
  • प्रेमाने एकत्र राहणे
    सावध राहा!—१९९५
  • आजीआजोबांना काय होत आहे?
    सावध राहा!—१९९५
  • उतारवयात जोडीने प्रवेश करणे
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • वृद्ध पालकांचा आदर केल्यामुळे मिळणारी प्रतिफळे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
सावध राहा!—१९९५
g95 ७/८ पृ. ५-७

काही समस्या कोणत्या आहेत?

आजीआजोबा, मुले व नातवंडे—या तीन पिढ्यांमध्ये केवळ काही दशकांचा फरक असतो परंतु त्यांच्या मनोवृत्तींमध्ये जमीन आसमानचा फरक असतो.

पुष्कळ आजीआजोबांनी दुसऱ्‍या महायुद्धाचा व त्यासोबत त्याच्या सर्व नाशकारक परिणामांचा भीतीदायक अनुभव घेतला आहे. सन १९६० मध्ये झालेले विरोध व आर्थिक कार्यहालचालींच्या दरम्यान त्यांची मुले संभवतः लहान होती. त्यांची नातवंडे आज मूल्यहीन जगात जगत आहेत. आज प्रसिद्ध आदर्श व्यक्‍तींमध्ये झटपट बदल होत असल्यामुळे, एका पिढीने दुसरीला आपल्या स्वतःच्या पिढीच्या अनुभवाबद्दल गुणग्राहकता बाळगण्यासारखे काही सांगणे इतके सोपे नाही. कशाची तरी उणीव आहे; एकमेकांना सहकार्य देण्यास व आदर करण्यास विविध पिढ्यांच्या लोकांची मने वळवण्यास कशाची तरी उणीव आहे. पण ते काय असू शकते?

बहुतेकवेळा, चांगला हेतू बाळगणारे आजीआजोबा त्यांच्या विवाहित मुलांच्या कौटुंबिक मामल्यांच्या आड येतात. ते त्यांच्या नातवंडांशी खूपच कडक रीतीने वागतात किंवा त्यांच्यावर काहीच बंधने घातलेली नाहीत अशी तक्रार करतात. दुसऱ्‍या बाजूला पाहता, एक स्पॅनिश म्हण अशी आहे: “आजीआजोबांची शिक्षा चांगली नातवंडे बनवत नाही”—कारण आजीआजोबांची लाड पुरवण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्या स्वतःच्या अनुभवामुळे त्यांना स्पष्टपणे कळत असल्याने त्यांच्या मुलांनी विशिष्ट चुका टाळाव्यात असे त्यांना वाटत असते म्हणून ते कदाचित त्यांच्या आड येतात. तथापि, ते संतुलित पद्धतीने त्यांच्या विवाहित मुलांसोबतच्या बदलत्या नातेसंबंधांना निश्‍चित ठरवू किंवा अर्थही लावू शकत नाहीत. विवाहाद्वारे पुष्कळ वर्षांपासून इच्छिलेले स्वातंत्र्य मिळवल्यावर मुले कोणत्याही प्रकारची लुडबूड सहन करण्यास तयार नसतात. आता ते स्वतः कुटुंबाला आधार देण्यास नोकरी करत असल्यामुळे स्वतःचे निर्णय घेण्याच्या अधिकाराचा भंग होणे ते सहन करू शकत नाहीत. आपल्याला सर्वकाही माहीत आहे असा विचार करणारी नातवंडे नियम व कायद्यांवर संतापतात व त्यांच्या आजीआजोबांना काहीच माहिती नाही असा विचार ते कदाचित करतात. आधुनिक समाजात, आजीआजोबांना पसंत केले जात नाही असे दिसते. त्यांच्या अनुभवाकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष केले जाते.

