आजीआजोबांना काय होत आहे?
इटलीमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
“माझी नातवंडे माझ्याबद्दल आजोबा या नात्याने इतक्या प्रेमळ भावना व्यक्त करतील याची मी कल्पनाच करू शकत नव्हतो. ती एक दान आहेत—प्रेमाची बंधने बळकट करणारे गोड व प्रांजळ दूत.”—एटोरा, आजोबा.
हा वरील हितकारक नातेसंबंध असताना देखील, आजीआजोबा, पालक व नातवंडे यांचे आजच्या या काळात नेहमीच पटत नाही. सहकार्य देण्याऐवजी या तीन पिढ्यांमध्ये नेहमी खटके उडत असतात. त्याचा परिणाम? कुटुंबाच्या इतर सदस्यांना आर्थिक समस्या असतात तेव्हा ते ज्यांच्याकडून मदत घेतात असे सर्वात भेद्य व दूर असलेले कुटुंबाचे सदस्य—वडिलधारी, आजीआजोबांमध्ये एकाकीपणा व दुःख वाढत आहे. तुमच्या कुटुंबातील परिस्थिती काय आहे? आजीआजोबांना खरोखर महत्त्व दिले जाते का?
मागील काही दशकांमध्ये, जगभरातील लक्षणीय सामाजिक बदलांनी, कुटुंब व त्यातील नातेसंबंधांवर प्रभाव पाडला आहे व त्यामुळे पित्तृसत्ताक कुटुंबपद्धती जवळजवळ पूर्णपणे नाहीशी झाली आहे. युरोपमध्ये, केवळ २ टक्के वृद्ध लोक आपल्या मुलांसोबत राहतात. त्याचप्रमाणे, उद्योगप्रधान राष्ट्रांमध्ये, सध्या सरासरी आयुर्मर्यादेमध्ये वाढ व जन्माच्या प्रमाणात घट होत असल्यामुळे, सामान्य लोकसंख्येशी तुलना केल्यास, आजीआजोबांची संख्या सतत वाढत आहे. युरोपमध्ये, लोकसंख्येतील २६ टक्के आजी व आजोबा आहेत व युरोप संघाने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार हा आकडा “वाढेल हे निश्चित आहे.” असाही संध्या बातमी (इंग्रजी) म्हणते, जपानला “वृद्ध लोकांची काळजी घेण्याच्या आपल्या परंपरेविषयी अभिमान आहे.” तरीसुद्धा, विशेषतः शहरांमध्ये, दवाखान्यात भरती करण्याची गरज नसतानाही आजीआजोबांना दवाखान्यांमध्ये किंवा विशिष्ट चिकित्सालयांमध्ये भरती करण्याची सवय सर्वत्र आढळते. दक्षिण आफ्रिकेत देखील, द केप टाईम्स या केप टाऊनच्या वृत्तपत्रानुसार वडिलधारी लोकांना जेथे परंपरेनुसार प्रतिष्ठेने वागणूक देण्यात येत होती तेथे आता वृद्ध लोकांना नापसंत करण्याची दुःखद मनोवृत्ती आहे. कुटुंबांना “जीवनाचा होता होईल तितका आनंद लुटायचा आहे” व “एकदाचे आजीला सुरक्षित अशा वृद्धाश्रमात घातले की त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली असा त्यांचा भ्रम आहे” असा विशेष उल्लेख तो अहवाल करतो.
तेच वृत्तपत्र एका विशिष्ट घटनेविषयी सांगते, ज्यामध्ये एका वयस्कर आजीला तिची तीन मुले वृद्धांसाठी असणाऱ्या विश्रांती गृहात ठेवतात व तिला “आधार देतील व नियमितपणे भेट देतील असे वचन देतात.” परंतु तिचे काय होते? “सुरवातीला दररोज भेटी दिल्या जातात. काही काळानंतर त्या कमी होऊन आठवड्यामध्ये तीन वेळा दिल्या जातात. त्यानंतर आठवड्यातून एकदाच भेट दिली जाते. एका वर्षानंतर, त्या महिन्यातून एकदा किंवा दोनदा, कालांतराने वर्षातून पाच किंवा सहा वेळा व त्यानंतर भेट देणे बंद केले जाते.” या आजीने आपले न संपणारे दिवस कसे घालवले? त्याचे हृदयद्रावक वर्णन असे आहे: “तिच्या खोलीला एक खिडकी होती व तेथून एक वृक्ष दिसत असे आणि तिचे जिवंत सोबती केवळ पारवे व साळुंक्या होत्या. ते तिचे जणू जवळचे नातेवाईक असल्याप्रमाणे ती त्यांच्या येण्याची वाट पाहत राहते.”
शहरांमध्ये काम शोधण्यास पुष्कळांना प्रवृत्त करणारी दक्षिण आफ्रिकेची जीवन-शैली पाश्चिमात्य झाल्यामुळे, जमातीय कुटुंबांमध्ये तीच गोष्ट घडत आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितींव्यतिरिक्त, आनंदी सामाजिक व कौटुंबिक जीवनाला चालना देणारे मानवतेचे गुण—चांगुलपणा, एखाद्याच्या शेजाऱ्याबद्दल आदर, कौटुंबिक सदस्यांसाठी प्रेम हे सर्व नाहीसे होऊन स्वार्थ, सुखासक्ती, गर्व व बंडखोरपणा अशा वृत्तींचा फैलाव ही, आजीआजोबांचा त्याग केला जाण्याची इतर कारणे आहेत. शास्त्रवचनांनुसार असा नैतिक ऱ्हास, आपण “शेवटल्या काळी” जगत आहोत याचे चिन्ह आहे. (२ तीमथ्य ३:१-५) आपले आजीआजोबा समृद्धता व स्थिरतेचा उगम आहेत असे त्यांचे मूल्य जाणण्याऐवजी, वेगाने होणाऱ्या सामाजिक बदलांनुसार स्वतःला जुळवून न घेणारे त्रासदायक अडथळे त्यांच्याविषयी मुले व नातवंडे असा विचार करतात.a
पिढ्यांमधील तफावतीवर अतिशय जोर देण्यात येत आहे आणि त्यामुळे बराचसा तणाव निर्माण होतो व वृद्ध लोक आपल्या कुटुंबांसोबत राहतात त्यावेळी तर अधिकच तणाव निर्माण होतो. तरीसुद्धा, आजीआजोबांकडून जी मदत मिळते ती मोठ्या फायद्याची असू शकते! तर मग, आजीआजोबा, मुले व नातवंडांमधील प्रेमळ नातेसंबंधांमध्ये अडथळा आणणाऱ्या पिढ्यांच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत? तसेच, आजीआजोबा कुटुंबाच्या वर्तुळामधील त्यांची महत्त्वाची भूमिका कशी पुनर्स्थापित करू शकतात?
[तळटीपा]
a वार्धक्य व गंभीर आरोग्याच्या समस्यांच्या बाबतीत, पेशेवाईक कर्मचारी असलेले शुश्रूषा गृह काही वृद्ध पालकांकरता सर्वात प्रेमळ व व्यावहारिक तरतूद असेल हे जाणले पाहिजे.