संभाषणात खंड पडतो तेव्हा

काही वेळेस, आजीआजोबा त्यांच्या मुलांसोबत राहत असले, तरी परस्परांना समजून घेण्याच्या अभावाचा अभेद्य अडथळा त्यांना बाकीच्या कुटुंबापासून वेगळे करतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, म्हातारपणाची वर्षे जड जात असल्यामुळे आजीआजोबांना अधिकाधिक प्रेमाची गरज असते अगदी त्याच वेळी हे घडते. एखाद्या व्यक्‍तीला एकाकीपणाचा आभास होण्यास तिला एकटेच असले पाहिजे असे काही नाही. संभाषणामध्ये खंड पडतो, आदर व प्रेमाऐवजी निरभिमान किंवा संतप्त केले जाते तेव्हा, त्याचे परिणाम म्हणजे, आजीआजोबांना पूर्णपणे दूर केले जाते व त्यांची अतिशय निराशा होते. त्यांच्या आंतरिक भावना दुखावतात. जॉकोमो डॉक्वीनो हे शिक्षक लिहितात: “आता अलीकडेच कोणा एकाने कुटुंबातील प्रेमाची तुलना, एका जुन्या कारच्या मॉडेलशी केली, असे असले तरी ते वार्धक्याचे सर्वात उत्तम औषध आहे. चेहऱ्‍यावरील समजूतदारपणाचे हावभाव, दयाळुपणाचे एक स्मित, उत्तेजनाचा शब्द किंवा कुरवाळणे पुष्कळ औषधांपेक्षा अधिक मदत करते.”—लिबर्टा दी इन्वेक्यॉरे (वृद्ध होण्यास स्वातंत्र्य).

तुमच्या उदाहरणामुळे फरक होऊ शकतो

ऱ्‍हास पावणाऱ्‍या कौटुंबिक नातेसंबंधांनी निर्माण होणाऱ्‍या तणावामुळे, एक पिढी दुसऱ्‍या पिढीविरुद्ध सतत तक्रार करत असते. कुटुंबातील एका सदस्याला दुसरा जे काही करतो ते चुकीचे आहे असे वाटू शकते. परंतु त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतात. मुले, त्यांचे पालक त्यांच्या आजीआजोबांशी कसा व्यवहार राखतात व आजीआजोबा कशी प्रतिक्रिया दाखवतात त्याचे निरीक्षण करतात. सामान्यतः वृद्ध लोक मूकपणे सर्व सहन करत असले, तरी नातवंडे ऐकतात, पाहतात व लक्षात ठेवतात. अशाप्रकारे त्यांच्या भवितव्यातील वागणूकीच्या पद्धतींवर प्रभाव होतो. पालकांनी आजीआजोबांशी व्यवहार केला तसाच ते देखील प्रौढ झाल्यावर आपल्या पालकांशी व्यवहार करतील. बायबलचे तत्त्व कोणीही चुकवू शकत नाही: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”—गलतीकर ६:७.

पालक, आजीआजोबांना हीनतेने वागवत असल्याचे—त्यांची थट्टा करत असल्याचे, उद्धटपणे त्यांना शांत करत असल्याचे किंवा त्यांची पिळवणूक करत असल्याचे—नातवंडांनी पाहिले तर ते देखील कदाचित त्यांच्या पालकांना वृद्ध झाल्यावर अशीच वागणूक देतील. आजीआजोबांचा केवळ फ्रेम केलेला फोटो फळीवर ठेवणे पुरेसे नाही—व्यक्‍ती समजून त्यांना आदर व प्रेम दिले पाहिजे. कालांतराने, नातवंडेही हीच वागणूक देतील. आजीआजोबांना गैरवागणूक दिली जाण्याची ही गोष्ट अधिकाधिक सार्वत्रिक होत आहे असे म्हटले जाते. काही युरोपियन देशांमध्ये, मुलांच्या संरक्षणासाठी आधीच चालू असणाऱ्‍या दूरध्वनीप्रमाणेच, गैरवागणूक दिली जाणाऱ्‍या वृद्ध लोकांच्या मध्यस्थीसाठी संकटाच्या काळी उपयोगात येणाऱ्‍या दूरध्वनींची सोय करण्यात आले आहे.

स्वार्थ, गर्व व प्रेमाच्या अभावामुळे असमजूतदारपणाला उत्तेजन मिळते व त्यात वाढ होते. यास्तव, वृद्धाश्रमांमध्ये आजीआजोबांना ठेवून त्यांच्यापासून सुटका मिळवू पाहणाऱ्‍या लोकांची संख्या वाढत आहे. काहीजण, वृद्ध लोकांची काळजी घेण्याच्या समस्येपासून स्वतःला अलिप्त राखण्यास काहीएक कसर बाकी ठेवत नाहीत. ते त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साधने असणाऱ्‍या विशेष सुविधांमध्ये किंवा अमेरिकेतील फ्लोरिडा किंवा कॅलिफोर्नियामध्ये आहेत तशा वृद्धांसाठी बनवलेल्या गावांमध्ये त्यांना ठेवतात. तेथे पुष्कळ सुपरमार्केट व मनोरंजन आहे परंतु तरीसुद्धा, प्रियजनांचे स्मित व कुरवाळणे व नातवंडांची मिठी तेथे नाही. सुटीच्या काळात विशेषतः, पुष्कळजण आजी व आजोबांना कोठेतरी “ठेवण्याचे” ठिकाण शोधत असतात. भारतामध्ये, काही आजीआजोबांचा त्याग करून त्यांना स्वतःच्या जीवावर सोडण्यात येते तेव्हा ही परिस्थिती आणखीनच बिकट असू शकते.

घटस्फोटामुळे जवळचे कौटुंबिक नातेसंबंध राखण्याची अडचण आणखीनच वाढते. ब्रिटिशच्या ४ पैकी केवळ १ कुटुंबात दोन्ही पालक एकाच घरात अद्यापही राहत आहेत. घटस्फोट जगभरात वाढत आहे. अमेरिकेमध्ये, प्रत्येक वर्षी दहा लाखापेक्षा अधिक घटस्फोट होतात. अशाप्रकारे, आजीआजोबा अनपेक्षितपणे आपल्याच मुलांच्या विवाहाच्या पेचप्रसंगाचा व त्यांच्या नातवंडांच्या नातेसंबंधांमधील परिणामी अमूलाग्र बदलांचा सामना करतात. “त्यांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नवीन सोबत्याला अगोदरच्या विवाहापासून मुले असतील” तर, पूर्वीच्या जावयाशी किंवा सुनेशी नातेसंबंध राखण्याच्या अडचणीमध्ये, “‘मिळालेल्या’ नातवंडांच्या अचानक आगमनाच्या” आणखी एक समस्येची भर त्यात पडते असे इटलीचे वृत्तपत्र कोरियरे सॉल्यूट अहवाल देते.

“आमच्या जीवनाला एक प्रकारचा जिवंतपणा”

तरीसुद्धा, बाकीच्या कुटुंबासोबत आजीआजोबा राहत असले किंवा नसले, तरीही त्यांच्याशी ऊबदार, प्रेमळ नातेसंबंध ठेवणे हे सर्वांच्या फायद्याचे आहे. फुकुई, जपानमधील ऱ्‍योको नावाची एक आजी म्हणते, “आपल्या मुलांसाठी व नांतवंडांसाठी काही करणे हे आमच्या जीवनाला एक प्रकारचा जिवंतपणा देण्यास पुरेसे आहे.” कोरियरे सॉल्यूट याने प्रकाशित केलेल्या संशोधनाच्या परिणामांनुसार, अमेरिकी तज्ज्ञांच्या एका गटाने असे म्हटल्याचा अहवाल आहे: “आजीआजोबा व नातवंडांना जवळीकीच्या, प्रेमळ नातेसंबंधाचा आनंद लुटण्याचा चांगला अनुभव मिळतो तेव्हा, केवळ मुलांनाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा पुष्कळ लाभ होतो.”

तर मग, कौटुंबिक नातेसंबंधांवर नकारात्मक प्रभाव पाडणारे वैयक्‍तिक मतभेद, दोन पिढ्यांमधील तफावत व स्वार्थापोटी असणाऱ्‍या नैसर्गिक वृत्तींवर मात करण्यासाठी काय केले जाऊ शकते? हा विषय पुढील लेखात विचारात घेतला जाईल. ( g95 7/8)

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“वृद्ध होण्यातील सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ऐकले न जाणे.”—अल्बर्ट कॅमस, फ्रेंच कादंबरीकार.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा